।। ॐ श्री परब्रह्म गोपालनाथाय नमः ।।
माझ्या सद्गुरूंच्या चरणी माझे नमन.
मानवाच्या देहाची रचना एकसारखी असते. प्रत्येकाला हात, पाय, डोळे, कान, नाक, एकसारखेच असतात. परंतु प्रत्येकाच्या स्वभावात व गुणांमध्ये वेगळे पण दिसते. प्रत्येकाच्या वृत्तीत फरक दिसतो. गुणांमध्ये कोणी शांत, कुणी उग्र, कोणी चंचल तर कोणी एकाग्र असे वेगवेगळे प्रकार दिसतात. मनुष्याला जगण्यासाठी ज्या गरजा असतात त्या एकसारख्याच असतात परंतु प्रत्येकाचे गुण व आवडी-निवडी मात्र भिन्न असतात. प्रत्येक मनुष्याच्या जिवनात एखादी आवड म्हणजेच त्याचा एखादा गुण प्राथमिक असतो. त्याच्या गुणाला त्याच्या जिवनात प्रथम स्थान असते. त्याच जिवन जणु त्याच्या त्या गुणासाठीच बनलेले असते. त्यानी केलेले प्रत्येक कर्म त्याच्या प्राथमिक गुणासाठी म्हणजेच त्याच्या आवडीसाठी असते. आणि त्याचे जगणे ही त्याच्यासाठीच असते. जिवनाला लागणा-या अनेक गरजा व आवडी त्याला जरी प्राप्त झाल्या तरी त्याच्या मनातील प्राथमिक आवड पुर्ण झाल्या शिवाय तो आनंदी होत नाही. त्या प्राप्तीसाठी तो अशांत व अस्वस्थ राहतो. यामुळे जिवनात कीतीतरी सुख येतात व जातात पण त्याला ती उपभोगता येत नाहीत. मनुष्यामधील या गुणांमुळे त्याला स्वताःलाही व इतरांनाही त्याचा उपयोग होत नाही. हा प्राथमिक गुण त्याच्या जिवनाला कलाटणी देत असतो. ह्या गुणांमध्ये अनेक प्रकार येतात मोठेपणा मिळवण्याचा हव्यास, आपण स्वतः ज्ञानी आहोत इतर सर्व अज्ञानी आहेत हा भास आणि जगामध्ये मीच मोठा आहे हा अहंकार असे अनेक प्रकार येतात. धन संचयाच्या आवडीमुळे रात्रंदिवस धन प्राप्तीचीच चिंता लागून राहते. दुसरा विचार करायलाही फुरसत राहत नाही. ज्ञानी असल्याच्या भासामुळे, मोठेपणाच्या हव्यासामुळे मनुष्य सारखा सन्मानाच्या शोधात राहतो. सर्व गोष्टींचे ज्ञान मलाच आहे ह्या भ्रमात तो जगतो. अहंकारामुळे आपल्या वरचड कुणी असेल तर त्याला ते सहन होत नाही.
मनुष्यामधील ह्या गुणांची जाणीव मनुष्याला स्वतःलाही कधी कधी नसते. आपल्या मधील हा गुण त्याला दिसत नाही. परंतु त्याचे आचारण त्या गुणांनुसार चालु असते. मनुष्याने जर स्वपरिक्षण केले व माझ्या मनाला नेमके काय हवे आहे आणि माझे मन कश्यामुळे आनंदी होते हे शोधले तर त्याचे उत्तर त्याला मिळते. स्वपरिक्षणामध्ये मी काय मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि तसे नाही मिळाले तर मी अस्वस्थ कसा होतो ह्याचा शोध असतो. साधक आणि सामान्य मनुष्य हे दोघेही ह्या गुणांमध्ये अडकलेले असतात. सामान्य मनुष्य शेवट पर्यंत ह्या गुणांत अडकून राहतो. आणि साधक स्वतःच्या साधनेत जर तत्पर राहीला तरच त्याची ह्या गुणांतून सुटका होते. कोणत्याही गुणांच्या बंधनात व अडकता कालांतराने तो गुणांच्या पलीकडे जातो. आणि र्इश्वराच्या भेटीस प्राप्त होतो.
ॐ जय हो!
Respectful Pranaam(Bow) on the feet of Shree Sadguru.
Every human body is same in construction. Everyone has same organs like hands, legs, eyes, nose and ears etc but there is difference between behaviour, habits and nature of each person. Some people are calm while some get angry instantly, some are focused but some remained disturbed. There are various properties of various people. Actually basic needs of all human beings are same but choice and favorite things of everyone differs due to behaviour and way of thinking. Each person has some fix basic behavioral patterns. For example some people are egoistic for power; some always think that control should be in their hands; some think that they are only knowledgeable among all. Such type of traits can be observed in each of us. Thus behavioral traits and choice for favorite things are always in background of every karma (deed). We can’t get satisfied unless we achieve these things. We always desire for something different; something special even if our basic needs are fulfilled. Secondly, due to typical behavioral traits many precious moments in life are ignored which affects our self and even others around us. Those who are in greed of wealth- remain engrossed in worries for achieving more; those who want to show that they are most knowledgeable or intelligent are always in illusion that they know everything. Those who are hungry for recognition or appreciations never want anybody else to overcome their position.
We never see such things in own behaviour and never realize the effects of it. If we analyze ourselves and find what actually we require in life then surely we can get the right answer. This analysis can be done by asking this question to own– ‘What I wanted to achieve? If I haven’t achieved then what has happened in my life due to that or what is going to happen?’ Both Sadhak (Spiritual Disciple) and common man always remains engaged in all the above discussed behavioral patterns. The difference is- Sadhak after regular Sadhana practice can overcome all of these problems but common man remains habitual in all those situations and never realizes mistakes done. From regular Sadhana and spiritual growth Sadhak becomes neutral (worriless, desire less, no demands and no hopes) and becomes capable to reach up to the almighty God.
Om Jai Ho!
No comments:
Post a Comment