।। ॐ श्री परब्रह्म गोपालनाथाय नमः ।।
परमेश्वराच्या प्राप्ती साठी अनेक मार्ग अवलंबले जातात अनेक प्रकारचे सिद्धांतही मांडले जातात विवीध मतांच्या मांडणी प्रमाणे तर्क-वितर्क लावले जातात, काहिंच्या म्हणण्याप्रमाणे भगवंताला प्राप्त करायचे असेल तर अनेक त्याग करावे लागतात, काही मतांप्रमाणे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर यांचा सर्वात अधिक अडथळा आहे असे मानले जाते. खरंतर या सगळ्या रचना परमेश्वराच्याच आहेत आणि जर मनुष्याने त्या त्यागायच्या असत्या तर परमेश्वराने त्यांची निर्मीती केली नसती. मनुष्य या सगळ्या गोष्टी टाळून वरती जायला बघतो, परंतु परमेश्वराकडे जाण्यासाठी या सगळ्या गोष्टींचे अनुभव घेऊनच पुढे जावे लागते. उदाहरण जर घ्यायचे म्हटले तर भगवंत निरगुण आहे, निराकार आहे तर त्याला प्राप्त कसं करणार? त्याला प्राप्त करायचे असेल तर प्रथम त्याच्या सगुण रूपाची आराधना करावी लागते. सगुणरूप म्हणजे मनुष्याने कल्पनेने तयार केलेले, मनाला मोहक असे रुप असते आणि या मोहक रुपा मुळेच मनुष्याला भगवंत या जगात आहे असे समजते.
रुप आणि नाव असल्या शिवाय भगवंताला आळवता येत नाही आणि त्याला जर आळवायचे असेल तर मनापासून त्याला हाक मारावी लागते. कुठल्या ही स्वार्थाशिवाय आणि कुठल्याही हेतु शिवाय त्याच्या वर प्रेम करावे लागते. त्याला आपले मानावे लागते, आपली सगळी जबाबदारी त्याच्यावर टाकावी लागते, आपल्या जीवनाचे सगळे कर्तेपण त्याच्यावर सोपवावे लागते, हे एकदा दोनदा नकरता सातत्याने करावे लागते. मग हे सगळे करत असताना प्रेम, मोह, माया, ममता, या गोष्टी जागृत होतातच आणि त्यांच्या शिवाय आपण भक्ती करू शकतच नाही. म्हणजे या सर्व गोष्टी व्यर्थ नाहीतच. परंतु त्याचे स्वरूपच मनुष्य बदलतो आणि त्यांना दोष देऊन टाळण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा त्याचा मार्ग बदलतो किंवा त्याचे रुपांतर इतर अनेक गोष्टींमध्ये होते. उदाहरणार्थ त्याच्यात अहंकार, द्वेष निर्माण होतो आणि अहंकार आला की जीवन बदलून हळूहळू मनुष्याचा ऱ्हास होतो जातो. यासाठी परमेश्वराने निर्माण केलेल्या कोणत्याही गोष्टी व्यर्थ नाहीत, तर त्यांचे निर्माण होण्या चे काहीतरी कारण असते. परमेश्वराने ज्या रचना केलेल्या आहेत त्या रचनांच्या पासूनच त्याच्यापर्यंत पोहोचता येते.
Om Gopalnathay Namah!!!
Many spiritual theories have been proposed, many assumptions are made and discussions are done on various ways to reach upto the God. Few theories suggest that one has to sacrifice many things so as to reach up to the God while some theories suggest that one has to conquer Shadripus (6enemies of mind) which are kama(lust), krodha(anger), lobha(greed),moha(attachment), mada(pride) and matsar(jealousy). In fact all these systems are made by god and if these were supposed to be sacrificed then they wouldn’t exist. People try to sacrifice these things but in fact one has to experience everything to reach up to the God. For example –God is treated as Nirguna-Rupa(formless) but we have to worship God in Saguna-Rupa i.e. the form of idol, statue or an image. These forms of God are created by human beings according to their own imaginations and thoughts. After that Name of God is also important as we have to remember him in many situations including prayers, sorrow or panic situations. Thus both Nirguna and Saguna are forms of God. We cannot define God in specific form.
To reach up to the God, one has to devote faith and unconditional love and also have to remember the almighty frequently. Gradually feelings of love, attachment towards the Almighty will arise in the heart. These feelings make the devotion strong. In short God has created each everything with some reason, who are we to set rules on that? The morals, values and the systems created by God should never be changed. These are the only pathways to reach up to the almighty God.
Om Jai Ho!
No comments:
Post a Comment