।। ॐ श्री परब्रह्म गोपालनाथाय नमः ।।
माझ्या परमप्रिय सद्गुरुंच्या चरणी आदर युक्त नमन.
जगण्यासाठी आवश्यक असणा-या मुलभूत तीनच गरजा अहेत. अन्न, वस्र व निवारा. या गरजा भागवण्या साठी जेमतेम खर्च लागतो. पण तरीही मानवाला मुलभूत गरजांपेक्षा वेगळ्या अनेक गरजा असतात. आणि त्याला त्यांची पूर्तता करण्यासाठी अधिक खर्च करावा लागतो. अन्न, वस्र व निवारा हे जरी जगण्यासाठी आवश्यक असले तरीहि मानवाने स्वतःच्या मौजेसाठी इतर गरजाही निर्माण केल्या. त्या गरजा भागविण्यासाठी त्याला भरपूर मेहनत करावी लागते व त्यासाठी त्याचा भरपूर वेळही खर्च होतो. म्हणजे जीवनाचा कितीतरी काळ या गरजांच्या पूर्तते साठी वाया जातो. मुलभूत गरजा थोड्या असल्या तरी प्रत्येक मानवाच्या मनात त्याचे स्वरूप किंवा स्वप्न वेगवेगळे असते. म्हणजे गरजेसाठी अन्न हवे पण त्यात त्याला पंचपक्वान्नांची आवड निर्माण होते. आणि वस्र गरजेचे आहे पण उंची वस्र हवी असे त्याला वाटते. स्वतःच्या घराबाबतही मानवाची वेगवेगळी स्वप्ने असतात. म्हणजेच मानवाच्या मुलभूत गरजा बाजुलाच राहील्या पण त्यांच्याबद्दलच्या अपेक्षा मात्र वाढतच गेल्या. खरतर ज्यावेळी बालक जन्माला येते तेव्हा त्याला या मुलभूत गरजाही कळत नसतात. फक्त अन्न हीच एक गरज त्याला भासते आणि आई त्याची पूर्तता करत असते. राहिल्या वस्र व निवारा याची त्याला जाणिवही नसते. कालांतराने या गरजा त्याला निर्माण होतात. जीवनाला गरजांची आवश्यकता थोडी पण माणसाच्या अपेक्षेमुळे त्याला स्वतःमधील उर्जा या अन्या गरजांसाठी वापरावी लागते.
परमेश्वराने सृष्टीची रचना अशी केली आहे की मनुष्य स्वतःच्या मुलभूत गरजा सहज भागवून काही काळ स्वतःच्या देहातील अंतरात्म्याच्या ध्यानासाठी देईल. पण हे सगळे तो विसरतो आणि दिवसेंदिवस स्वतःच्या गरजा मात्र वाढवत बसतो. तो स्वतःचे समाधान आधिक गरजा पुरविण्यात मानतो पण त्याला समाधान मिळत नाही. त्याचे लक्ष सतत बाहेरच्या गोष्टींकडे म्हणजे इतरांच्या वस्तूंकडे लागलेले असते. स्वतःकडे वस्तूंचा आधिक साठा कसा होईल याचा सतत तो प्रयत्न करतो. या प्रयत्नात त्याला नेहमी उद्याचीच चिंता लागलेली असते. माझ्या जवळील वस्तूंचा साठा संपणार नाही ना हीच काळजी तो करतो. पण ज्या देहासाठी तो हे सगळे करतो त्या देहातील अंतरात्म्याला मात्र तो विसरून गेलेला असतो. अंतरात्म्याकडे जर मनुष्याचे लक्ष लागले तर त्याचे बाहेरील लक्ष कमी होईल, आणि त्याच्या गरजा कमी होऊन राहिलेला वेळ अंतरात्म्याच्या ध्यानासाठी देता येईल. मनुष्याने स्वतःचे मन व चित्त आत म्हणजे अंतरात्म्याकडे वळविले तर त्याची काळजी, चिंता कमी होईल व एक वेगळी शांतता त्याला अनुभवास येईल. मनुष्य अंर्तमुखी झाला तरच आनंदी जीवन त्याला कळेल. मी जन्माला का आलो? व जन्माला येऊन मला काय करायचे आहे हे त्याला समजेल. आणि हे जर त्याने नाही केले तर देहाच्या गरजा भागवता भगवता त्याच्या देहालाच एक दिवस विराम मिळेल. पण वेळीच माणसाला जाग आली तर अंतरात्म्याच्या ध्यानाचा मार्ग त्याला मिळतो आणि तो मार्ग दाखविणारे सद्गुरूही त्याला भेटतात. मग त्याचे जगणेच बदलते व तो ख-या अर्थाने समाधानी होतो.
ॐ जय हो!
My respectful bow on the feet of Shree Sadguru !
Food, clothing and shelter are the three fundamental needs of human beings. These can be fulfilled in very less amount and in very less efforts. But still humans have much more other needs too, which require higher expenses and more efforts. These extra needs are not essential like basic necessities but are needed by humans for self enjoyment or also for living comfortable lifestyle. To accomplish these additional requirements people have to spend more time at work. A lot of precious lifetime is spent in this struggle. Even if basic needs are inexpensive and simple, different people have different portraits and views about these needs. It means food is of prime importance for living but we want to eat delicious and tempting foods. In the same way clothing is required for hiding our body but desire of wearing attractive clothes gets created. And lastly shelter is required for overall protection but people have various dreams about their homes. The fact is that meaning of need remains aside but, expectations about them go on increasing. When a baby takes birth, he doesn’t know about his basic needs. He only needs food, which is provided to him by his mother and after some period the other wants are generated. Actually fulfillment of basic needs can be done easily by humans but, lot of precious energy inside their body is wasted in efforts to accomplish additional requirements and luxuries.
The almighty has created this nature in such a way that humans can easily fulfill their fundamental needs and spend some time in Dhyaan (A kind of Meditation) of Antaratma (Soul inside body). But people forget this fact or even they don’t know about this because of their ever-growing wants. People feel that they will get satisfied by getting luxuries or expected wants in life but these expectations never stop. Their mind is always engrossed in outer world especially in - what others have and I don’t, and also they take efforts for storage of things which will be required for tomorrow. Thus instead of taking advantage of present time they are engaged in thinking about tomorrow. Whatever time they are spending and efforts which they are taking are ultimately for their body. And during this people remain unaware of the fact that ‘Antaratma (Soul) resides in their body’. If they concentrate on Antaratma (Soul), their mind will be easily diverted from outer world and their wants will also reduce. Eventually they will get time for Dhyaan(A kind of meditation) of Antaratma (which is soul residing inside body). Dhyaan of Antaratma is only the true worship of god. If people divert their mind towards Antaratma (i.e.Antarmukh State) then their worries will be reduced and they will experience peaceful life. This Antarmukh state (towards self realization/away from material world) gives people divine happiness. From that, they will also understand ‘What is the reason behind their human birth and what they have to do in life.’ If we don’t realize about all these things at correct time then while fulfilling the never ending desires of body, one day death will come in front of us. However if we become conscious at right time then we will get on the way of spirituality. This way is Dhyaan of Antaratma, which is taught by Sadguru. Thus we will also get Sadguru on this way. Thereafter life will change totally and we will be satisfied in real manner.
Om Jai Ho!
Very nice
ReplyDelete