Monday, February 1, 2016

Spiritual Thoughts (February 2016)

।। ॐ श्री परब्रह्म गोपालनाथाय नमः ।।

माझ्या आदरणीय सदगुरूंच्या चरणी माझे अनंत प्रणाम. प्रत्येक मानवी देहामध्ये ईश्वराचे वास्तव्य आहे. त्याला जाणण्यासाठी त्याची भक्ती ही करावीच लागते. ईश्वराला जाणून घ्यावेच लागते. आणि ईश्वराची ओळख फक्त गुरूच करून देतात. ईश्वराने मानवाला अनेक प्रकारचे सुख व दुःख जीवनात दिलेली असतात. मनुष्य सुखाचा विचार कमी व दुःखाचा विचार अधिक करतो. मनुष्याच्या संपूर्ण आयुष्याकडे पाहिले तर प्रत्येक मनुष्याला एकतरी दुःख असतेच, एकतरी उणिव प्रत्येकाच्या जीवनामध्ये असते. आणि ते जर सोडले तर बाकी मात्र ईश्वराने मनुष्याला परिपूर्ण आयुष्य दिलेले आहे. अर्थात या जन्मी जे जीवन मिळालेले आहे ते मागिल अनेक जन्मांच्या कर्मांवर अवलंबून असते. जसे मागिल जन्माचे कर्म तसे त्याला या जन्मात जीवन मिळते. क्षणोक्षणी माणूस स्वतःच्या जीवनात असणा-या उणिवांचा किंवा दुःखांचा विचार करत असतो. असे करताना त्याच्यापुढे कितीतरी आनंदाचे क्षण येऊन जातात पण त्याकडे त्याचे लक्ष जात नाही. असे अनेक आनंदाचे क्षण तो वाया घालवतो. ईश्वराने मनुष्याला जो आनंदाचा क्षण दिलेला आहे तो जगायला मनुष्य विसरतो. व फक्त आयुष्यभर दुःखाची आठवण ठेवून जगत राहतो. मला इतरही आनंदाचे क्षण ईश्वराने दिलेले आहेत हे तो विसरून जातो. दुःख विसरून उरलेल्या आनंदाचा विचार करून जर माणूस जगू लागला तर तो नक्कीच सुखी होईल. माझ्याकडे काय नाही याचा विचार मनुष्य अधिक करतो आणि या विचारात त्याच्याजवळ काय आहे हे तो विसरून जातो.

मनुष्य स्वभावगुण असा आहे की; तो वर्तमानकाळामध्ये न जगता नेहमी भविष्यकाळामध्ये किंवा भूतकाळामध्ये जगतो. म्हणजेच मागे ज्या गोष्टी घडून गेल्या त्याचा विचार करणे किंवा पुढे काय होईल याचे स्वप्न रंगवत रहाणे. म्हणजेच कल्पनेचा आधार घेवून तो जगतो म्हणून तो दुःखात राहतो. सुखी होण्यासाठी वर्तमाना काळा मध्ये जगणे गरजेचे असते. आणि वर्तमाना काळा मध्ये कसे जगायचे हे शिकवणारे फक्त गुरूच असतात. गुरू शिष्याला वर्तमान काळात जगण्याची कला शिकवतात. म्हणजे गुरू जे नाम शिष्याला देतात त्या नामाचे स्मरण करता करता शिष्य वर्तमानात कसे जगायचे हे शिकतो. नाम जसजसे वाढते तसतसे शिष्याला शरीरातील उर्जेची जाणिव होते. या उर्जेमुळे त्याची शाश्वत ज्ञानाकडे वाटचाल होते. आणि भगवंताविषयीची त्याची भक्ती वाढते. याच नामास्मरणाने स्वतःमधील सामर्थ्याचा अनुभव त्याला येतो. मनुष्य मनाने कितीही दुबळा असला तरी नामाच्या सहाय्याने तो सामर्थ्यवान होतो. त्याचा भगवंताविषयीचा विश्वास त्याला अनेक संकटांना, अडचणींना सामोरे असे जायचे हे शिकवतो. मनुष्य स्वतःपेक्षा इतरांचा आणि इतरांच्या भावनांचा विचार अधिक करू लागतो. जे जीवन त्याला जगावयास मिळालेले आहे ते तो आनंदाने स्विकारतो. त्यामुळेच भगवंता विषयी व स्वतःच्या जीवनाविषयी त्याला कोणत्याही प्रकारची तक्रार राहत नाही.

ॐ जय हो!


Firstly, I will bow down my head on my respected Sadguru's feet with infinite greetings. God exists in every human body in the form of soul. To know him, we must get devotional and our Guru can only help us to identify the real god. God adds happiness and sorrows in the life of human beings but they mostly think about sorrows and very less about happiness. If we focus on whole life of any human being, we can observe that each of us have some kind of sorrows or shortcomings in our life. If we leave that part then we can realize that God has made rest of our life perfect. In fact, the present life which we have got in this birth is the result of all our deeds in previous births and also mostly depends on those deeds. At every moment people think about difficulties, shortcomings or sorrows in life thus, they do not pay attention towards many cheerful moments which come in front of them. They forget to live those happy or joyful moments which God has given in their lives. Our life will surely get comfortable and contented if we forget about sorrow and focus on bliss which we have got. We think more about what we do not have and in this we forget what we actually have.

Instead of living in present, all human beings mostly have tendency of living in past and future. It means people keep on thinking about things experienced in past and dreams about future. In short, they live life on the basis of imaginations and this is the main reason behind sorrow. If we really want to remain happy then we should learn to live in present and Our Guru is the only person who can teach us- how to live in present. Guru gives Naam to Shishya(Disciple) and by remembering this naam(Naam-Smarana), Shishya learns the art of living life in present. As Shishya increases Naam japa(Repeating continuously), he gets experience of energy in his body. This energy proceeds the Shishya in the way of gaining real spiritual knowledge and his devotions towards god begin to generate. This is the power of Naam-Smarana which makes Shishya to realize the inner strength hidden within. However weak minded, a person may be but Naam-Smarana makes him strong. Eventually his faith on God goes on increasing and this faith teaches him to face difficulties and troubles in life. Further he starts thinking more about others and cares about their feelings rather than himself. He accepts the life however it is and remains happy from whatever he gains. That is why he never has any complaints about God or his own life.

Om Jai Ho!



5 comments:

  1. खूप छान मासिक विचार. ओम जय हो !

    ReplyDelete
  2. True & practical thought, very nice

    ReplyDelete
  3. वर्तमानात जगा
    भविष्याची चिंता आहे कोणाला ?
    ॐजयहो

    ReplyDelete
  4. वर्तमानात जगा
    भविष्याची चिंता आहे कोणाला ?
    ॐजयहो

    ReplyDelete
  5. Omjaiho! Please mention ur Name or email id in ur comments...Aditya Deshpande

    ReplyDelete