Wednesday, June 1, 2016

Spiritual Thoughts (June 2016)

।। ॐ श्री परब्रह्म गोपालनाथाय नमः ।।

माझ्या परमप्रिय सद्गुरुंच्या चरणी आदर युक्त नमन.
माणसाच्या आयुष्यात दोन मार्ग असतात. एक मार्ग शाश्वत सुखाचा असतो आणि दुसरा अशाश्वत सुखाचा असतो. दोन्ही सुखाचेच मार्ग आहेत. पण एक ख-या सुखाचा आहे आणि एक क्षणिक सुखाचा आहे. माणसाला नेहमीच क्षणिक मार्ग जवळचा वाटतो. तो सोपाही असतो; पण कायमस्वरूपी नसतो. क्षणिक सुखामध्ये अनेक प्रकारची ध्येये असतात पण ती सगळी संसाराशी निगडीत असतात. आणि संसाराशी निगडीत असणारी सुख येतात व जातात. अशा सुखांमध्ये नाना प्रकार असतात. कोणाला धन – संपत्ती मिळविण्यात सुख वाटते, कोणाला समाजामध्ये मोठेपणा मिळविण्यात सुख वाटते, कोणाला सगळ्यांमध्ये श्रेष्ठ वक्तृत्व करण्यात सुख वाटते आणि कोणाला आपले अस्तित्व जगाला दाखवून देण्यात सुख वाटते. आणखी अनेक कितीतरी प्रकारची सुख आहेत. प्रत्येकाच्या बुध्दीमत्तेप्रमाणे सुखाची संकल्पना असते. या सगळया सुखांच्या प्राप्तीलाच मनुष्य शाश्वत सुख मानत असतो. ही सुखं या जन्मीच्या या देहापुरतीच निगडीत असतात. म्हणजेच ती शाश्वत नसतात.

शाश्वत सुखाचा मार्ग म्हणजेच सत्याचा मार्ग तो दिसायला थोडा कठिण दिसतो, अवलंबायला कठिण वाटतो. पण ज्याच्या अंगी सामर्थ्य असेल त्याला तो सुलभ असतो. आणि हे सामर्थ्य मानवामध्ये निर्माण करून देणारे सद्गुरू असतात. ते शाश्वत सुखाचा मार्ग चालू करून देतात. ज्यावेळी शाश्वत सुखाचा म्हणजेच नामाचा मार्ग चालू होतो. त्यावेळी शाश्वत काय? आणि अशाश्वत काय? हे मानवाला समजायला लागते. जो सद्गुरूंनी दिलेल्या मार्गावर चालतो त्याला कशाचीही भीती किंवा चिंता राहत नाही. सद्गुरूंनी दिलेल्या नामाचा मार्ग परिपूर्णते कडे नेणारा असतो. ज्या मनामुळे मानवाला अनेक गोष्टी मिळविण्याची लालसा असते. ते मनच नामाला अर्पण होते त्यामुळे इतर गोष्टींकडे लक्षच राहत नाही. त्याला धन – संपत्ती सहज मिळाली तरी आनंद असतो आणि नाही मिळाली तरी दुःख नसते. मोठेपणाची लालसा त्याला नसते. जगात सर्वश्रेष्ठ आणि शाश्वत फक्त एक ईश्वरच आहे आणि बाकी सगळे अशाश्वत आहे हे त्याला समजते.

मान – अपमानाची त्याला फिकीर नसते. सहज जीवन जगण्याची कला त्याला जमते. नाशवंत प्राप्तीच्या मागे तो लागलेला नसल्यामुळे दुःख त्याला येत नाही किंवा दुःखाची जाणिव त्याला राहत नाही. त्याचे ध्येय या जन्मापुरते नसते तर या जन्मातून मुक्त होवून इतरांना मुक्तीचा मार्ग देणारे असते.

ही शिकवण त्याला सद्गुरूंच्या कृपेने मिळालेली असते या कृपेने आपण ईश्वरापर्यंत पोहोचणार आहोत हे त्याला कळते आणि हीच सद्गुरूंची कृपा आपल्या सर्व मानवजातीला मिळावी म्हणून तो अथक प्रयत्न करतो.

ॐ जय हो!


My respectful bow on the feet of Shree Sadguru !
There are two ways in human life. One goes near eternal happiness and other one is of false happiness. This happiness is momentary but people always find this way easy. This way keeps many aims in front of us but all of these are related to worldly affairs. These provide many types of pleasures. One may feel happy in gathering money and properties; one may feel happy in having frontage over society; one may feel in delivering speeches better than others or someone might get pleasure in making everyone aware of his existence. Different people have different ideas about happiness according to their intelligence. People think happiness lies in accomplishing all these things or making ideas into reality. But actually all these physical pleasures and desires are limited up to present human birth only.

The way of eternal peace seems somewhat difficult to walk on, but one having strong inner strength may find it easy. Such inner strength is generated only because of Sadguru. This way of eternal happiness means way of Naam (after Anugraha one gets Naam), which makes a person complete and leads toward perfection. When one begins journey towards real happiness, he becomes able to differentiate between real and fake things. Such eternal way shown by Sadguru is free of fear and worries. Desires in human beings are emerged from the mind but when this mind is engrossed in Naam, nothing else comes in mind. There remain no worries about wealth and assets, whether these increase or decrease. The attitude of showing self importance in front of others also reduces and finally mind realizes that God is the only real Supreme Being in this world./p>

In this manner, simple way of living life is automatically followed by the person. Mind remains neutral in all situations of ups and downs in life. The person doesn't care about respect or admiration from others. Now his aims are not limited up to present life, as he aims for Mukti- which is final liberation from continuous birth-death cycle. In same way he also wants his belongings to follow this path of Mukti so that they can also experience the eternal peace and bliss.

The reason behind all this transformation is Sadguru. He realizes that he is going to reach up to God one day only because of Sadguru. He starts taking effort to spread this knowledge to mankind.

Om Jai Ho!



No comments:

Post a Comment