।। ॐ श्री परब्रह्म गोपालनाथाय नमः ।।
प्रत्येक मानव ईश्वराचा अंश आहे. प्रत्येक मानवी देहात आत्मा एक आहे. देह वेगळे असले तरी आत्मा एकच असुन प्रत्येक शरीरात अंशरूपाने व्यापलेला आहे. म्हणुन सर्व मानवजात एकच आहे. तरीही प्रत्येक देहाचे कार्य वेगळे होते ते त्याच्या कर्मामुळे. जीवनाचे ध्येय निश्चित असले की कर्म ध्येयाप्रमाणे घडत जाते. आपल्याला स्वतःला कसे जगायचे हे निश्चित करण्यासाठी उदार, ऊत्तम व पवित्र जिवन जगलेल्या मानवांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवावा लागतो. आपली आवड कशात आहे याचे आकलन करून घ्यावे लागते. ज्या ज्या थोर व्यक्तींनी ईश्वरी शक्तिचा अनुभव घेतला व समाजासाठी उत्कृष्ठ कार्य केले आहे अशा व्यक्तींचे चरीत्र स्मरणात ठेवून कार्य करावे. जिवनात उत्तम जिवन जगण्यासाठी आपल्या दिवसभरच्या लहान-सहान कर्मांचाही विचार करावा लागतो. आपल्या प्रत्येक कर्मातून इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. समाजात काहीतरी कार्य इतरांसाठी जर केले तर ते ईश्वराला आवडते. ज्या व्यक्ती स्वतःसाठीच कार्य करीत रहातात त्यांना कोणीही स्मरणात ठेवत नाही पण ईतरांसाठी कार्य करणा-यांचा आदर्श अनेक काळापर्यंत होत रहातो.
आपले ध्येय साध्य करायचे असल्यास सद्गुरूंनी दिलेल्या सत्नामाची साथ असावी लागते. ध्येयावर लक्ष्य व त्याला सतनामाची साथ जोडली तर आपले लक्ष्य कोणीही हिरावून घेणार नाही. नाम घेत राहीले तर ध्येयापुढे येणा-या अडचणी सहज पार पाडता येतात. ध्येयाच्या दिशेने मानव जर चालत राहीला तर जिवनात एक स्थिरपणा येतो.
ॐ जय हो!
We all have different bodies but soul residing in each of us is same. This soul is a part of Supreme soul or the Almighty God. Thus ultimately we all are equal. Differences are created due to past deeds and different aim of life. If aim of our life is fixed then our actions are focused in that way. To decide this way, we must idealize generous and courteous spiritual personalities. Also we must identify our areas of interest. If we consider biography of famous spiritual personalities who have taken experience of spiritual energy, we come to know that they have outstanding contribution in welfare of society. Their work must be kept always in our mind. For living better life, we should even take care of small things in day to day life such that our behavior should not hurt someone. It is rightly said; ‘Social service is the service to God’ therefore if we contribute our efforts for society then God also likes it. Those who work for society become ideal whereas who work for themselves remain unknown.
To achieve ultimate aim of life, support of holy Satnaam given by Sadguru is needed. Focused mind and togetherness of Sadguru can only help us to achieve the desired aim. Continuous remembrance of Satnaam helps to clear out the difficulties coming in front. If a person walks towards aim then the life becomes stable and peaceful.
Om Jai Ho!
No comments:
Post a Comment