Tuesday, October 23, 2018

Spiritual Thoughts (October 2018)

।। ॐ श्री परब्रह्म गोपालनाथाय नमः ।।

आध्यामिक, आदिभौतिक व आदिदैविक या तीन प्रकारच्या तापापासून कोणत्याही मनुष्य प्राण्याची सुटका नाही. जीवन आले की यापैकी कोणत्याही एका तापामुळे मनुष्य त्रासून गेलेला असतो. अशावेळी तो परमेश्वराकडे धाव घेण्याचा प्रयत्न करतो. मनुष्याच्या डोक्यात अशी एक वेगळी भावना असते की परमेश्वराकडे धाव घेतल्याने सर्व प्रकारच्या व्याधीपासून तो मुक्त होईल. मनुष्य कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यास घाबरत असतो. त्यास आपल्याला कोणतेच दु:ख येवू नये असे वाटते. व ईश्वराकडे जाण्याचा मार्गच आपल्याला दु:खमुक्त करू शकेल ही खात्री असते. मग तो ईश्वराकडे पोहोचवणारी साधने शोधू लागतो. संकटापासून वाचण्यासाठी जीवनातील सर्व कर्म टाळण्याचा मनुष्य प्रयत्न करतो. कर्म टाळली तरी दु:ख संपत नाही. हे त्यास माहीत नसते. त्यामुळे ईश्वराला शोधण्याचा प्रयत्न तो बाहेर करत रहातो. परंतू ईश्वर हा मनुष्याच्या देहात आधीच आलेला असतो. आत्म्याच्या रूपाने शरीर चालवित असतो. ईश्वर मनुष्याच्या देहापासून वेगळा नसून शरीराचा कार्यभार सांभळणारा कर्ता असतो.

ईशतवराने मनुष्याला सुखी समाधानी जीवन जगण्यासाठी अनेक साधने उपलब्ध करून दिली आहे. म्हणजेच गुरूमार्ग निर्माण करून दिला आहे. गुरूमार्गातील साधना रोजच्या जीवनात सुख व समाधान आणण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. मनुष्याच्या रोजचा जो दिनक्रम असतो त्यात मनुष्याने साधनेचा दिनक्रम सुरू केला तर दिवसभरातील सर्व कामांवर त्याचा परिणाम होतो. बुध्दी कुशाग्र होते व मनुष्य सहजपणे सर्व कर्म करावयास लागतो. कुशाग्र बुध्दीच्या व्यक्तीला अतिशय कमी संकटे येतात. कारण संकटाच्या येण्याच्या अगोदर तो तरतूद करून स्वत:ला संकटापासून दूर ठेवण्यास सक्षम होतो. असा मनुष्य स्वत:ची आर्थिक उन्नती तर करतोच त्या बरोबर स्वत:च्या शरीराची काळजी घेतो. व शरीर निरोगी ठेवतो. त्यामुळे आर्थिक व शारिरीक समस्येवर तो मात करतो. आणि या दोन्ही समस्यांमुळे निर्माण होणारी मानसिक अडचण स्वत:च साधनेच्या जोरावर दूर करतो. त्यामुळे त्याचे जीवनमान अधिक सुधारते व साधना करण्यासाठी अधिक तत्परता येते. नियमित व योग्य साधनेमुळे मनुष्याला स्वत:मधील आत्मतत्वाचे ज्ञान होते आणि त्याचे जीवन परिपूर्ण होवून जाते.

Om Gopalnathay Namah!!!

According to ancient scriptures Adhibhautik (Physical), Adhidaivik(Divine) and Adhyatmik(Spiritual) are the sources of unhappiness in Human life. Every human being suffers from unhappiness caused due to any of these three sources. When problems arise, people remember God and common tendency is that; problems will get solved if we pray God. In Fact no one is ready to face problems in life; everyone thinks that ‘problem should never come in my life’. Thus normally people think that the pathway to reach upto the God will keep them always happy. So people try to search and follow such way. In this process, people don't have much importance in their routine work (chores). Troubles or Unhappiness never stop even if routine work is neglected. In this way people try to search God somewhere outside but the fact is God already resides in the form of soul in every human being.

God has provided many sources for humans to live a comfortable life. The ‘Guru-Marga’( Spiritual pathway of Guru) is one of them. Sadhana is the most important part of the Guru-Marga. Daily Sadhana practice increases overall work efficiency in day to day activities. This practice also makes a person clever and efficient. Such a person faces comparatively lesser problems than others as he already knows what problems can arise in front of him and how to avoid them. Such person becomes economically stable and also takes care of own health. Problems arising from economical condition and health troubles result in mental disturbances. Regular Sadhana practice helps to overcome all these problems. Eventually the person moves forward towards Atmagyan(Experience of soul residing in own body) and life reaches towards fulfillment.

Om Jai Ho!



