।। ॐ श्री परब्रह्म गोपालनाथाय नमः ।।
।। सदगुरू चरणी शतश: नमन ।।
सृष्टीमध्ये सजीव आणि निर्जिव अशा दोन्ही घटकांचा समावेश आहे. सजीव घटकांत सतत बदल होत असतात तर निर्जिव घटक जसे आहेत तसेच राहातात. सजीव घटक निर्माण होतो, हळूहळू विस्तार पावते आणि लयाला जातो. हा परमेश्वराने सृष्टीतील केलेला मोठा चमत्कारच आहे. सजीव घटकात मानवी देहाचा समावेश होतो. मानवी देह लहान गोळाच्या रूपात तयार होतो, पुढे पुढे मोठा होतो आणि वार्धक्याला जावून पुन्हा लयास जातो. देह एका उर्जेपासून म्हणजे चेतनेपासून तयार होतो. देहाच्या आत एक विशिष्ट ऊर्जा कार्य करीत असते. ती देहाची हालचाल व देहाचा विकास करीत असते. ही ऊर्जा म्हणजे शरीराला चालविणारा आत्मा होय. ही ऊर्जा देहाच्या आत वास्तव्यास असल्यामुळे ती उघड्या डोळ्यांना दिसत नाही. त्यामुळे तीला बघायचे झाले तर आणखी परिपूर्ण ऊर्जेची आवश्यकता असते ती ऊर्जा म्हणजे परिपूर्ण गुरू होय. अशा गुरूंची ऊर्जा नामाच्या रूपाने दुसर्या देहामध्ये प्रवेश करते आणि दुसर्या देहामधील ऊर्जेला प्रभावित करते. अशाप्रकारे दुसर्या देहाचा मार्ग आत्मस्वरूपाच्या भेटीसाठी तयार होतो. हा आत्मा शरीरात आहे तो निर्गुण, निराकार आहे. त्याला कोणताही रंग, रूप नाही. परंतू देहात तो कार्यरत आहे, हे मनुष्याला माहीती होण्यासाठी त्याचे प्रतिरूप म्हणजे सगुण रूप तयार केले गेले ते म्हणजे मुर्ती स्वरूप होय. जेणेकरून मनुष्याला बाहेरील मुर्तीस्वरूप पाहून स्वत:च्या आतील निर्गुण रूपाची म्हणजे आत्मस्वरूपाची आठवण राहील व त्या स्वरूपाच्या शोधासाठी तो प्रयत्न करेल. मनुष्याचा आत्मस्वरूपाचा शोध सुरू झाल्यावर त्याच्यात अनेक बदल होतात. मनुष्याच्या बुध्दीत अतीतीव्र पणे जो बदल होतो तो म्हणजे गुरूंनी दिलेल्या नामामुळे. जसे भांड्यातील पाण्यात थोडासा रंग कालवला तर ते पाणी रंगीत होते. तसे नाम शरीरातील इंद्रियांना बदलवित जाते. मनुष्यातील क्रोध, हिंसक स्वभावाला मऊ, शांत बनविते. निर्दई मनुष्याला इतरांवर दया करणे शिकविते. जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी घातक असतात, ज्या गोष्टींचा मानवी जीवनावर वाईट परिणाम होतो. त्या गोष्टीमध्ये परिवर्तन घडते. मनुष्याने योग्य त्याच गोष्टी केल्या म्हणजे योग्य अशी कर्म केली तर त्याचे जीवन सोयीचे व आनंदाचे होते याउलट कर्मे वाईट केली तर जीवन दु:खाचे व अडचणींचे बनते. परंतू कधी कधी चांगली व वाईट कर्मे कोणती हेच मनुष्याला समजत नाही आणि तेच नेमके नामसाधनेने समजते. त्यामुळे मनुष्य योग्य कर्मे करून स्वत:चा उध्दार करून घेतो.
Om Gopalnathay Namah!!!
Nature consists of living and non-living things. There is continuous change in living things while non living things remain unchanged. Living things take birth, expand and their death occurs after some time. This is actually a miracle of creator. Human body is also the same example. It develops from a very small baby to a fully developed adult and after some time reaches to death. Our body consists of a kind of energy on the basis of which its every action depends. This energy is the soul residing inside us. It cannot be seen visibly but can be experienced. To experience it, a special divine energy is required- which is Guru. The energy from Gurudeo passes to Shishya’s (disciples) body in the form of Naam. This Naam is the only way for the person/disciple to get divine experience of Atmaswaroop (Soul). The soul is actually formless and arbitrary but to experience it some form is needed and it is Idol. After watching idol, a person automatically focuses his mind towards soul residing inside his body that is why idols of God are created. As a person begins his search of soul, many changes takes place. The focus of his mind changes rapidly. This change is a result of Naam-Sadhana taught by Gurudeo. If some amount of color is added in a bucket full of water, the color of water changes; in the same way Naam brings changes inside human body and makes the person calm minded and strong. Such person can easily differentiate good and bad deeds. This is the result of Naam- Sadhana which brings reformation in life.
Om Jai Ho!