Tuesday, November 1, 2016

Spiritual Thoughts (November 2016)

।। ॐ श्री परब्रह्म गोपालनाथाय नमः ।।

माझ्या सद्गुरूंच्या चरणी माझे नमन.

सृष्टीची रचना पाच तत्वांची मिळून झालेली आहे. म्हणजेच पंचमहाभूते एकत्र येऊन सृष्टी तयार झाली. तिच्या पासून तीन गुणांची उत्पत्ती झाली आणि त्यापासून मानवाची निर्मिती झाली आहे. जशी सृष्टीची रचना आहे तशीच मनुष्य देहाची रचना आहे. पंचमहाभूते म्हणजेच पृथ्वी, आकाश, पाणी, अग्नी व वायु होत. या पाच तत्वांचा मानवी देहात समावेश आहे.

जन्मल्यापासून मरेपर्यंत मनुष्याला प्रत्येक गोष्टींच्या प्राप्तीची इच्छा होते. अशा अनेक प्रकारच्या इच्छा त्याच्या शरीरात असतात. त्यालाच माया असे म्हणतात. मनुष्याच्या स्वभावात अनेक गुण दिसतात. उदाहरणार्थः राग, लोभ, क्रोध, मोह, अहंकार, करूणा इ. मनुष्याच्या शरीरात मुख्यता महत्वाचे तीन गुण असतात. १. सत्वगुण, २. रजोगुण, ३. तमोगुण या तीन पैकी ज्या गुणाचा प्रभाव अधिक प्रमाणात असतो, तसेच वर्तन मनुष्याकडून होत जाते. म्हणजेच शरीरात जर सत्वगुण अधिक प्रमाणात वाढला तर मनुष्याचे वर्तन शांत राहते. त्याच्या स्वभावात करूणा निर्माण होते. तो दयाळू वृत्तीचा बनतो. रजोगुण वाढला तर मनुष्याचा स्वभाव अशांत होतो. मनुष्य जास्त चंचल बनतो. त्याच्यातील स्थिरत्व कमी होते. तमोगुण वाढला तर मनुष्याला क्रोध अधिक प्रमाणात येऊ लागतो. त्याचा अहंकार वाढतो. इतरांविषयी घृणा वाढते व सर्वप्रकारचे श्रेष्ठत्व तो स्वतःकडे घेतो. अशा प्रकारे शरीरातील गुणांनुसार मनुष्यांचे वर्तन घडत जाते. त्याचा परिणाम त्याच्या स्वतःवर अधिक होतो व त्याच्या सहवासातील इतर व्यक्तींवर सुध्दा होतो.

जीवन जगण्यासाठी मनुष्याला नेहमी शांत, दृढ निश्चयी असावे लागते. अनेक प्रकारच्या संकटांना तोंड द्यावे लागते. त्यावेळी त्याच्याकडे स्थिरत्व असेल तर त्याची निर्णयक्षमता वाढते. म्हणजेच एखाद्या संकट काळी मनुष्य योग्य तोच निर्णय घेऊन संकटांवर मात करू शकतो. ज्या गुणांमुळे मनुष्याच्या जीवनात वारंवार बदल होतो. ते गुण मनुष्याच्या हातात नसतात. त्या गुणांवर त्याचे नियंत्रण नसते परंतु गुरूमार्गाचा मनुष्याने अवलंब केला तर ते नियंत्रण नक्कीच येते. सातत्याने ध्यान साधना करीत राहील्याने या गुणांचा शरीरावर होणारा परिणाम कमी होत जातो. नियमीत साधनेने तीन गुणांचा शरीरातील प्रभाव स्थिर होतो. मनुष्य उत्साही व आनंदी होतो.

प्रत्येकाला स्वतःमध्ये काही बदल करून घ्यावा असे सतत वाटत असते, किंवा स्वतःला इतरांनी किमान चांगल्या, वृत्तीचा चांगल्या आचरणाचा आहे असे म्हणावे असे वाटते. पण हा बदल नुसत्याच विचारांनी न होता मनाला साधनेचा छंद, ध्यास धरल्यानेच होतो. स्वतःमधील परिवर्तनाचा स्वतःलाच जास्त आनंद होतो.

ॐ जय हो!


Respectful Pranaam(Bow) on the feet of Shree Sadguru.

Nature is made up of five elements. Three Gunas (properties) are also created from it. Both of these combine to form Human Body. Thus likewise nature, human body also comprises of 5 elements. These are Earth, Sky, Water, Fire and Air.

From birth to death humans always desire to achieve something. This feeling of desire or wants is Maya. Human behaviour consists of various properties like Anger, Desire, Lust, Ego, Mercy etc and it is also affected by Three Gunas in the body which are; 1.Satva-Guna, 2. Rajo-Guna and 3.Tamo-Guna. Proportion of these Gunas greatly affects our behaviour. For example, if amount of Satva-Guna increases, people remain calm, merciful and kind hearted. If amount of Rajo-Guna increases mind becomes unstable and anxious. If Tamo-Guna increases then people get more angry due to ego and start debasing others. In this way human behavior is influenced by above three Gunas in the body. They affect personal behavior as well other people which get in contact with.

For a balanced life one should always remain calm and determined. Many types of crisis and calamities occur in life. In such situations decision making is very important. One who is physically as well as mentally stable can peacefully handle such situations. In short, frequent changes in our life occur due to these Gunas. Actually Humans cannot control these Gunas but if they start following Guru-Marg (Path shown by Spiritual Master), they can control. This can be made possible by consistent practice of Dhyaan-Sadhana(taught by Gurudeo). Thus, Sadhana helps in balancing of three Gunas in the body and makes people happy.

Everyone thinks of bringing change in self or desires that people around him should appreciate his behavior and praise him. But these are mere thoughts and can turn into reality only by continuous practice of Dhyaan-Sadhna. This positive reformation in life gives happiness to ourselves.

Om Jai Ho!



All Rights Reserved. Om Jai Ho Vishwatmaka Parivar

No comments:

Post a Comment