All Rights Reserved. Om Jai Ho Vishwatmaka Parivar

Friday, September 21, 2018

Spiritual Thoughts (September 2018)

।। ॐ श्री परब्रह्म गोपालनाथाय नमः ।।

अध्यात्मिक जीवनाची सुरूवात करण्यासाठी कोणत्याही विशिष्ट गुणांची आवश्यकता नसते. प्रत्येक मनुष्य देहाला स्वत:च्या आत्म्याची ओळख करून घेता येते. त्यासाठी परिपूर्ण गुरू मात्र आवश्यक आहे. इतर अनेक गोष्टीमध्ये मनुष्याला स्वत:ची पात्रता बनवावी लागते. किंवा अनेक परिक्षातून पार व्हावे लागते. परंतू आध्यत्मिक जीवनाचा प्रारंभ करताना मनुष्याची फक्त दृढ इच्छा असावी लागते. आध्यत्मिक म्हणजे पूर्णपणे देहाच्या आतील रचनेचा अभ्यास होय. त्यासाठी बाह्य गुण लागत नाही. ज्या ज्या मनुष्याचा श्वासोच्छावास चालू आहे तो हा अभ्यास करू शकतो. गुरू मनुष्याला सहज स्विकारून शिष्यपद देतात. शिष्यत्व धारण केले की स्वअभ्यास चालू होतो. थोडा वेळ थोडा एकांत मात्र आवश्यक आहे. गुरूंच्या अनुग्रहाने मनुष्याची कुंडलिनी शक्ती जागृत होते. एका एका चक्रावर ती मार्गक्रमण करीत शरीरात वर चढत रहाते. जशी जशी ती वरती चढते तसतसे मनुष्याला अनेक प्रकारचे अनुभव येवू लागतात, आणि येथुनच मनुष्याच्या जीवनाचा आध्यात्मिक अभ्यासाचा प्रवास सुरू होतो. मग जीवनाच्या आंतरिक बदलांना खर्या अर्थाने सुरूवात होते. कुंडलिनी शक्ती म्हणजे मनुष्याच्या शरीरातील एक अशी ऊर्जा आहे, कि ती शरीराच्या वरच्या दिशेला प्रवाहीत होत रहाते आणि मनुष्याला ब्रम्हांडाचे संपूर्ण ज्ञान करून देत रहाते. जोपर्यंत मनुष्य ध्यान साधना करीत रहातो तोपर्यंत ती वर वर चढते व ज्या वेळी मनुष्य ध्यान साधना बंद करतो, तसा तीचा वरच्या दिशेचा प्रवाह जागच्या जागी थांबतो. गुरूंच्या अनुग्रहीत व्यक्तीचा कुंडलिनीचा प्रवास आहे तिथेच थांबतो, परंतू अन्यमार्गाने साधना करणार्या मनुष्याने साधना थांबवली तर त्याची ऊर्जा पुन्हा खाली येवून तीच्या मूळ जागी स्थिरावते.

Om Gopalnathay Namah!!!

To enter into spirituality, there is no need of any specific qualities. Everyone can reach up to self-realization for that you need the perfect Master or Guru. For achieving any other things in life, one needs specific qualification or skills, but to enter into spiritual life only strong determination is needed. Spirituality is deep study of human body. This study is very important in the path of self-realization. One, who can breathe, is eligible for starting spiritual life. It means any human being can follow this path.

Guru easily accepts the interested person and offers discipleship. After accepting discipleship, the study of self (body & soul) begins. Also one has to dedicate small amount of secluded time for self. After taking Anugraha from Gurudeo, the serpent power or Kundalini Shakti inside disciple begins to awaken. This power gradually starts to rise upwards crossing different chakras in the body. As it rises upwards, the person gets various experiences which were not felt ever. Such power/energy is the only one which rises upwards in the body and gives the person, knowledge of universe. This serpent power rises upwards as the person increases Sadhana. If the person stops doing Sadhana, the power stops rising and remains at the place. But if a person without Anugraha from Guru, stops his Sadhana the Kundalini Shakti again resides down at its original location. This is difference between Sadhana of person without Guru and the Anugrahit Disciple.

Om Jai Ho!



All Rights Reserved. Om Jai Ho Vishwatmaka Parivar

Tuesday, July 24, 2018

Spiritual Thoughts (July 2018)

।। ॐ श्री परब्रह्म गोपालनाथाय नमः ।।

परमपूज्य सदगुरूंच्या चरणी अनंत नमस्कार.

सदगुरूवाचोनि जन्म निष्फळ
सदगुरूवाचोनि दु:ख सकळ
सदगुरूवाचोनि तळमळ
जाणार नाही श्रीराम

मानव जन्माला येवून जर गुरू केले नाही. तर जन्म वाया जातो. कारण गुरूंशिवाय जन्माला येण्याचे कारण कोणीच सांगू शकत नाही. ज्याप्रमाणे जगात वावरण्याचे शिक्षण माता – पिता देतात. आजारपणाचे औषध डॉक्टर देतात. व्यवहारासाठीचे शिक्षण शालेय गुरू देतात. तसे जन्माचे रहस्य शिकविणारे ही गुरू असतात. मनुष्याला शारिरीक, मानसिक तसेच आर्थिक अडचणी जगताना येतच असतात. त्यापासून त्याला कोणीच मुक्त करू शकत नाही परंतू आध्यात्मिक गुरू मात्र या सर्व अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्य मनुष्याला नक्कीच देतात. जगणे सुलभ व सोपे करून देतात. शिवाय आपला देह चालविणार्या परमेश्वराची ओळख करून देतात. या परमेश्वराची ओळख फक्त गुरूच करून देवू शकतात. त्यानंतर मनुष्य पूर्णपणे सुखी होतो. परमेश्वराला जाणण्याचा मार्ग गुरूंशिवाय कुठेच मिळू शकत नाही. आणि या मार्गाचा अवलंब करण्याचा अधिकार परमेश्वराने फक्त मानव देहाला दिला आहे.

