Tuesday, September 6, 2016

Spiritual Thoughts (September 2016)

।। ॐ श्री परब्रह्म गोपालनाथाय नमः ।।

माझ्या सद्गुरू नाथांच्या चरणी माझे शतशः नमन.
सृष्टी अनेक प्रकारांनी नटलेली आहे. या सृष्टीमध्ये अनेक घटक समाविष्ट आहेत. या आपल्या सृष्टीत नेहमीच बदल होत असतात. या सृष्टीतील घटकांमध्ये मानवाचाही समावेश आहे. ज्या पंचमहाभूतांची मिळून सृष्टी बनली आहे. तीच पंचमहाभूते मिळून मानव देह तयार होतो. मानवी देहामध्ये रोज नवीन बदल होत असतात. मानवी देह दिवसेंदिवस वाढत जातो; हा या देहाचा मोठा बदल होय. सृष्टीतील व मानवी देहातील बदल हे त्यांच्यातील असलेल्या चैतन्याने होत असतात. देहातील चैतन्याने देहाच्या सर्व अवयवांना चालना मिळत असते. हे चैतन्य आपल्या उघड्‍या डोळ्यांनी पाहता येत नाही तर त्यासाठी अंर्तचक्षुंची गरज असते. शरीरातील चैतन्य मानवाला जाणता येते. पण त्यासाठी त्याला गुरूंची आवश्यकता असते. गुरूकृपेमुळे मानवाचे बाहेरील लक्ष कमी होवून देहाच्या आत त्याचे लक्ष लागते. गुरूंनी दिलेल्या साधनामुळे आनंदाचा अनुभव त्याला येतो. एक निस्सिम शांतीचा अनुभव त्याला येतो. जो आनंद बाहेरील अन्य साधनांनी मिळत नाही तो एका गुरूंनी दिलेल्या साधनेने मिळतो.

गुरूकृपेच्या आधी मन जसे मानेल तसे माणूस जगत असतो. योग्य अयोग्य यांचा विचारही नसतो. पण गुरूंनी दिलेली साधना केल्यामुळे त्याला देहातील इंद्रियांवर ताबा मिळविता येतो. त्याचे जगण्याचे ध्येय निश्चित होते. त्याला जगण्याची दिशा मिळते. शरीरातील मन, चित्त, बुद्धी, विचार यामध्ये परिवर्तन होते. मन चांगलेच विचार करते. कुबुद्धी नाहीशी होते, चित्त निर्मळ होते. बुद्धी नाना प्रकारचे शोध लावते. आजच्या विज्ञान युगात मानवाने अनेक मोठेमोठे शोध लावले आहेत ते फक्त त्याच्या आतील शक्ती व बुद्धी मुळे. त्याच्या शरीरात जी उर्जा आहे त्या उर्जेमुळे असाध्य गोष्टीही साध्य होतात. मानवाच्या विचारांमध्ये परिवर्तन होत जाते. मानवाच्या संपूर्ण आयुष्यात जो काही बदल होतो तो फक्त त्याला मिळालेल्या साधनेने. यामुळेच मानवाचे अज्ञान हळूहळू नाहीसे होऊन ज्ञानाकडे त्याची वाटचाल होते.

ॐ जय हो!


Pranaam on the feet of Shree Sadguru!
Nature is fascinating diversity of living as well as non living things. Changes constantly take place in it. Nature is made up of five elements. In the same way, human body is also made up of five elements. Likewise nature, changes also take place in human body. Lots of things grow continuously in nature. Size of our body increases day by day. Such changes in human body as well as in nature are due to Chaitanya (spirit/divine energy) in them. All organs in our body work because of it. This Chaitanya can be seen with help of inner vision, but Guru (Spiritual Master) is needed for that. Preaching given by Gurudev helps to divert mind from outer world which increases inner concentration. Further it gives experience of Chaitanya in the form of peace and divine contentment. This joy cannot be replaced by any other thing in the world.

Before Gurukrupa, (meeting Guru and getting spiritual knowledge) we live life according to our mind, there are no thoughts about fair and unfair things. But as we start doing Sadhana (meditation and other activities taught by Guru), needs of our body are reduced due to control over the mind. In this way our life gets right direction and the actual meaning of human birth is realized. All this happens due to changes in Mana-Chitta-Budhhi( Mind and intellect). Gradually, our mind starts thinking only about good things. New ideas are emerged. Scientists have discovered and invented many things, but how? The only answer is- the inner power or Chaitanya. This power can make impossible things possible. As we start getting experiences of this power, our life totally changes. Ignorance reduces and spiritual knowledge increases.

Om Jai Ho!



No comments:

Post a Comment