।। ॐ श्री परब्रह्म गोपालनाथाय नमः ।।
परमेश्वर सृष्टीच्या कणाकणात व्यापला आहे. त्याच्या अस्तित्वाची जाणीव होण्यासाठी मनुष्याला स्वत:च्या अंतकरणात बघावे लागते. कारण मनुष्याच्या शरीरात ऊर्जा आहे, तीच ऊर्जा त्याचे शरीर चालवते. स्वत:च्या आतील ऊर्जेची जाणीव व्हायला लागली की मग बाहेरील ऊर्जेची सुध्दा जाणीव त्यास होते. मग बाहेरील ऊर्जेचे सहाय्य मनुष्यास मिळावयास लागते. त्यासाठी साधनेची निरंतर अवश्यकता असावी लागते. जी साधना मनुष्य करतो त्या साधनेवरती त्याचा पुर्ण विश्वास, श्रध्दा, निष्टा असावी लागते. कोणत्याही गोष्टी विषयी मन शंका घेत असेल किंवा मनाची व्दिधा मनस्थिती असेल तर त्या गोष्टीची प्राप्ती कधीच होत नाही. जी गोष्ट प्राप्त करुन घ्यायची आहे त्या गोष्टीविषयी पुर्ण विश्वास किंवा मनात संपुर्णपणे सकारात्मक भाव असेल तर ती मिळण्यासाठी कोणीही अडवणुक करु शकत नाही.
जर मनुष्याला अंतरीक ऊर्जा जाणुन घ्यायची असेल तर त्याला बाहेरील ऊर्जेची देखील एकरुपता करुन घ्यावी लागते. आता बाहेरील ऊर्जा दिसु शकत नीही तरीही तिचे एक रुप असते ते म्हणजे सदगुरु होय. त्या सदगुरु विषयी मनात विश्वास, श्रध्दा दृढ ठेवली तर मनुष्य सहजपणे स्वत:ला ओळखु शकतो. म्हणजे त्याला स्वत:ची ऊर्जा जाणवु लागते. सदगुरु आणि त्यांनी दिलेली साधना या दोन गोष्टिंवर मनुष्य ठाम असेल तर जीवनातील कोणत्याही अडचणींवर सहज मात करता येते. जीवनात निर्माण झालेली अनुकुल आणि प्रतिकुल परिस्थिती सहज स्विकारून पुढची मार्ग मिळत राहतो.
Om Gopalnathay Namah!!!
God exists in every minute particle of nature. To experience the existence of God, one has to peep inside own conscience. Human body contains energy; the energy which keeps them alive. If one starts experiencing this energy then he/she also experiences the outer energy. Thus there are two kinds of energies; one which is present inside human body and another one which is outside human body (nature). Once a person starts doing regular Sadhana, he also starts experiencing outer energy. A strong faith on Sadhana is also important for this. To achieve something positive approach and focus of mind is very important. Doubtful mind creates confusion and results into failure.
To experience the inner energy, a union with outer energy is also needed but this outer energy exists in invisible form. This outer is the Sadguru. If one has strong faith and devotion towards Sadguru and his Sadhana, he can easily experience the internal energy and can achieve the difficult things by defeating hurdles and hardships of life. Whatever conditions come in front, clear pathway can be easily found through it
Om Jai Ho!
No comments:
Post a Comment