सर्व प्रकारच्या ज्ञान आणि विज्ञान यांच्या पलिकडे आध्यामिक ज्ञान आहे. ते फक्त गुरू सहवासानेच प्राप्त होते. आतापर्यंत जेवढ्या संतानी आणि थोर पुरूषांनी या जगात उत्कृष्ट कार्य केले ते फक्त गुरूंच्या आर्शिवादाने केले. गुरूंनी दिलेल्या नामसाधनेमुळे मनुष्य कोणतेही अशक्य कार्य सहज साध्य करतो. कितीही दृष्ट प्रवृतीचा मनुष्य असो किंवा कुठलाही अपराधी असो एकदा गुरूमार्गाला तो लागला तरी त्याचा उध्दार होतो. उदारणार्थ वाल्या नावाचा दरोडेखोर नामसाधनेनेच महान तपस्वीपदाला पोहोचला. गुरू कोणत्याही मनुष्याचा सहज स्विकार करतात व त्याचे जीवन उजळून टाकतात. ज्याप्रमाणे परीसाला कितीही गंजलेले लोखंड लागले तरी त्याचे सोने होते तसे गुरू परिसाचे कार्य करतात व कितीही अवगुणी कितीही दुराचारी मनुष्य असला तरीही त्याचा उध्दार सहज करून त्याला मुक्त करतात.

Om Gopalnathay Namah!!!

Life without Anugraha from Guru is meaningless because no one can explain the reason and motto of human birth except him. Parents introduce us to the world and teach how to deal with it, Doctors teach to live healthy and Teachers teach to earn for livelihood. In the same way Gurudeo teaches the way to live peaceful life. Everyone have to face physical, mental as well financial problems in life. No one can release you from cycle of these problems but you can surely get the energy to face these problems from spiritual way of gurudeo. This way makes life easy. Gurudeo introduces us to the almighty God. Only human beings can follow this spiritual path to reach upto the God.

Spiritual knowledge is beyond the limits of science and it can be obtained only in the proximity or companionship of Gurudeo. Up till now many saints and eminent personalities have worked and have given significant contribution for the betterment of people. This got possible only because of blessings from their Guru. After regular Naam-Sadhana practice taught by Gurudeo, one can easily solve complicated problems in life which seem impossible. This path brings complete transformation in one’s life and can even turn a criminal into a normal person. There is a famous example for this: Sage Valmiki from Ramayana was initially a burglar who was transformed into Sage by Guidance of Naradmuni. Guru never keeps difference between any people so can easily accept any kind of person interested to follow Spiritual path. Guru is like a sacred stone which turns iron into gold. However immoral a person may be, Guru can change him to vice person.

Om Jai Ho!



All Rights Reserved. Om Jai Ho Vishwatmaka Parivar

Tuesday, June 19, 2018

Spiritual Thoughts (June 2018)

।। ॐ श्री परब्रह्म गोपालनाथाय नमः ।।

परमेश्वराने ज्या सृष्टीची निर्मिती केली तिलाच माया हे नाव आहे. परंतू मनुष्य तिलाच दुषणं देत बसतो. खर तर ईश्वर व माया दोन वेगळे भाग नाही तर एकातुनच दुसर्याची उत्पती होय. सृष्टीतील प्रत्येक घटक हे मायेचे रूप आहे. उदा: डोंगर, झाडे, पाणी, वारा आणि इतरही सर्व घटक मायाचेच रूप आहे. या सर्व घटकांशिवाय सृष्टी असूच शकत नाही. त्याचबरोबर मनुष्य देह सुध्दा मायचेच रूप आहे. या सृष्टीतील ज्या ज्या घटकांची निर्मिती होते आणि नंतर नाशही होतो ते मायेच्या रूपातच येतात. तसेच मनुष्याला देहाची सुध्दा काही काळापुरती निमिर्ती होते आणि नंतर नाश होतो. त्यामुळे मनुष्य देहाला सुध्दा मायाच म्हणतात. तरीही मनुष्य या मायेला नाकारतच रहातो. माया आहे म्हणूनच मनुष्याला ईश्वरापर्यंत पोहोचता येते. कारण ईश्वराला जाणण्यासाठी देह जरूरीचा आहे. मनुष्य देहामध्ये अनेक गुण असतात. उदा: काम, क्रोध, राग, लोभ, व्देष, मोह हेही मायेचे रूप आहे. मनुष्य मात्र या सर्वही गुणांना वाईट ठरवतो. परंतू या गुणांमुळेच मनुष्याच्या जीवनात समतोल रहातो. म्हणजे मनुष्याला काही प्रमाणात त्यांचीही आवश्यकता असते. कारण नुसतेच चांगल्या गुणांचे अस्तित्व राहीले तर जीवनात रूची राहाणार नाही. वेगवेगळ्या गुणांचेच उतार जीवनात असल्यामुळे मनुष्याच्या जीवनात विविधता आढळते. आणि या विविधतेमुळे मनुष्य उत्साही व आनंदी रहातो. जगण्यासाठी जशी माया उपयुक्त आहे. तशीच ईश्वराच्या प्राप्तीसाठी सुध्दा तीचीच आवश्यकता आहे. मनुष्याच्या शरीरात अनेक प्रकारे तीचे अस्तित्व आहे. शरीरात कुंडलिनीशक्तीच्या रूपाने तीचे वास्तव्य आहे. ती कुंडलिनी गुरूकृपे शिवाय कार्यरत होत नाही. तीचे कार्य चालू झाले तरच मनुष्य ईश्वरापर्यंत पोहचतो आणि मुक्त जीवनाचा आनंद घेतो.

Om Gopalnathay Namah!!!

