।। ॐ श्री परब्रह्म गोपालनाथाय नमः ।।
सद्गुरूंच्या चरणी शतशः नमन.
मानवदेह जन्माला आल्या बरोबर त्याच्या देहाचे कर्म चालू होते, आणि त्याच्या देहातील श्वास जो पर्यंत चालू असतो तोपर्यंत देहाचे कर्मही चालू रहाते. जसे शरीराच्या बाह्य इंद्रीयांचे कर्म चालू असते तसे शरीराच्या आतील इंद्रीये म्हणजे मन, बुध्दी, चित्त यांचेही कर्म चालू असते. मनुष्याने शरीराचे कर्म थांबवले म्हणजे तो संसार सोडून विरक्त झाला आणि संन्यासाश्रम स्विकारून एका जागी निवांत बसला तरी ही त्याचे आतील इंद्रीयांचे कर्म चालूच असते. कर्म चालू रहाणे हा शरीराचा गुणधर्म आहे. शरीर आहे तोपर्यंत कर्म चालूच रहाते. कर्म करत रहाणे एवढेच मनुष्याच्या हातात असते. त्या कर्माचे चांगले किंवा वाईट जे काही फळ आहे ते मात्र त्याच्या हातात नसते. त्याच्या हातून घडून गेलेल्या कर्मांचा परिणाम त्याच्या हातात नसतो. पण कर्म करायच्या आधी त्याची बुध्दी त्याला सुचीत करीत असते. कोणतेही कर्म चांगले किंवा वाईट हे अगोदर त्याच्या अंर्तमनाला कळत असते. ते कर्म करण्यासाठी किंवा नाकरण्यासाठी त्याच्या अंर्तमनातून एक आवाज येत असतो. पण मनुष्य मात्र त्या आवाजाकडे दुर्लक्ष करीत असतो. त्याच्या मनाला आवडेल तसे कर्म तो करतो. मनुष्याच्या हातुन जे कर्म घडते त्याला इतरही अनेक कारणे आहेत. प्रथम मनुष्याची विचार क्षमता कशी आहे, त्याची वृत्ती स्वार्थी आहे का निस्वार्थी आहे, त्याची संगत कशी आहे व ईश्वरा विषयी त्याचा भाव कसा आहे अशा अनेक कारणांचा त्यात समावेश होतो.
मनुष्याला जे ध्येय प्राप्त करून घ्यायचे असते त्यासाठी तो कर्म करतो. त्यामुळे जशी त्याची वृत्ती तसे कर्म त्याच्या कडून घडते. नेमके कोणते कर्म करायचे हे कळत नसल्यामुळे त्या कर्मांचे परिणामही त्याला भोगावे लागतात. कर्म केल्यानंतर कर्माचे फळ भोगणे वाट्याला आल्यावर त्याचा त्याला खेद वाटत रहातो व इतरांना तो दोष देत बसतो. जगण्यासाठीचे अनेक पर्यांय आहेत त्याचा मनुष्य विचार करत नाही. त्यापैकी एक पर्याय म्हणजे गुरूमार्ग होय. ज्याने परिपूर्ण गुरूमार्गाचा अवलंब केला त्याच्या कडून घडणारी कर्मेही परिपूर्णच होतात. मनुष्य उच्च, मध्यम व कनिष्ठ अशा तीन प्रकारच्या श्रेणींमध्ये कर्म करत असतो. मनुष्याने निस्वार्थपणे केलेले कर्म म्हणजे ज्या कर्मामुळे इतरांना फायदा होतो असे कर्म उच्च श्रेणीचे असते. मनुष्याने स्वतःसाठी केलेले चांगले कर्म हे मध्यम श्रेणीचे असते. आणि मनुष्याने स्वतःच्या लोभासाठी व हव्यासापोटी केलेले कर्म हे कनिष्ठ श्रेणीचे असते. ज्याला परिपूर्ण गुरू लाभतात व गुरूंकडून परिपूर्ण नाम मिळते तो सगळ्या बंधनातून मुक्त होतो. कारण तो जे कर्म करतो ते परमेश्वराच्या स्मरणातच करतो. त्या कर्मासाठी त्याचा कोणताही स्वार्थ किंवा निस्वार्थ नसतो. परमेश्वराच्या स्मरणात केलेल्या कर्माचा कर्ता स्वतः परमेश्वरच असतो. त्यामुळे मनुष्याला त्या कर्माचे चांगले किंवा वाईट फळ याचे सुख-दुःख रहात नाही. गुरूंनी दिलेल्या नामाकडे त्याचे लक्ष लागल्यामुळे कर्मबंधनातून त्याची सुटका होते. एक मुक्त जीवन जगायला तो शिकतो. त्याच्या इच्छा कमी व्हायला लागतात. आणि तो स्थिर व शांत होतो. शरीर-इंद्रियांचे लाड तो पुरवत नाही तर शरीर-इंद्रिय त्याचे एैकतात. व मनुष्य एक निष्काम कर्मयोगाचे जीवन जगतो.
ॐ जय हो!
My respectful bow on the feet of Shree Sadguru !
Karma (deeds) in our life begin from the time of birth. These deeds may be good or bad, but whatever we do comes under Karma. Karma continues till our last breath. Organs in our body perform various activities in day to day life, in the same way mind continuously keeps on thinking which is also kind of Karma. Even if a person takes Sanyasa (Living alone to attain self realization) and sits at a place for meditation, his internal organs still perform karma. Thus performing Karma is prime function of human body. Whatever we do is in our control but the outcome of these things is not in our hands. Before taking any action our inner mind always notifies us about- which one is right thing and which is not, but knowingly – unknowingly we neglect that inner voice and do whatever we like. Karma also depends on various other things like thinking ability, attitude, people around us and finally on our feelings about God.
We always act in the direction of our aim but in this attitude is important, because to achieve certain thing sometimes we are ready to do whatever is required. In this some wrong action is taken and we have to bear outcome from that. After that we regret and blame someone for the cause. Instead of that we can also live life in other ways. Guru-Marga(path shown by Guru) is one of that. The Karmas of the person who follows Guru-marga are perfect and complete. Human Karmas are of three categories; High, Medium and low. The Karma in which a person selflessly does everything and also helps others- comes under higher category, The Karma which a person performs only for himself but is good- comes under medium category and the Karma which person performs selfishly and greedily comes under lower category. The person who gets blessed with perfect Guru and perfect Naam gets released from this cycle of Good or Bad Karma because the person does his every work while remembering God. Thus god becomes the doer of that work and the person doesn't have to worry about outcome off that Karma. His life becomes simple as he concentrates on Naam received from Guru. His desires decrease, finally he becomes quite and stable. He never pays attention towards wants of body but easily controls the body. Finally he starts living life in Nishkaam-Karmayoga(The way of life in which we have to do all things without thinking about outcome and remember God in every situation. Such life is free of worries.)
Om Jai Ho!