Saturday, November 7, 2020

Spiritual Thoughts (November 2020)

।। ॐ श्री परब्रह्म गोपालनाथाय नमः ।।

निसर्गातून मनुष्याला बरेच काही शिकता येते. निसर्ग नियमांचे पालन करीत असतो. तसे मनुष्याने स्वतःच्या जीवनाला काही नियम लावणे गरजेचे असते. म्हणजे निसर्गचक्र सतत बदलत असते म्हणजे त्याच्यात अनेक विविधता असते तसे मनुष्याचे जीवन विविधतेने भरले आहे. निसर्ग कधी शांत असतो पण एखाद्या वेळी मात्र तो उग्ररूप धारण करतो. पण ज्या वेळी तो शांत असतो त्या वेळी मात्र मनुष्याला त्याचा कडून भरभराट मिळते पण मनुष्याच्या काही गोष्टींच्या अतिरेकामुळे त्याला स्वतःचे अस्तित्व दाखवून द्यावे लागते. एरव्ही मात्र त्या कडून खूप शिकावयास मिळते. अनेक गुणांनी भरलेला असा निसर्ग आहे वृक्ष जेव्हा एखादी व्यक्ती लावते त्यावेळी तिची सावली तो स्वतः घेत नाही परंतु इतरांना त्याचा लाभ काही वर्षानंतर मिळतो. सूर्य उगवतो तेव्हा तो ठराविक ठिकाणीच प्रकाश देतो असे नाही तर संपूर्ण जगाला प्रकाशित करतो, तो प्रकाश देण्यात कधीच भेद करीत नाही पाऊस पडताना एका ठिकाणी पाणी देतो व दुसऱ्या ठिकाणी नाही असे नाही. तहानलेला मनुष्य कोणताही असो त्याची तहान भागविणे हाच पाण्याचा गुणधर्म आहे तो कधी बदलत नाही. एक चांगला व एक वाईट असे तो बघत नाही, पाणी त्याचे काम करीतच राहतो.

असे अनेक चांगले गुण मनुष्याने घेतले तर मनुष्य नक्कीच आदर्श जीवन जगू शकेल. त्यांचा एकमेकांमधील वैरभाव संपुष्टात येईल व तो सुखी होईल. अशा निसर्ग प्रमाणे जगात कार्य करणारे अनेक संतपुरुष सुध्दा आहेत त्यांच्या शिकवणीप्रमाने आचरण केले तरीसुध्दा मनुष्य सुखी होतो. ते सुध्दा मनुष्य सुखी होण्यासाठी मनुष्यांना चांगले उपदेश देत असतात आणि ते उपदेश देताना ते कोणताही भेद करीत नाही. सर्व मनुष्य जातीला ते समान मानतात.

Om Gopalnathay Namah!!!

There is a close connection between Human life and nature. We can learn many things from nature. Nature follows certain rules like change of seasons and day-night change etc. In the same way humans must follow some rules in their lives. Nature is full of variety and diversity. Nature is usually quite but sometime becomes aggressive (heavy rains, extreme climatic changes, flood and draughts etc). When nature is favorable, humans get plenty of resources from it. But when undue advantage of nature is taken (pollution, deforestation, etc) nature has to show its existence (for e.g. climatic changes, global warming etc).

There are many examples to consider about nature. Whenever someone plants a tree, that particular man doesn’t get benefits from that tree but many others people get it. Another example is of planet Sun. Sun never shades light on particular region but lightens whole world. It never discriminates between specific regions. Same thing is with water. It fulfills thirst of everyone, irrespective of person. If humans start inculcating values from nature, they can also live life in an ideal way. There are many spiritual masters present in this world who live their life in natural way. These spiritual masters never discriminate people on any grounds and always preach them the way of living happy life. One can sort all the problems of life by following way of these masters. The almighty god has given power of choice to each of us. Thus, we must decide what to follow and what to ignore. If spiritual way is followed, one can reach up to the god but if negative values are followed, one can also turn into a devil. The choice is yours whether to choose a spiritual way or a devilish one.

Om Jai Ho!



All Rights Reserved. Om Jai Ho Vishwatmaka Parivar