The universe created by the Supreme soul/God is also known as ‘Maaya’. Actually the Brahma (Supreme Soul) and Maaya are the outcomes of one another. Everything in the universe is the appearance of Maaya. Tree, hills, water, air and also Human body is a part of Maaya. Whatever borns and dies in this universe is a part of Maaya. Thus human body is also called Maaya. People ignore the existence of Maaya but in fact only because of Maaya one can reach upto God. Human body consists of various qualities like Anger, jealousy, lust, hatred and attraction. People try to prove that these qualities are bad. But actually these things help in maintaining balance of life as life will not be much interesting if everything goes in a right manner. Ups and downs in life occur due to these qualities and variance is maintained, this variance keeps people enthusiastic and happy. As Maaya is essential in livelihood, it is also essential in the spiritual path. Maaya dwells in form of ‘Kundalini Shakti’/ Serpent power in human body. This power comes in action only due to Gurukrupa(Anugraha from Guru). This power helps people in path to reach upto God and makes life happy.

Om Jai Ho!



All Rights Reserved. Om Jai Ho Vishwatmaka Parivar

Wednesday, May 16, 2018

Spiritual Thoughts (May 2018)

।। ॐ श्री परब्रह्म गोपालनाथाय नमः ।।

सुखी जीवन जगण्याची ओढ ही प्रत्येक मनुष्यात दिसून येते. परंतू मनुष्यामधील अज्ञान अहंकार व्देष व आसक्ती या गुणामुळे त्याच्या सुखात अडथळा निर्माण होतो. सुखी जीवनासाठी मनुष्य अनेक प्रकार अवलंबत असतो. नाना प्रकारचे प्रयत्न करीत रहातो. सुखी होण्यासाठी बाह्यबदल करून उपयोग नसतो. तर मनुष्याच्या स्वत:च्या अंतकरणातील बदल उपयोगी पडतो. अंतकरणातील बदलासाठी अंर्तमुख व्हावे लागते. स्वत:च्या अंतरंगातील गुणांचा पडताळा घ्यावा लागतो. म्हणजेच माझ्यात कोणते गुण चांगले आहे व कोणते गुण वाईट आहेत हे शोधावे लागते. माझ्यात कोणकोणत्या इच्छा अधिक तीव्र आहे. हे शोधावे लागते. चांगले गुण म्हणजे दया, क्षमा म्हणजेच मला दु:खी पिडीत जीवाची करूणा येते का ? त्यांच्या विषयी दया भाव माझ्यात निर्माण होतो का ? आणि कुणी कितीही अपराधी असेल तर मी त्याला माफ करू शकतो का ? इतर जीवांविषयी मदत करण्याची माझी वृत्ती होते का ? असे अनेक चांगले गुण आहेत यातील माझ्यात किती गुण आहे.याचा पडताळा घेता आला पाहीजे त्या बरोबरच वाईट गुण म्हणजेच राग, लोभ, मोह व्देष इत्यादी. मला कोणकोणत्या व्यक्तींचा राग येतो. त्या बरोबर इतरांकडे काही वस्तू असेल तर मलाही त्या मिळविता आल्या पाहीजेत असा मोह माझ्यात निर्माण होतो का ? माझ्याकडे गरजेपुरते सर्व असूनही अधिक मिळविण्याचा हव्यास माझ्यात आहे का ? इतरांकडील धन हिसकावून घेण्याची वृत्ती माझी आहे का ? मी इतरांचा तिरस्कार करतो का ? असे अनेक वाईट गुण आहेत. या दोन्ही प्रकारच्या गुणांचे शोधन करण्यासाठी स्वकेंद्रित व्हावे लागते. एकदा स्वत:च्या गुणांचा शोध मनुष्याने चालू केला तर तो आपोआप आत्मकेंद्रित व्हावयास लागतो. त्यासाठी नामसाधना करणे आवश्यक आहे. नामसाधने शिवाय मनुष्य स्वकेद्रिंत होवू शकत नाही.

स्वकेंद्रित झाल्यानंतर मनुष्य आपोआप स्वत:च्या आत्म्याशी एकरूप व्हावयास लागतो. मग तो स्वत:च्या गुणांमध्ये हवेतसे परिवर्तन करू शकतो. कधी कधी अती चांगले गुण मनुष्यास घातकही ठरू शकतात आणि अतिशय वाईट गुणांमुळे मनुष्य जीवनाचा नाशही घडवून आणतो. दोन्ही गुण केव्हा आणि कोठे वापरायचे हे मनुष्यास कळत नाही. परंतू जो आत्मकेंद्रित मनुष्य असतो. तो चांगला गुण कुठे वापरायचा आणि वाईट गुण कुठे वापरायचा हे चांगले जाणतो. त्यामुळे तोच मनुष्य दोन्ही गुणांचा उत्तम वापर करून जीवन सक्षमतेने जगु शकतो. आणि ज्या मनुष्याला दोन्ही गुणांचा वापर व्यवस्थित करता येतो तोच सगण मनुष्य बनतो.

Om Gopalnathay Namah!!!

Everyone wants to live a happy life but ego, malignity and ignorance becomes a barrier in the happiness. People keep trying in various ways for bringing happiness in life. To become happy in real sense, external changes are not useful but one needs to make changes in self. To make changes in Self one needs to be Antarmukhi (Concentration on inner side/soul). Along with this one has to sort and analyse own qualities. These qualities consist of both good and bad things. Good things are mercy, pity, etc. Whether I feel pitiful for people in sorrow? Can I forgive a criminal? Can I help people in need? Such type of questions should be asked to self for analysing good qualities. On which person, I get angry quickly and why? After looking at other people's assets/ things, do I think that I should also possess the same? If I am having enough what I need, still do I think to get more and more? Do I want to take away some other one’s wealth? Do I usually disdain others? These questions are to be asked for analysing bad qualities. For analysing both of these qualities one has to become self-centred. For this one has to practice regular Naam-Sadhana.

