।। ॐ श्री परब्रह्म गोपालनाथाय नमः ।।
।। गुर्रूब्रह्मा गुर्रूविष्णू गुर्रूदेवो महेश्वरः ।।
।। गुर्रूसाक्षात परब्रह्म तस्मैःश्री गुरवे नमः ।।
माझ्या परमप्रिय सद्गुरुंच्या चरणी आदर युक्त नमन.
परमेश्वराने सुंदर अशी सृष्टी निर्माण केली आहे. आणि या सुंदर सृष्टीमध्ये मानवाची निर्मिती केली आहे. या मानवाला जगण्यासाठी आवश्यक असणा-या सर्व गोष्टींची निर्मिती ईश्वराने केली. अनेक प्रकारची सुख व दुःख निर्माण केली. ज्या मानवाला ईश्वराने निर्माण केले तो ईश्वर कसा आहे? आणि त्याच्यापर्यंत पोहचायचे कसे? हे जाणण्यासाठी 'गुरूतत्वाची' निर्मिती झाली. साक्षात परमेश्वराचे दुसरे रूप म्हणजे गुरू होय. मनुष्याचे जीवन सहज व सुखकर कसे होईल यासाठी गुरूतत्व निर्माण झाले. मनुष्य आणि ईश्वर यांच्यातील 'दुवा' म्हणजेच गुरू होय. या गुरूतत्वाला परमेश्वराने परब्रह्माचा दर्जा दिला आहे. गुरूंशिवाय परमेश्वर कळूच शकत नाही.
मनुष्य देहाची जसजशी वाढ होत जाते त्याप्रमाणे त्याच्या देहाच्या मागण्याही वाढत जातात. आणि तो त्या मागण्या पुरवत जातो. त्या पुरवण्यासाठी तो अनेक प्रकारची चांगली वाईट कर्मे करतो. त्यामुळे सुख-दुःखाच्या फे-यात तो अडकून जातो. यातून जर ख-या गुरूंचा लाभ झाला. तर मनुष्य देहाला नेमके काय गरजेचे आहे ते गुरू शिकवतात. गुरू शिष्याला नामरूपी अमृत देतात. या नामरूपी अमृताने मनुष्यामधील विषयरूपी विषाचा नाश होतो. मनुष्याचा सर्वांगीण विकास होतो. त्याची बौध्दीक पातळी वाढते. त्याचबरोबर त्याची मानसिकता सुध्दा बदलते. गुरू भेटण्यापूर्वी मनुष्य फक्त स्वतःचा विचार करत असतो. पण गुरू भेटल्यानंतर तो प्रथम इतरांचा विचार करायला लागतो. स्वतःसाठी जगणा-या मनुष्याला जीवनामध्ये गुरू लाभले तर त्यांच्या शिकवणीमुळे दैनंदिन जीवनातही मनुष्याला परमेश्वराचे सतत स्मरण राहते. जीवनामध्ये कितीही कठिण परिस्थिती आली, तरी परमेश्वराचे सतत स्मरण होत असल्याने मनुष्य कोणत्याही परिस्थिती मधून सहजपणे बाहेर पडतो. दैनंदिन व्यवहारामध्ये मनुष्याच्या हातून काही चुका होतात. त्यांबद्दल बाह्यजगात त्याला त्याच्या कर्मांचे फळ मिळते. परंतू तो मनुष्य जर गुरूंना शरण गेला तर त्याला गुरू तत्क्षण माफ करून जवळ करतात.
गुरू शिष्याला नामाचे दान देतात त्या नामाचे स्मरण शिष्याने सतत करावे असे गुरूंना वाटते. गुरू फक्त देण्याचेच कार्य करत असतात. ते दान ज्याला दिले त्याने ते कितीही वाटले तरीही ते संपत नाही. त्या नामातूनच भक्ती निर्माण होते. भक्ती आणि नाम यांचा संगम झाल्यावर मनुष्य भगवंताशी एकरूप होऊन जातो तो फक्त गुरूंमुळेच.
ॐ जय हो!
।। Gururbrahma Gururvishnu Gururdevo Maheshwarah ।।
।। Gurursakshat Parabramha Tasmayshree Gurave Namah ।।
My respectful bow on the feet of Shree Sadguru !
The almighty God has created this wonderful nature. In this favorable nature he created Humans, for humans he created all the essentials. He also created situations of happiness and difficulties in life. To make humans aware about existence of God and also about the process to reach up to God 'Gurutatva' came into existence. The betterment of human life was also important reason for origination of Gurutatva. Guru is the incarnation of Almighty god, in the same way Guru is the medium between Humans and God. The almighty has recognized Guru as Parabrahma. We humans cannot understand the existence of God without Guru.
Human body grows continuously and so its needs also. While fulfilling these needs people carryout many good and bad deeds. In this process they remain engaged in the good and bad situations. During this, if by chance they are blessed with Guru then what actually is needed in their life is understood. Guru gives Naam to Shishya (Disciples) which purifies their body and mind. This Naam brings out overall development of disciples: their mental power increases also their way of thinking changes. Before meeting Guru, people generally think about themselves. After getting Anugraha (Process of receiving Naam from guru) these people primarily think about others then about self. This preaching of Gurudev induces habit of remembering Almighty in daily routine. Remembrance of Almighty god makes people very strong so that they can face and handle hardest situations in life. A man commits mistakes in day to day life and has to bear the outcomes from it. But if he is true Disciple then his mistakes are forgiven by mercy of Gurudev.
Guru blesses his Disciples with divine Naam and wishes that his Disciples should remember Naam in every situation. Secondly, Guru always does the work of giving(Naam) and preaching the way to reach up to Almighty God. This knowledge is further shared by disciples but doesn't get reduced at all. Further, Bhakti(Devotion) is generated from this Naam. Finally because of Guru, Naam and Bhakti combines and makes a Disciple congruent with God.
Om Jai Ho!
No comments:
Post a Comment