।। ॐ श्री परब्रह्म गोपालनाथाय नमः ।।
मनुष्याच्या जीवनात सद्गुरूरंची अत्यंत आवश्यकता असते. सदगुरूंची प्राप्ती झालेल्या मनुष्याला दोन गोष्टींची कमतरता रहात नाही. एक म्हणजे सदगुरूंच्या कार्याची सेवा किंवा सामाजिक सेवा व दुसरी म्हणजे परमार्थप्राप्ती साठी लागणारी साधना. पहीली सेवा म्हणजे सदगुरूकार्याची सेवा केल्यामुळे मनुष्याला जीवन जगत असताना अनेक अडचणी व संकटे येत असतात. त्यांचे निवारण होत रहाते. मनुष्याचे अनेक जन्मीचे प्रारब्ध असते. त्यामुळे त्याला दु:ख मिळते. पण त्यासाठी सेवा हाच उत्तम उपाय आहे. जरी प्रारब्ध कठीण असले तरी त्याची तीव्रता का होईना ही सद्गुरूसेवेमुळे कमी होते. तसेच सेवा करता करता मनुष्याचा भक्तीभाव सुध्दा दृढ होतो. आणि त्याचे अंतकरण निर्मळ होत रहाते. मनुष्याच्या अंतकरणामध्ये अनेक गुण दोष असतात. ते हळूहळू कमी व्हावयास लागतात.
दुसरी गोष्ट म्हणजे साधना. साधनेमुळे मनुष्याची परमार्थाची वाटचाल सुरू होते. परमार्थ करणे म्हणजे आध्यात्मिक जीवनाची सुरूवात अध्यात्म जीवनाचे एक मुख्य अंग आहे. परंतु मनुष्यास ते माहीत नसते. आध्यात्मविषयी अनेक गैरसमज असल्यामुळे तो या जीवनाच्या भागाकडे दुर्लक्ष करतो. परंतू या एका आध्यात्मामुळे जीवनाचा इतर भाग सहज आणि सोपा होतो. कारण अध्यात्म जीवनापेक्षा वेगळे नाही. परंतु त्याची जीवनात कमतरता असल्यामुळे बाकीचे जीवन मनुष्याचे अवघड होवून जाते. जीवन सुखी आणि समृध्दपणे जगण्यासाठीच मानव जन्म ईश्वराने मनुष्याला दिला आहे. परंतू ते पूर्णपणे मनुष्य जगत नाही. आणि अपूर्ण राहूनच त्यांचा अंत होतो. शेवटी त्यास एकच प्रश्न पडतो. तो म्हणजे मला सुख असे काय मिळाले ? परंतु सद्गुरूंना शरण गेले तर जीवन परिपूर्ण होवून मनुष्य आनंदी होतो. व त्याच्या शेवटी त्यास समाधानच मिळते.
Om Gopalnathay Namah!!!
Sadguru’s existence in human life is very important. Sadguru’s existence in one’s life gives two things; opportunity of Sadguru-Karya or (social work) and secondly the bliss of Sadhana. While doing Sadguru-Karya, the problems and shortcomings in life are reduced to some extent. Humans have to face the effects of karma or deeds of past. These effects are also reduced if one is engaged in Sadguru-Karya. It also helps in purifying the mind also the devotion towards God increases.
Second important thing due to Sadguru’s existence in one’s life is Sadhana. Sadhana helps a person to move further in the path of spirituality. Spirituality is the one of the important part of Human life but people usually do not know this fact. Due to misunderstandings and misbelieves, people ignore this part of life. In fact, spirituality makes one’s life easy. Ignorance towards spirituality brings up many challenges in life. The almighty God has given life to all humans so that they can live happily and peacefully but people are unable to enjoy this fully till end of their life. Many people die unsatisfied thinking what actually I have achieved in life? Am I happy? But if one devotes his life to Sadguru, he is always satisfied and happy with complete life.
Om Jai Ho!
No comments:
Post a Comment