After becoming self-centred one can begin journey towards self-realization i.e. experience the existence of soul in the body. Due to this one can make changes required for self-improvement. More amount of good qualities is also not favourable, likewise more amount of bad qualities create problems in life. Both qualities are needed in life but one should know where to use good and where to use bad. A self-centred person can easily do this. One who can use these qualities in proper manner can live a better life.

Om Jai Ho!



All Rights Reserved. Om Jai Ho Vishwatmaka Parivar

Monday, April 16, 2018

Spiritual Thoughts (April 2018)

।। ॐ श्री परब्रह्म गोपालनाथाय नमः ।।

परमार्थ या शब्दाचा अर्थ म्हणजेच जीवनाचा परम अर्थ होय. परमार्थाचा मनुष्याच्या जीवनाशी अगदी जवळचा संबध आहे. परमार्थ हा जीवनाचाच एक भाग आहे. परंतू परमार्थाची मनुष्याला व्यवस्थित माहीती नसल्यामुळे व परमार्थाचे आचरण करण्यास अंत्यत कठिण आहे अशी चुकीची माहीती असल्यामुळे मनुष्य त्यापासून दूर रहातो. परमार्थासाठी नाना प्रकारचे क्रियाकलाप करावे लागतात असे त्यास वाटते. उदाहरणार्थ परमार्थाचा अंगिकार करण्यासाठी विशिष्ट वस्त्रांची आवश्यकता असते आणि ती परीधान केल्याशिवाय साधना होत नाही. खरतर साधनेसाठी मनुष्याचा देह महत्वाचा असतो. मनुष्याची त्वचा हेच मनुष्याचे वस्त्र आहे. ते नसेल तर परमार्थ होवूच शकत नाही. आणखी काही वस्तू जवळ बाळगल्या तर साधना उत्तम होते. असाही मनुष्याचा भ्रम आहे. परंतू साधनेसाठी कोणत्याही बाह्य वस्तूची गरज लागत नाही. मनुष्याने चित्त एकवटून साधना केली असता मनुष्य यशस्वी होतो. साधनेला बसताना विशिष्ट असे आसनही गरजेचे नसते. मनुष्याला वाटते मृगासन, व्याघ्रासन बसावयास घेतले तरच साधना चांगली होते व एकाग्रता साधते परंतू मनुष्याचे खरे आसन धरतीमाताच असते. मनुष्याला सहजपणे व एकांतात जे उपलब्ध असेल तेथे बसून ध्यान करता येते, ध्यान साधनेसाठी शरीराच्या आत बघावे लागते म्हणजेच अंर्तमुख व्हावे लागते. आणि त्यासाठी शरीरावरती कुठले अलंकार असोत वा नसोत याचा काही फरक पडत नाही. मनुष्याला असणारे डोळे, कान, नाक हेच त्याचे खरे अलंकार आहेत आणि ते आहेत म्हणून जगात तो सहज वावरतो. जगातील सर्व मनुष्यांशी संर्पक ठेवतो. हे अलंकार मनुष्याला महत्वाचे आहेत. परमार्थासंबधीच्या अनेक भ्रामक कल्पना मनुष्याच्या समोर आल्यामुळे मनुष्य परमार्थ करण्यापासून वंचित रहातो व त्याला जमेल तसे जीवन जगत रहातो. जीवन का व कशासाठी याचा शोध तो घेत नाही. मनुष्याला खर्या अर्थाने परमार्थिक जीवन जगायचे असेल तर त्यास सोपा उपाय म्हणजे नामसाधना होय. ज्या मनुष्याचा श्वास चालू आहे तो नामसाधना करू शकतो. कारण नामसाधना श्वसनाव्दारे करावयाची असते. इतर कोणत्याही गोष्टींची परमार्थासाठी आवश्यकता नाही, या जगात परमार्थाविषयी अनेक अवडंबर माजविल्याने सामान्य मनुष्य त्याकडे फिरकण्यास तयार होत नाही. ईश्वराने सर्व प्रकारच्या मनुष्यांस सहज व सोपा परमार्थ साधता यावा म्हणून कुठल्याही बंधनाची किंवा कुठल्याही गोष्टींची अट ठेवली नाही. उलट नामसाधनेसारखा सोपा उपाय मनुष्यास दिला. या नामसाधनेमुळे मनुष्य परमार्थाची उच्च गती साधून ईश्वराशी एकरूप होतो.

Om Gopalnathay Namah!!!

In the word ‘Parmartha’ Param means main/prime and artha means meaning. So Parmartha means the prime meaning of life. There is a close connection of Parmartha with human life. Parmartha is actually a part of human life but due to lack of information and misconception; that it is difficult to understand, keeps people away from it. People think that to follow Parmartha one has to do particular things; for e.g. Wearing special clothes for doing sadhana etc. In reality there is no need of special clothes for Sadhana. Skin is the outfit of human body so human body is the prime requirement for Sadhana. There are also few people who use or carry some specific objects for doing Sadhana. In fact Sadhana doesn’t require any external objects; it just requires concentration of mind. Some people believe that for good concentration of mind during Sadhana Vyaghrasana ( Skin of tiger) or Mrugasana(skin of Deer) is needed as a seat. In reality no specific seat is needed for doing sadhana, one can sit anywhere on the ground and do Sadhana. Inner concentration is the only important thing for Sadhana, ornaments on human body don’t make any difference. Eyes, nose and ears are the true ornaments of human body with the help of which humans can live comfortably and communicate with each other. Various misconceptions and beliefs about Parmartha are spread among people due to which they are distant/deprieved from it. They live life in their own way. They never search the meaning of life. Naam-Sadhana is the only easier and peaceful way to follow Parmartha. One who can breathe, can do the ‘Naam-Sadhana’ as Naam- Sadhana is based on breathing actions. God has not kept any condition or strict rules in Parmartha so that humans can easily follow its way. By regular Naam- Sadhana practice, one can reach upto the peak of Parmartha and achieve unification with the God.

Om Jai Ho!



All Rights Reserved. Om Jai Ho Vishwatmaka Parivar

Sunday, March 25, 2018

Spiritual Thoughts (March 2018)

।। ॐ श्री परब्रह्म गोपालनाथाय नमः ।।

आत्मसाक्षात्कार करून घेवून ईश्वराची अनुभुती घ्यावी यासाठीच मनुष्याचा जन्म आहे. आत्मसाक्षात्कारासाठी बुध्दी स्थिर व मन एकाग्र करावे लागते. सदगुरूंनी दिलेल्या साधनेशिवाय ते शक्य नाही. सदगुरूंनी अनुग्रहीत केल्यानंतर नियमितपणे साधना करावी लागते. रोज सातत्याने थोडे थोडे मन साधनेमध्ये एकाग्र करीत गेल्याने मनाला, शरीराला हळूहळू सवय लागते. एकाग्रतेचा मनाचा स्तर हळूहळू वाढतो. सुरूवातीला मन एकाग्र करताना ते इतरत्र अधिकच धावू लागते, विचारांचे काहूर माजते. एरव्ही विचार प्रभावशाली नसतात. त्यांच्या नेहमीच्या गतीमध्ये कार्यरत असतात. त्यांचे शरीरात असणारे कार्य सुरळीत चालू असते. परंतू जेव्हा त्यांच्यावर बंधने यायला लागतात. तेव्हा ते अधिकच उसळून वर येतात आणि मनात गोंधळ माजवितात. साधनेच्या वेळी ते अधिकच प्रभावशाली बनतात. मनुष्याच्या साधनेमध्ये व्यत्यय आणावयास लागतात. कारण आतापर्यंत शरीरातील सर्व इंद्रियावर त्यांची सत्ता असते. त्यांच्या कार्य करण्यात त्यांना बाधा नको असते. अशावेळी मनुष्याला स्वत:चे आत्मबल वाढवून साधनेसाठी बसावे लागते. रोज नियमित केलेल्या साधनेने हळूहळू मन एकाग्र होवून विचार शांत व्हावयास लागतात. शांत व स्थिर मनुष्यच नेहमी आपली कार्य व्यवस्थित पार पाडतो व यशस्वी होतो. असा मनुष्याची वाटचाल अज्ञानाकडून ज्ञानाकडे होत रहाते.

जीवनाला बंधनात पाडणारी अंहकार, अज्ञान, आसक्ती, व्देष अशी अनेक प्रकारची दु:ख देणारी बंधने आहेत. या बंधनामुळे मनुष्य शाश्वत सुखापासून नेहमी दूर रहात असतो. ज्ञानाच्या वाटचालीमुळे ही बंधनेच त्याच्या दु:खाची कारण आहेत हे प्रथम मनुष्याला समजते. आणि त्यासाठी साधनेचा जोर वाढवावा लागतो. हे समजून मनुष्य जोमाने साधनेच्या मार्गावरती मार्गक्रमण करीत रहातो. या रोजच्या प्रयत्नाने एक दिवस तो निश्चितच मुक्त होवून जातो.

Om Gopalnathay Namah!!!

The motive behind human birth is to attain self realization and experience the God. To attain self realization one has to make mind stable and concentrated. This is not possible without Sadhana given by Sadguru. After getting Anugraha from Sadguru one has to practice this Sadhana daily. This practice increases concentration power and body also becomes habitual to it. Initially when one tries to make mind stable, it deviates a lot. Normally the thoughts emerging from mind are not much effective. They continue their routine work in the mind and their effect on body. But if any kind of barrier comes in front, these thoughts get active and create confusions in mind. They also begin to create a disturbance during Sadhana. At such situations one has to make own mind strong and begin Sadhana. Daily Sadhana practice eventually increases the concentration power and makes mind stable which further decreases thoughts. Person with calm and stable mind can easily get successful.

Ego, ignorance, attachment, hatred are the barriers in life which create unhappiness. These barriers keep a person away from the divine spiritual bliss. Sadhana makes a person aware of these barriers and helps to overcome them. Thus each and every day Sadhana leads a Person towards Moksha (Salvation.)

Om Jai Ho!



All Rights Reserved. Om Jai Ho Vishwatmaka Parivar

Friday, February 16, 2018

Spiritual Thoughts (February 2018)

।। ॐ श्री परब्रह्म गोपालनाथाय नमः ।।

विश्वातील अनेक सतपुरूषांनी आणि संतानी ईश्वर प्राप्तीचा जो गुढ अभ्यास केला त्या अभ्यासामुळे ते परमोच्य गतीला प्राप्त झाले. तो अभ्यास म्हणजेच अध्यात्म होय. अध्यात्म म्हणजेच शरीराच्या आत ज्या सूक्ष्म क्रिया चालू आहेत त्यांचे अध्ययन होय. मनुष्याने शरीराच्या अंतरीक क्रियांकडे लक्ष केंद्रित केले तर शरीराच्या इंद्रियांवर त्याला सहज ताबा मिळविता येतो. उदाहरण जर द्यायचे म्हणले तर श्वासोच्छवासाची क्रिया शरीरात सतत चालू असते. प्राणायामाने किंवा गुरूंनी दिलेल्या साधनेने श्वसनाच्या गतीचे नियमन करता येते. या नियमनाने मनुष्याचे शरीर सुदृढ होते, त्याच्या मनाला शांती मिळते व त्यास स्थिरता येते. मनुष्याचे जीवन अनेक गोष्टींमध्ये विभागलेले आहे. त्याच्या जीवन जगण्यात अनेक प्रकारची विविधता आहे. त्या विविधतेप्रमाणे त्याचे जीवन चालू असते. जीवनात काही प्रमाणात सुख तर काही प्रमाणात दु:ख अडचणी या येतच असतात. त्यांचा स्तर कमी अधिक प्रमाणात होतच असतो. परंतू मनुष्य नेहमीच सुखाच्या आशेने जीवन जगत असतो. जीवन सर्व सुखसोयींनी पूर्ण करण्याच्या मागे लागतो. त्यासाठी तो जीवनात अनेक बदलही करीत असतो. परंतू तो पूर्णता सुखी होत नाही कारण जीवनातील एक भाग म्हणजेच अध्यात्माचा भाग त्याचा तो स्विकार करीत नाही. अध्यात्मा विषयीच्या अनेक भ्रामक कल्पना त्याच्या डोक्यात असल्यामुळे तो स्वत:ला अध्यात्मापासून दूर ठेवित असतो. ज्या सुखासाठी मनुष्य धडपडतो तीच सुखे अध्यात्मामुळे दुरावली जातील ही भीती त्याला सतत वाटते. अध्यात्म म्हणजे जीवनाविषयी निरासक्ती होय व त्यात आनंदाचे क्षण हे नसतातच अशी कल्पना त्याच्या मनात दृढ झालेली असते. अध्यात्माच्या अभ्यासात जर दुसरी एखादी व्यक्ती जीवन जगत असेल तर त्या व्यक्तिविषयी मनुष्यास आदर वाटतो परंतू तेच अध्यात्म स्विकारण्यास तो स्वत: तयार नसतो.

अध्यात्म जीवनापैकीच एक भाग आहे आणि तो जीवनाच्या भाग नसता तर ईश्वराने तो निर्माणच केला नसता व विश्वातील साधू संतानी त्याचा अंगिकारच केला नसता. या एका भागाचे मनुष्याच्या जीवनात अस्तित्व नसल्यामुळे त्याला जीवन नेहमी अपूर्ण वाटते कितीही सुखे प्राप्त झाली तरी असमाधानच सदैव वाटते. जीवनात आणखी काहीतरी मिळविण्याचे शिल्लक आहे असे सारखे वाटते. जीवनाची ही अपूर्णता व उणीव एका अध्यात्मा शिवाय पूर्ण होवू शकत नाही. आणि मनुष्याचे जीवन पूर्णता सुखी होवू शकत नाही.

Om Gopalnathay Namah!!!

Many saints and holy personalities have studied the way to reach up to God. Due to this study, they have achieved a peak level in the world of spirituality. Spirituality is study of searching God inside our body which dwells in the form of soul. It is also the study of subtle actions going on inside human body. If a person concentrates on these inner actions, he/she can easily get control on own body. For example, the breathing action is continuously going on inside our body. So the way and speed of breathing can be controlled with help of Pranayama or Sadhana which Guru teaches after Anugraha. Due to this control, our body becomes internally strong and fit also mind becomes peaceful and stable. Human life is divided in various parts. There is variety in lifestyle of everyone. Phases of happiness, sorrow and problems frequently visit and move away from life, but people always need happiness. They try to make life comfortable and luxurious. In spite of all comforts one cannot be totally happy due to lack of spirituality in life. Misconceptions in mind about spirituality keep people away from this real happiness. Spirituality may hamper the comforts and luxuries of life; such type of false beliefs keeps them away from spiritual world which is actually more contented. If we have someone in front of us following spiritual path, a feeling of respect gets generated in our mind about that person but our mind doesn’t get ready to accept the same path for own self.

Spirituality is a part of life and if it was not; then God wouldn’t have created it; also, saints wouldn’t have followed it. Missing of this part in life makes people feel incomplete. They always feel that something more is to be achieved in life. This incompleteness can be only filled by spirituality. So, one cannot be totally happy without spirituality.

Om Jai Ho!



All Rights Reserved. Om Jai Ho Vishwatmaka Parivar

Saturday, January 6, 2018

Spiritual Thoughts (January 2018)

।। ॐ श्री परब्रह्म गोपालनाथाय नमः ।।

विश्वाची निर्मिती ज्या परमेश्वराने केली आहे. त्याच परमेश्वराने मनुष्य देहाची निर्मिती केली. पिंडी ते ब्रम्हांडी असे म्हणले आहे. म्हणजेच ज्या गोष्टी शरीरात त्याच विश्वात आहे. किंवा विश्वातील सर्व गोष्टी शरीरात आहे. उदा. पंचतत्वाने सृष्टी निर्मिली तीच पंचतत्वे शरीरात सुध्दा आहे. परमेश्वरापासून विश्व निर्मिले गेले. त्याच रचनेला माया म्हणतात. ते ते उघड्या डोळ्यांनी दिसते त्यास माया म्हणतात. म्हणजेच ते निर्माणही होते व त्याचा अंतही आहे. किंवा ती वस्तू लयासही जाते. शरीराचेही तसेच आहे. शरीराला माया म्हणतात व शरीर चालविणार्या चेतनेला आत्मा म्हणतात. शरीर उघड्या डोळ्यांनी दिसते. व आत्मा बघण्यासाठी अंर्तचक्षुची आवश्यकता आहे या अंर्तचक्षुची जाणीव गुरु करुन देतात. मनुष्या बाहेरील विश्वात बघुन शिकत शिकत जगतो नविन नविन अनुभव घेत असतो. गुरूंची प्राप्ती होण्याआधी तो विश्वातूनच शिकत शिकत जगतो परंतु या सगळ्याचे मुळ त्याच्या शरीराच्या आत आहे हे फक्त गुरुच शिकवतात. शरीरातील आतील अभ्यास केल्यानंतरच विश्वातील सर्व गोष्टींचा उलगडा खर्या अर्थाने होतो. आपण जन्माला का आलो व आपल्याला काय प्राप्त करायचे हे शरीराच्या आतील अभ्यासाने समजते. गुरुंनी दिलेल्या नामसाधनेने या सर्व गोष्टींचा उलगडा होतो. जे गुरु हा अभ्यास देतात त्या गुरुंवर श्रध्दा असावी लागते. म्हणजेच त्यांनी दिलेली साधना आणि नाम याने आपल्या जीवनाचे कल्याणच होणार हा दृड विश्वास असावा लागतो. कोणतीही गोष्ट पुर्णपणे स्विकारुनच करावी लागते. जोपर्यंत त्या गोष्टीविषयी मनांत थोडातरी संशय असेल तोपर्यंत ती साध्य होत नाही. मनांपासून स्विकार केला कि त्या गोंष्टींमध्ये मनुष्य पूर्णपणे उतरतो. व त्यात उतरल्यानंतरच त्या गोष्टींचे पूर्ण ज्ञान मनुष्याला होते व आत्तापर्यंत आपणच आपल्या दु:खाचे कारण होतो हे समजते. दु:खाचे मूळ कारण म्हणजेच मनुष्याचे अज्ञान होय. मनुष्याच्या मनाला वाटणारे चांगले वाईट सु्ख-दु:ख फक्त अज्ञानामुळे भासत असते. सुखी होण्यासाठी बाह्य वस्तूंची आवश्यकता नसते अंर्तमुखी मनुष्य खर्या अर्थाने सुखी होतो.

अंर्तमुखी साधना केलेल्या व्यक्तींच्या चेहर्यावर नेहमी आनंद दिसतो. शंतता दिसते, स्थिरता दिसते इतरांच्या आनंदात त्याला सहभागी होता येते. इतरांचा आनंद बघुन तो स्वत:ही सुखावतो. दुसर्यांच्या सुखात आनंदीत होणारा मनुष्य दुसर्यांचे दु:ख बघुनही दु:खी होतो. कारण सुखाचे रहस्य त्यात उमजलेले असते. त्याला नेहमी स्वत:सारखे इतर सर्वांनी सुखी व्हावे असे मनापासून वाटते इतरांच्या दु:खाने त्याच्या मनाची घालमेल होते मग तो इतरांच्या सुखासाठी प्रयत्न सुरु करतो ज्याला आनंद कशात आहे हे कळते तो स्वस्थ बसत नाही. सर्व मनुष्य सुखी होण्यासाठी प्रयत्नशील राहतो. सर्व मनुष्यांना सुखी करणे हे त्याच्या जीवनाचे ध्येयच बनते. अखंडपणे जीवन आहे तोपर्यंत तो सर्वांना सुखी व आनंदी करीतच जीवन प्रवास करतो.

Om Gopalnathay Namah!!!

The Almighty who has created the nature is the same who has created human body. Whatever is present in the world, is present in human body. For example, earth is made up of 5 elements, in the same way human body is also made up of 5 elements. God has created the nature which can be also called ‘Maaya’. Whatever that can be seen with open eyes comes under ‘Maaya’. All the things which originate/ take birth and die/come to end are part of ‘Maaya’. Human body is also ‘Maaya’ but the energy which keeps us alive is ‘Aatma’ or soul. Body can be seen with visible eyes but to see the soul one needs ‘Antarchakshu’ or inner vision. Guru is the one who reminds and explains about this inner vision. The reason behind our birth and prime motto of our birth is realized after beginning study of body and soul. Humans learn and adapt themselves by watching nature and whatever is going in front of them in the world. Experiences play important role in development of life. Before meeting Guru, a person believes what he/she sees in the outside world and learns from it. But the reason behind everything gets clear only after meeting Guru. One has to keep strong faith on Gurudeo who teaches this divine spiritual study and practice the ‘Naam-Sadhana’ taught by him regularly, as this ‘Naam-Sadhana’ only can bring positive changes in life. To complete some work or to bring a change, firstly we have to accept and believe it fully. It will never complete successfully if a single doubt remains in mind. We cannot get knowledge about anything unless we get totally involved in learning. The main reason behind sorrows in life is ignorance or lack of knowledge. The feelings of happiness and sorrow occur in mind due to ignorance. After accepting this fact, we come to know that the reason behind all sorrows is nothing else but me only. To become happy in the real sense one has to become ‘Antarmukhi’ (inner vision).

The one who becomes ‘Antarmukhi’ always seems happy and peaceful. Such person remains happy by seeing others happy and feels sorry in others’ grief as he/she knows the real reason behind their grief. This person now tries to make others happy. One who understands where the real happiness lies never remains idle. This person now starts to spread the knowledge and help others to become happy in their life. This becomes aim of such person’s life.

Om Jai Ho!



All Rights Reserved. Om Jai Ho Vishwatmaka Parivar