।। ॐ श्री परब्रह्म गोपालनाथाय नमः ।।
आध्यात्मिक जीवन स्विकारणे म्हणजे परमेश्वर प्राप्तीच्या मार्गाचा अवलंब करणे होय. या मार्गाची वाटचाल व्यवस्थित व्हावी म्हणून शरीर ही महत्वाचे आहे. मनुष्याचे शरीर सक्षम असेल तर मनुष्य आध्यामिक वाटचाल व्यवस्थित करून स्व:ताचे व्यव्तिगत जीवन उत्कृष्ट पध्दतीने जगु शकतो. शरीर हे एका यंत्राप्रमाणे आहे. जसे यंत्राला सुरळीत चालण्यासाठी तेल, पाणी वेळेवर बघावे लागते आणि यंत्रात जर काही बिघाड झाला तर ते बंद पडू नये म्हणून त्याची दुरूस्ती करून घ्यावी लागते. तसेच शरीराचे आहे. मुख्यत: शरीरात बिघाड होणारे अवयव म्हणजे मन, चित्त, बुध्दी होय. कारण या तिनही अवयवावर शरीर अवलंबून आहे. मनाचा परिणाम चित्तावर होतो. आणि जसे चित्त असेल तसे बुध्दीचे कार्य चालते. आणि हे तिन्ही व्यवस्थित असेल तर शरीरही सुरळीत चालते उदाहरण जर घेतले तर मनुष्याने स्वत: डोळ्याने एखादा अपघात बघीतला किंवा त्याच्या मनावर आघात होणारी एखादी घटना घडली तर मन दु:खी होते. कुणी मन दुखावले तर मन नाराज होते. यामुळे दु:खी मनाचा चित्तावर परिणाम होतो. आणि चित्त अस्थिर होते. अशा अस्थिर चित्ताने बुध्दीचे कार्य बिघडते व बुध्दीची काम करण्याची क्षमता कमी होते. या सगळ्यांचा शरीरावर खोलवर परिणाम होतो. आणि शरीर बिघडते व शरीराला निरनिराळे आजार सुरू होतात. अशा अवस्थेत श्वासाची गती मदांवते. शरीराचा रक्तदाब वाढतो. त्यामुळे मनुष्याला साधना करता होत नाही व त्याची नेहमीची कामेही सुरळीत होत नाही. अर्थातच मनुष्याची प्रगती थांबते.
याउलट जर मनुष्याचे मन आनंदी असेल तर चित्त स्थिर रहाते व बुध्दी अधिक सक्षम होते. तिचा कार्याचा वेग वाढतो. श्वासाची गती सुरळीत चालते व मनुष्याचा रक्तदाबही व्यवस्थित राहातो. या सगळ्याचा शरीरावर चांगला परिणाम होवून शरीर निरोगी राहाते. मनुष्य आनंदी उत्साही राहातो. व साधनेमध्ये प्रगती करीत राहातो. जीवन चांगले जगण्यासाठी मनुष्याला आनंदाची गरज आहे. परंतू सतत आनंदी रहाणे जमेलच असे नाही. कारण जीवनात अनेक चढउतार होत असतात. यश अपयश मिळत असते. अनेक दु:खाच्या प्रसगांना त्याला सामोरे जावे लागते. त्यामुळे तो कधी आनंदी तर कधी दु:खी राहातो. दु:खाच्या प्रसंगातही मनुष्याने आनंदी राहाण्याची कला शिकली पाहीजे जेव्हा जेव्हा मन दु:खी होईल तेव्हा तेव्हा आनंदाचे क्षण आठवले पाहीजे. किंवा त्याला स्व:ताला माहीत असते की आपले मन कोणत्या गोष्टीमुळे आनंदीत होते. अशा गोष्टी त्याने केल्या पाहीजेत म्हणजे मनाची दु:खाची बाजू मनाला विसरायला लावून एखाद्या आनंदाच्या प्रसंगात त्याला गुतंवावे लागते. दु:खाच्या स्तरावर लगेच एखाद्या आनंदाच्या क्षणाचा मुलामा देता आला पाहीजे. मनाचा स्तर मनुष्याला बदलता येतो. फक्त त्यासाठी स्व:ताच त्यावर लगेच उपचार केला पाहीजे नाहीतर मन दु:खात बुडून मनुष्य कायमचाही निरूत्साही होवू शकतो. मग त्या मनाला दु;खातून लवकर बाहेर काढता येत नाही.यासाठी स्वत:च्या अंतरयांत बघावे व मनाचा ठाव घेत राहावा. व मन आनंदी उत्साही ठेवावे. त्यामुळे साधनेत वाढ होते व मनुष्याचे आयुष्यही वाढू शकते.
Om Gopalnathay Namah!!!
Spiritual path is the way to reach up to The Almighty God. A fit body is very essential to proceed in spiritual way. Body is like a machine. For proper functioning of a machine, it must be kept maintained. If any kind of fault or breakdown occurs, repairing is needed. Likewise, human body also needs care and maintenance. Mana-Chitta-Buddhi (Mind, Thought and Intelligence) are the three most important elements in human body. Most of the problems occur in human body due to these three elements. The effect of mind takes place on thoughts and thoughts affect intelligence. Thus function of human body is mainly dependent on these elements. For example, if some unpredicted incident occurs in life, we get disturbed. This disturbance also can be caused sometimes by suffering due to someone’s behavior. These disturbances first show their effect on mind which in turn affect thoughts and finally on intelligence. All these changes have considerable effect on human body. In such situation, mood remains sad, breathing gets slower and thus blood pressure increases which can give rise to illness. So in such situation person cannot do his routine work properly nor can he do Sadhana.
Alternatively, if mood is happy, mind is peaceful, thoughts become stable and one can achieve many things with intelligence. This regulates blood pressure and body remains fit and perfect for doing Sadhana. To live a better life one should always remain happy. But practically this is not possible as we have to face many ups and downs; sometimes we have to face sorrowful situations. Humans should the learn the art of living happy in sorrowful situations. These situations can be handled by remembering happy memories in past. In fact everyone knows what can make themselves happy. If we are unable to deal with ups and downs of life, it will become dull and boring. The way of adjusting our mind according to situations will help humans to prosper in life.
Om Jai Ho!
No comments:
Post a Comment