Sunday, March 5, 2017

Spiritual Thoughts (March 2017)

।। ॐ श्री परब्रह्म गोपालनाथाय नमः ।।

ईश्वराची अनुभुती घेण्यासाठी शरीराची आवश्यकता असते. शरीर व्यवस्थित नसेल तर ईश्वरप्राप्तीमध्ये अनेक अडथळे येतात. ते अडथळे म्हणजे शरीराच्या व मानसिकतेच्या अडचणी होय. मानसिक अडचणींमध्ये मन, चित्त आणि बुध्दी येतात. त्यामध्ये मन नाना प्रकारच्या विचारात अडकलेले असते. चित्त स्थिर राहात नाही, बुध्दी नीट विचार करू शकत नाही. अशा वेळी शरीराच्या आतील इंद्रियांचा प्रभाव संपूर्ण शरीरावर पडत असतो. त्यामुळे शरीर कमकुवत होते, दुबळे होते व त्याची कार्यक्षमता दिवसेंदिवस कमी होते. मनुष्याच्या जीवनात अनेक अडचणींचे जाळे तयार होते. जगण्यासाठी लागणा-या सर्व गोष्टी उपलब्ध असुनही मनुष्य नीट जगु शकत नाही. अनेक नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव त्याच्यावर पडत असतो. त्यामुळे त्याच्या मानसिक अवस्थेत बदल होत राहतो. शरीराला सुध्दा अनेक व्याधी चालू होतात.

अशा मनुष्याला सद्गुरूंची आवश्यकता असते. त्यांनी दिलेल्या नामसाधनेची गरज असते. नामसाधनेने मनुष्य ईश्वरापर्यंत पोहोचतो व त्याचा जन्म-मरणाचा फेरा संपुन तो मुक्त होतो. त्यासाठी नामसाधनेबरोबर नियमित ॐकार जप करावा लागतो. कारण संपूर्ण ब्रम्हांडात ॐकार नाद भरला आहे. मानवी देह सुध्दा ॐकार रूपी आहे. ब्रम्हांडातील शक्तीचा मानवाच्या देहातील चेतनेशी जवळचा सबंध आहे. आणि नियमित ॐकार म्हणत राहिल्याने देहाच्या चेतनेशी ब्रम्हांडातील शक्तींचा संयोग होतो. या संयोगातुन ज्या लहरी तयार होतात. त्यांचा परिणाम मन, चित्त, बुध्दीवर होतो. मन शांत होते, चित्त स्थिर होते व बुध्दी व्यवस्थित कार्यरत होते. तेव्हा नामसाधना सुरळीत चालू होते. या बरोबरच शरीराच्या सर्व अवयवांवर सुध्दा ॐकार-नादाचा परिणाम होवून शरीर अधिक कार्यशील बनते. मनातील कमकुवतपणाची भावना नाहीशी होते. त्यामुळे शरीराचे कार्य जोमाने चालू होते. बाहेरच्या वातावरणातील बदलांचा परिणाम शरीरावर लवकर होत नाही. मन आनंदी व उत्साही राहाते. त्यामुळे साधनेचा जोर वाढत राहातो. अनेक शारिरीक व मानसिक आजार जे औषधोपचाराने बरे करता येत नाहीत असे आजार ॐकार साधनेने आटोक्यात येतात. ॐकाराने उत्साही झालेले शरीर सतनामाच्या साधनेला पोषक ठरते. आधी ॐकार साधनेने मन सामर्थ्यवान बनते. नंतर शरीराची वाटचाल आत्मउध्दाराकडे चालु होते. अशा साधनेने कुंडलिनी शक्ती लवकर प्रवाहित होवून कार्यरत होते व मनुष्याला मुक्तीचे दरवाजे खुले करते.

ॐ जय हो!


A mentally as well as physically fit human body is the most essential requirement for taking divine experience of God. If body is not fit then many problems occur in the spiritual path. These problems are physical as well as psychological. Psychological problems are related with Mana-Chitta-Buddhi (Mind-Intellect-Memory). Our mind becomes unstable & thinking ability decreases. In such situation inner sensory organs of body take charge over body, thus gradually it becomes weak and its work efficiency gets reduced. In short, a web of problems is created around us. All the required things are around but still we cannot live properly with peace. In this condition all the surrounding negativities easily affect us, that is why mind remains unstable.

Sadguru’s support is the only solution for all these problems and Naam-Sadhana given by him is the medicine. Only Naam-Sadhana can help a person to reach up to the God and attain Mukti (Liberation from birth-death cycle). But along with this Naam-Sadhana, Omkaar Jap (Repeating several times) is also very important. Because, The Naad (sound) of Omkaar is spread all over the universe and human body is also shaped as Omkaar. There is a relationship between energy in the universe and human consciousness, regular Omkaar-Jap connects this spiritual energy in the universe with energy in human body. When these energies combine, certain waves are created which initiate healing of psychological problems. After this, Naam-Sadhana begins to prosper. Now mind remains happy and peaceful. Omkaar-Jap also shows its effect on various organs and regenerates the efficiency of the body which was lost earlier. Thus many types of physical and mental problems/illness which cannot be treated by medicines can be treated by Omkaar-Jap. So we can say that Omkaar-Jap makes human body capable for Naam-Sadhana. Due to regular Sadhana practice Kundalini Shakti (Serpent Power) in the body awakens, which brings spiritual bliss & many divine experiences. Finally doors of Mukti are opened.

Om Jai Ho!



All Rights Reserved. Om Jai Ho Vishwatmaka Parivar

1 comment: