Monday, April 4, 2016

Spiritual Thoughts (April 2016)

।। ॐ श्री परब्रह्म गोपालनाथाय नमः ।।

सद्गुरुंच्या चरणी आदर युक्त नमस्कार.
संसार सागर तारुन नेणारे सद्गुरु असतात. त्यांनी दिलेल्या सतनामामुळे मनुष्याला अंतर्मुख होता येते. बाहेरील गोंधळा पासून त्याला शांती मिळायला लागते. आत्ता पर्यंत फक्त बाहेर धावणा-या. मनाला अंतर्मुख करताना संघर्ष करावा लागतो कारण मन अंतर्मुख केले तरी बाहेरील विषय हे त्रास देतच असतात. त्यामुळे त्याच्या अंतर्मनाचे व बाह्यमनाचे युध्द सुरु होते. ज्या-ज्या वेळेस मनुष्य मनाला आत वळविण्यासाठी प्रयत्न करतो, त्या-त्या वेळेस त्याचे दुसरे मन त्याला विषयां कडे ओढते व विषयांचा जोर वाढतो. आत्तापर्यंत विषय उपभोग्ण्याची मनाला सवय लागलेली असते आणि अचानक मनाची दिशा अंतर्मुख केल्याने मनाची खळबळ अधिक वाढते. नाना प्रकारची प्रलोभने स्वतःहुन पुढे यायला लागतात. अशावेळी खंबीर रहावे लागते. मनाचा दृढनिश्चय करावा लागतो. मनाला बजावून सांगायला लागते की, आत्ता मिळालेले अंतर्मुखीचे सुख जरघालवले तर दुसरा सुखाचा मार्गच नाही आणि जीवनामध्ये खरे सुख हे फक्त सद्गुरुंजवळच असते. सर्वप्रकारच्या मुक्तींचे वसतिस्थान त्यांच्या जवळच असते.

क्षणोक्षणी माणसाला दुःख येत असतात पण सुखाचा सागर असणा-या सद्गुरुंचे सान्निध्य किंवा सहवास जर मिळाला तर मनुष्याच्या दुःखांचे रुपांतर सुखात व्हावयास सुरुवात होते. सद्गुरुंनी दिलेले साधन इतके सुलभ आहे की, ते साध्य करताना मनुष्यास कोणताच अडथळा किंवा अडचण जाणवत नाही. हे जीवन जगता-जगता सहज ईश्वर प्राप्तीकडे जाता येते. त्यासाठी संसारातील किंवा कर्मा तील कोणत्याच गोष्टीचा त्याग करावा लागत नाही. संसार करता-करता मुक्तीचा मार्ग चालावा लागतो; पण त्यासाठी मनाचा दृढसंकल्प असावा लागतो.

कोणतेही कर्म न सोडता साधना करता येते. ही साधना बाहेर दिसत नाही. बाहेरुन माणूस इतरांसारखाच जगताना दिसतो पण आत मात्र तो स्वतःच्या साधनेवर लक्ष लावून असतो. ईश्वर बाहेर नसून आत्म्याच्या रुपाने तो शरीराच्या आत आहे. तो अंतरात्मा माझा देह कसा चालवतो? कसा सांभाळतो हे कळते. सर्वव्यापक ईश्वराशी त्याचे नाते दृढ होते. तो ईश्वररुपी अंतरात्मा जरशरीरात नसेल तर शरीर मृत होते. या शरीराला चालवणारा अंतरात्मा म्हणजेच ईश्वर आहे हे कळते. हा अंतरात्मा जर शरीरात नसेल तर सर्वव्यापक ईश्वराला भेटता येत नाही. मनुष्याचे लक्ष जेवढे अंतरात्म्या कडे लागते, तेवढा आनंद त्याला मिळतो आणि जेवढे लक्ष बाहेर तेवढा मनाचा गोंधळ होतो.

अंतर्मुखीच्या साधनेमुळे शरीरात असणा-या, गुणांमध्ये सुध्दा बदल होत जातो. मनुष्याचे विचार बदलतात, मनखंबीर होते. कोणत्याही प्रकारच्या संकटांमध्ये त्याला स्थिर राहता येते. ईश्वराबद्दलचा विश्वास वाढतो. त्याचे हृदय कोमल बनते. जो ईश्वराला जाणण्याचा प्रयत्न करतो, तो कोणत्याही प्रकारच्या मनुष्याचे दु;ख सहज जाणु शकतो. कोणाचा ही तिरस्कार त्याच्या कडून होत नाही. माझ्या आत ईश्वरआहे, तोच ईश्वर दुस-याचही देहात आहे; हे समजल्याने प्रत्येका विषयी त्याचा आपलेपणा वाढतो.

ॐ जय हो!


Respectful Pranaam(Bow) on the feet of Shree Sadguru. He is the only one who can sail us through this ocean of material world. Satnaam given by Sadguru helps Humans to getAntarmukh(towards self realization/ introvert) and gives relief from outer mess. Mind has to struggle while becoming Antarmukh as it has habit of thinking continuously about different topics. Even if we try to divert our mind inside, many thoughts disturb us. This initiates conflict between our inner mind and outer mind. Till the moment we start to divert our mind inwards, it is habitual of thinking on numerous topics continuously and sudden change in this habit causes chaos in mind.Many inducements come in front of us to distract our mind but we have to stand firm at such situations. We have toconvince our mind that if we miss the present bliss of Antarmukh state, then there remains no option to bring happiness in our life and this happiness is present only near ourSadguru as all Muktis(End from bondings) reside on his feet.

All of us frequently face various sorrows but if we get in Sadguru's proximity (who is sea of happiness), this sorrow transforms into happiness. The Sadhana(method to reach towards god) given by Sadguru is sosimple that no barrier comes in between it. We can easily follow this way while continuing our routine life and no sacrifice is needed. The only thing needed is strong decision of mind.

Sadhana can be done without leaving any of our daily routine work. This Sadhana can't be seen from outside. A person doingSadhana appears normal from outside but actually his mind is focused in his Sadhana. Gradually he comes to know that God is present in his body in the form of soul and cannot be found anywhere else outside. And eventually he understands how the soul dwelling inside, powers the body and takes care of his body. Thereafter his relation with God becomes strong. Absence of soul causes death thus we can't reach up to the God without soul present in the body.

As much as we focus towards our Antar-atma(Soul), we get eternal bliss from it and inversely if we get out-focussed, confusions are created in mind. AntarmukhSadhana brings tremendous changes in people. Thinking begins to develop, mind becomes stable, faith on almighty god increases and person becomes kind hearted. One, who tries to get near god can understand anyone's grief and never insults anybody. He finally understands that the god residing inside himself is the same who also dwells inside others so the feeling of oneness with everyone begins to develop.

Om Jai Ho!



1 comment: