Friday, January 22, 2016

Spiritual Thoughts (January 2016)

।। ॐ श्री परब्रह्म गोपालनाथाय नमः ।।

अनेक युगांमध्ये ईश्वर प्राप्तीचे अनेक मार्ग सांगितले आहेत. त्यापैकी सत्ययुगात सत्यवचनाने, त्रेतायुगात यज्ञ-हवनाने, द्वापारयुगात कर्मयोगाने आणि कलियुगात नामसंकिर्तनाने भगवंताची प्राप्ती होते. म्हणून कलियुगात ईश्वरप्राप्ती साठी नाम हे घेतलेच पाहीजे. नाम म्हणजे ईश्वरीय  चेतनेचा नाद होय. हे नाम सद्गुरू सतशिष्याला देतात. एकदा का  सतनाम मिळाले की शिष्याच्या जीवनाचा उध्दार होण्याचा मार्ग खुला होतो. त्या नामाचा अभ्यास करायला लागले की अनुभुती यायला लागते.

नाम हे संजीवन आहे. संजीवन म्हणजे त्याला मरण नाही. ( अविनाशी आत्म्याचा शाश्वत नामाने अभ्यास करायचा ही क्रिया फक्त सद्गुरूच सांगू  शकतात. ) एक श्वास – एक नाम, एक पाऊल - एक नाम, एक माळेचा मणी - एक नाम अशा अनेक प्रकारांनी गुरू आपल्याला मुक्ती पर्यंत नेतात. या नामाने ईश्वर काय आहे, कसा आहे हे समजते. सर्व मानवी देहात ईश्वराचे वास्तव्य आत्म्याच्या रूपाने आहे त्या आत्म्याला ओळखता येते. नाम सगळ्यावर रामबाण औषध आहे. माणसाला कितीही दुःख, त्रास, वेदना असल्या तरी नामानेच त्याची तीव्रता कमी होते. नामाने भक्ती निर्माण होते. भक्ती आली की मुक्ती आपोआप येते. आपला जन्म का झाला हे कळते मग जीवनात ध्येय काय ठेवायचे हे समजते. सगळ्यांमध्ये ईश्वर भरला आहे हे कळते मग माणूस एकमेकांचा तिरस्कार करायचा सोडतो. पण या सगळ्यांसाठी नामाला थोडा वेळ द्यावा लागतो. आपला थोडा तरी वेळ सद्गुरूंना अर्पण करायला लागतो. संसारातल्या घडामोडीतून जरा वेळ काढून सदगुरूंना अर्पण केला तर त्यांची कृपा झाल्याशिवाय रहात नाही. 

ॐ जय हो!


Since from ancient times there were many ways conveyed to inherit the creator. Out of that, in Sat-yuga by Satyavachana, in Tretayuga by Yagya-Havana, in Dwaparyuga by Karma yoga and in Kaliyuga by Naamsankirtana- are the ways to reach up to the God. Thus, in Kaliyuga Naam Japa (repeating) is very much important. Naam is the sound of God's consciousness. Sadguru passes this Naam to Sadshishya. Once Shishya gets holy Satnaam, the reformation of his life starts. When we start practicing Naam-Kriya we start getting experiences from it.

Naam is Sanjeevan and Sanjeevan means immortal. (The method of studying about immortal soul with the help of Naam can be only taught by sadguru.) One breath-one Naam, One step-one Naam, One Bead-one Naam are the ways by which Sadguru takes us towards Mukti( Mukti is freedom from 84 lakhs birth-death cycle). Naam is the medium by which we get to know- Who and How is the God. God is present in the form of soul in everybody and his presence can be experienced. Naam is Elixir for all sorrows, difficulties and pains. If we have Naam, we can easily overcome all these difficulties. Once we start practicing Naam-Kriya, devotion gets created in us, this devotion advances us forward towards Mukti. And then we understand why we are born and what should be the aim of our life. Further we come to know that god dwells in everybody and we stop hating each other. To get this divine bliss, we have to spend some time for Naam-Kriya and for our sadguru. We get blessed with goodness if we bestow sometime for sadguru from our daily routine.

Om Jai Ho!



3 comments: