।। ॐ श्री परब्रह्म गोपालनाथाय नमः ।।
सृष्टीची रचना करणा-या ईश्वराला भेटण्याची ईच्छा प्रत्येकाला असते. मनुष्याला रोज काहीतरी नविन अनुभवण्याची आस असते. सृष्टी निर्माण होणे, सृष्टीमध्ये मानवाची निर्मिती होणे हा एक मोठा चमत्कारच आहे. हा चमत्कार घडविणारा ईश्वर सर्व गोष्टींमध्ये व्यापलेला आहे. पण नुसत्या उघड्या डोळ्यांनी तो दिसत नाही. त्या ईश्वराला जर बघायचे असेल, जाणायचे असेल तर गुरूंची आवश्यकता असते. गुरूंच्या आशिर्वादाशिवाय मनुष्य ईश्वराला जाणू शकत नाही. ईश्वराला जाणण्यासाठी गुरू शिष्याला साधना देतातं ती साधना म्हणजे नाम होय. या नामाचे गुरू रोज मनन, चिंतन करावयास लावतात. म्हणजेच नामस्मरण करण्यास शिकवतात. या नामस्मरणाने जिवनाच्या बदलास सुरूवात होते. प्रथम मनुष्य स्वतःच्या आचरणाकडे लक्ष देतो, स्वतः मधील गुणांचे परिक्षण करतो, म्हणजेच तो आत्म परिक्षण करायला लागतो. मनुष्याचे आचरण व गुण हे सर्वस्वी त्याच्या शरीराच्या आतील इंद्रियांवर अवलंबून असतो. शरीराच्या आतील मन हा अवयव सर्वात जास्त महत्वाचा आहे व क्रियाशीलही आहे. मन हेच सुखाचे व दुःखाचे कारण आहे. नामस्मरणानेच मनाचे कार्य बदलण्यास सुरूवात होते. अत्यंत क्रियाशील असणा-या मनावरच प्रथम नामाचा प्रभाव सूरू होतो. मनाच्या आवडी-निवडी कमी होतात व मन शांत राहते.
मनाबरोबरच शरीरामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर हे सहा विकार असतात. मन नामाशी जोडण्याने ह्या विकारांवर सुध्दा ताबा मिळवता येतो. या विकारांचा शरीरावर होणारा प्रभाव कमी व्हायला लागतो. आणखीही शरीरात असे काही अवयव असतात जे नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत. पण अनुभवता येतात आणि मनुष्याच्या आचरणावर त्यांचा परिणाम दिसून येत असतो. परंतु, नामस्मरणाने शरीराच्या दिसणा-या व न दिसणा-या अवयवांवर सुध्दा प्रभाव पडत असतो. हे साध्य होते फक्त गुरूंमुळेच. गुरू असामान्य असतात आणि सामान्य मनुष्याला सुध्दा ते असामान्य बनवतात. असे जीवन जगण्याचा अधिकार ईश्वराने सर्व मानवजातीला दिला आहे. मानवजातीमध्ये स्त्री, पुरूष किंवा अर्ध-नारी नटेश्वर हे सगळेच गुरूंचा पुर्ण अनुग्रह प्राप्त करून ईश्वरापर्यंत पोहचु शकतात.
ॐ जय हो!
Everyone has a wish to once meet or to see the creator of this wonderful nature. The formation of this nature, the creation of Human body and also frequent changes in these two is big wonders of nature. The creator of these wonders is omnipresent but not visible to our eyes. To know and to experience the existence of Creator or God, Guru (Spiritual Master) is needed. Guru gives Sadhana to Shishya (Disciple). This Sadhana is Naam. Thus Guru teaches the way of NamaSmarana- which means continuous repeating and remembering of Naam in our routine life. Due to this NamaSmarana many changes occur in our lives. Firstly people start self analysis- How is my behaviour? What are my good qualities? Where do I lack? Are some of the examples in self analysis. Human behaviour and qualities totally depend on mind and other internal organs. Mind is very important organ in human body: which is very sensitive as well as active. Mind is the only reason for our sorrow and happiness. NaamSmarana firstly shows effects on mind. It reduces the choices and desires emerging from mind. In this way mind starts to search the real God. No matter with the amount of workload and tensions in day-to-day life, NaamSmarana keeps the mind calm and quiet.
Likewise mind there are also Shadripus (6 enemies) in our body. These are: Kaam (Lust), Krodh (Anger), Lobh (Greed), Mada (Arrogance), Moha (Attachment), Matsar (Jealousy). These Shadripus highly affect our behaviour. If our mind is constantly in contact with Naam, we can control these enemies. Along with these, there are some more invisible organs in our body which we can only feel or experience. These also affect on behaviour. But NaamSmarana bring changes on our behaviour by controlling all such organs. All this becomes possible only because of Guru. Gurudev is extraordinary and also transforms common people to extraordinary ones. All men, women and thirdgender are given equals rights by God to live such balanced and controlled life. All of them can take Anugraha from Guru and can reach up to the God.
Om Jai Ho!
No comments:
Post a Comment