Friday, January 18, 2019

Spiritual Thoughts (January 2019)

।। ॐ श्री परब्रह्म गोपालनाथाय नमः ।।

जितक्या व्यक्ती तितक्याच प्रकृती म्हणजेच मानव जेवढे आहेत तेवढेच स्वभावाचे प्रकार आहेत, एका मनुष्य देहात अनेक प्रकारचे गुण असतात. कुठल्याही एका गुणांनी मनुष्य बनलेला नसतो. या गुणांमध्ये राग, लोभ, मोह, मद, मत्सर, शांतपणा, स्थिरता, गंभीरपणा, स्वच्छंदीपणा, मोकळेपणा, हसरेपणा, कपटीपणा यांचा व इतरही अनेक गुणांचा समावेश असतो. मुष्याचा प्रत्येक गुण हा त्याच्या परिस्थितीवर अवलंबून असतो म्हणजे ज्या ज्या वेळी जी परिस्थिती त्यावेळी तो गुण बाहेर पडतो. मनासारखे घडले असता मनुष्य मनोसोक्त आनंदी होतो व मनमुक्त हसतो तेच उलट मनाविरुध्द घडले तर तो त्वरीत क्रोधित होतो. या गुणांमधे काही गुण हिताचे तर काही गुण अहिताचे असतात. म्हणजेच पतरस्थिती प्रमाणे गुणांमधे बदल केला तर फायदा हा होतो अन्यथा मुष्याचा तोटा होतो. उदाहरणार्थ एका मनुष्यामधे अनेक चांगले गुण आहेत म्हणजेच तो दयाळु आहे, परोपकारी आहे, इतरांच्या मदतीला धावून जातो असा मनुष्य लोकप्रिय होतो. परंतु त्याच मनुष्याचा स्वभाव जर शीघ्रकोपी असेल किंवा कधी कधी अचानक त्याचा क्रोध बाहेर येत असेल तर आधीच्या सर्व गुणांवर मात होते व त्याचा शीघ्रकोपी स्वभाव अधिक प्रदर्शनीय ठरतो. एक गुण जर तोट्याचा असेल तर मागच्या सर्व चांगल्या गुणांवर तो भारी पडतो. चांगले गुण झाकले जातात व वाईट गुण प्रदर्शनीय ठरतो काही प्रसंगी तर मनुष्याचा जीवनातील परिस्थिती मनुष्याच्या आवाक्याबाहेर जाते. सुरळीत चालु जीवनात त्याच्या स्वभावामुळे अनेक अडचणी येतात. मनुष्याला स्वत:मधील वाईट गुणांचे परिक्षण करता आले तर त्यावर तो मात करु शकतो. मनुष्याने दरोराज ॐ काराचा जप केला तर त्याच्यातील गुण समान होतात.

मु्‌ख्य जे तीन गुण सत्वगुण, रजोगुण, तमोगुण या गुणांना एक समान स्तरावर ठेवण्याचे काम ॐ कार करतो. हे तीन गुण जर समान झाले तर त्यातून निर्माण होणारे इतरही गुण समान होतात म्हणजेच ज्या परिस्थिती साठी जो गुण आवश्यक आहे त्याच परिस्थितीला अनकुल असा गुण मनुष्यातून बाहेर येतो व त्यातून त्याला फायदाच होतो. कारण मनुष्याला फक्त चांगल्याच गुणांची आवश्यकता आहे असे नाही, तर वेळप्रसंगी वाईट गुणही कामास येतो. उदा. आपल्यावर जर अन्याय होत असेल तर वेळप्रसंगी आपला राग व्यक्त करावा लागतो तिथे शांत राहून चालत नाही. परंतू त्याचा वापर मनुष्याच्या बुध्दीमत्तेवर अवलंबून आहे आणि बुध्दीत बदल घडविण्याचे कार्य ॐ काराने होवू शकते, त्यासाठी प्रत्येकाने रोज ॐ काराच्या नादाचा सराव केलाच पाहिजे.

Om Gopalnathay Namah!!!

Nature of every person is different as everyone behaves differently. Also each one has various qualities and behavior patterns. These consist of anger, greed, jealousy, peacefulness, stability, shyness etc. Each of these depends upon the situation. The way of behavior changes with respect to situation. Favorable things make people happy, while unfavorable things make them angry. If a person is able to change himself with situation then life becomes easy. For e.g. If a person is helpful and kindhearted; helps everyone then he becomes famous but if the same person is short-tempered or suddenly becomes much angry, then all the fame goes in vain and also the good qualities are lost. A single bad habit or quality can hide all the good things. Sometimes people have to face difficult situations in life. This is the testing time in which true behavior and qualities of people are seen. Self-analysis can help a person to solve the problems in life. Daily practice and recitation of ‘Om-Kaar’ helps to balance good and bad qualities of behavior.

Raja, Tama and Satva are the three basic components in every human body on which the behavior depends. If these three components are balanced then the qualities emerging from them also get balanced. Thus the quality or way of behavior required as per situation comes out. Every time good quality is not useful. For e.g. If a person is facing injustice then in this situation, good quality is not useful, he has to show anger and fight against the injustice. This process totally depends on intelligence and presence of mind. Daily Recitation of ‘Om-Kaar’ makes mind stable and intelligent, so everyone should do it regularly.

Om Jai Ho!



All Rights Reserved. Om Jai Ho Vishwatmaka Parivar

1 comment: