Wednesday, March 2, 2016

Spiritual Thoughts (March 2016)

।। ॐ श्री परब्रह्म गोपालनाथाय नमः ।।

सूर्यासारख्या चमकणा-या अद्वैतरूपी श्री सद्गुरूंना शतशः नामस्कार. सद्गुरू आधाराशिवाय असलेले मानवी जीवन म्हणजे फक्त भार होय. ज्याच्या जीवनात सद्गुरू असतात त्याच्या प्रत्येक कर्मात, सुख-दुःखात सद्गुरूंचा वास असतो. संसार सागर तरून जायला सद्गुरूच आधार असतात. सद्गुरू नसतील तर जीवन अंधारमय असते आणि सद्गुरू सान्निध्यात प्रकाशाची वाटचाल मिळते. सद्गुरू प्रथम मानवाला स्वतःच्या आत जो आत्मा आहे त्याची जाणिव करून देतात. आत्मपूजा कशी करायची हे सद्गुरू शिकवतात. माणूस सद्गुरू भेटण्याआधी ईश्वराला बाहेर शोधत असतो. सद्गुरू भेटल्यावर त्याला त्याचा ईश्वर शरीराच्याआत आहे याची जाणीव होते. त्या नंतर त्याची अंर्तमुख होण्याची वाटचाल सुरू होते. माणूस आधी विषयांसाठी जगत असतो. जगातील सर्व सुख आपलिशी व्हावी म्हणून प्रयत्न करत असतो. त्याला असे वाटते की जगातील सर्व सुख मलाच मिळावी. ती प्राप्त करावी म्हणून तो खूप कष्ट करतो. जरी सर्व सुख मिळाली तरी समाधान मात्र मिळत नाही.

माणसाला नेहमी या ना त्या सुखाप्राप्तीने मी सुखी होईन असे वाटत असते. पण ती सर्व सुखे त्याला मिळतीलच असे नाही. कारण त्याचा सुख प्राप्तीचा जो मार्ग असतो तो चूकीचा असतो. सुख हे बाहेर नसून अंतरंगातच आहे हे दाखवणारे फक्त सद्गुरूच असतात. मन एकसारखे सुखाच्या मागे लागलेले असते त्या मनाला शरिराच्या आत बघायला सद्गुरू शिकवतात. आत असलेल्या आत्म्याला कसे जाणायचे याचे साधन सद्गुरू शिकवितात. ते साधन करता करता माणसाचा हव्यास थांबतो. ही नश्वर सुख व आनंद सोडून दुसरेही एक सुखाचे व आनंदाचे विश्व आहे हे समजते. सत्य व असत्य समजते. त्याला प्रकर्षाने जाणवते की आजवर सुखसाठी मी जी काही धडपड केली ती व्यर्थ आहे. म्हणजे जसे वाळवंटात मृगजळ भासावे व त्यामागे मी पळावे तसे हे आहे. आजवर मी बाहेर शोधत होतो पण तो माझा आधार आत आहे. याची जाणिव होते. रात्रंदिवस शिणणा-या देहाला व मनाला तो कुठेतरी विश्रांती द्यायला लागतो. एकदा का मनाचा प्रवास अंर्तमुख सुरू झाला की बाहेरील लक्ष कमी होते. आणि अद्वैत अशा अवस्थेकडे तो चालायला लागतो.

त्या आतील ईश्वराला जाणल्यावरच आपल्या जन्माचे सार्थक होते.

ॐ जय हो!


I bow my head on the feet of my Sadguru who is Advaitroopi (Non-Dual form) and glows like the Sun. Life without Sadguru's blessings is like a burden. Sadguru is the only support in crossing this ocean of material world. Life without Sadguru consists of darkness but way of light can be seen only in Sadguru's proximity. Sadguru is always present in every moment of sorrow and happiness. Firstly, Sadguru makes a person aware of Soul residing in his body and then teaches the way of worshipping the Soul. Before meeting Sadguru, people search for God in surroundings or anywhere outside, but after meeting Sadguru they realize that God dwells inside their body. From that moment their journey towards becoming Antarmukh (towards self realization/ away from material world) begins. Previously a person is materialistic; he always desires for all better things and comforts in the world. He takes great effort for achieving all those things, even he achieves a lot but still remains unsatisfied. He feels that - finally I will become happy and satisfied after getting particular thing or achieving something he desired. But there remains no surety whether all of his desires will get fulfilled and finally he will get happy, because the way he preferred for fulfilling all those things was incorrect.

Sadguru is the only one who shows that- The real happiness lies inside us and not anywhere outside. Our mind always searches for happiness in outside world but Sadguru turns that mind inside us (body) and teaches us the way to get experience of soul. As we start following this way, our desires stop and we realize that there is another divine world beyond all these mortal and materialistic thoughts of happiness. We become able to differentiate between true and false things. We deeply realize that- till date whatever I did to become happy was just futile (vain), it was just like a mirage in desert and I was running behind that, the support which I was searching outside; lies in myself only. Afterwards, the day by night efforts taken by our body and mind in search of happiness are finally stopped. As our mind starts journey towards becoming Antarmukhi (towards self realization/ away from material world), our outer focus becomes less and we advance towards Advait (Nondual) condition.

Our life will be meaningful only if we recognize the God residing inside us.

Om Jai Ho!



2 comments:

  1. नेहमी प्रमाणेच उत्तम , खूप छान Sona Jai Ho sursoham@gmail.com

    ReplyDelete