Tuesday, December 19, 2017

Spiritual Thoughts (December 2017)

।। ॐ श्री परब्रह्म गोपालनाथाय नमः ।।

कोणत्याही प्रकारचे मनुष्याचे जीवन असु देत. त्याला जगण्यासाठी आधाराची आवश्यकता असते. आणि सद्गुरूच असे असतात की ते मनुष्याला सर्व प्रकारे सुखी ठेवू शकतात. मनुष्य सृष्टीत अनेक गोष्टी शोधत असतो. शरीराच्या आतील चेतनेच्या साह्याने तो बाहेरील जग बघतो. परंतू कधीच आतमध्ये काहीच शोधत नाही. सदैव डोळ्यांचा वापर करून बाहेर बघतो. डोळे बंद ठेवून आत बघत नाही. मनाच्या साह्याने सर्व जग एका क्षणात फिरतो. परंतू तेच मन आत वळवून आतील जग बघत नाही. कारण आतील जग दाखवण्याचा मार्ग फक्त सदगुरूंजवळच असतो. इतर तो कोणीही दाखवू शकत नाही. प्रत्येक मनुष्याचे सदगुरूंशी नाते जुळले तर प्रत्येकाचे जीवन सुखकर होईल. मनुष्याला सर्वच गोष्टी बाहेर प्रदर्शित करता येत नाही. नातेसंबधही एका ठराविक मर्यादे पुरते असतात. मनुष्याच्या आत विचारांचा, कल्पनांचा खुप मोठा साठा असतो. तो सर्वच इतंराशी वाटता येत नाही. किंवा काही मनुष्यांचे स्वभाव असे असतात. कि त्यांना तो बाहेर कोणाशीही वाटता येत नाही. अशा वेळी सदगुरूंजवळ व्यक्त होता येते. सदगुरू म्हणजे साक्षात पिता परमात्मा ज्यांनी सर्व चराचराची निर्मिती केली आहे. एकदा त्यांच्याशी नाते जुळले कि अश्यक्य काहीच रहात नाही

सदगुरूंच्या संगतीमधील प्रवास अंत्यत सुखाचा असतो. शांतीचा असतो. जसे मनूष्याला एखाद्या ठिकाणी पोहोचायचे ती गाडी पकडून त्यात तो फक्त बसतो. ती गाडीच त्याला त्याच्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचवते. त्याला चालावे लागत नाही. तसेच सदगुरूंकडून एकदा नाम मिळाले कि मनुष्य ध्यानाला बसण्यास सुरूवात करतो. फक्त डोळे बंद करून नामस्मरण सुरू केले कि आपोआप सदगुरू परमात्म्या पर्यंत पोहचविण्याचे काम करतात. परमात्म्याचा शोध घेण्यासाठी बाहेर फिरावे लागत नाही. त्यासाठी सदगुरूंकडून अनुग्रह घेणे आवश्यक आहे. अनुग्रहाची क्रिया करून घेणे आवश्यक आहे.

आज सगळीकडे जगण्यासाठी स्वत:चा एक पुरावा लागतो. प्रत्येक गोष्टीला बाहेर स्वत:च्या नावाचा शिक्का लागतो. अगदी आपण कोणाच्या पोटी जन्माला आलो आहोत त्या आईवडीलांचे नाव आपल्याला लागते. त्याशिवाय बाहेर आपली काहीच ओळख नसते. बिना शिक्याशिवाय कोठेही कोणी घेत नाही. मग ईश्वरप्राप्तीलाही कोणाची तरी ओळख नको का? यासाठी सदगुरूंची ओळख करून घ्यावी लागते. व त्यांनी सांगितलेल्या मार्गाचे अनुकरण करावे लागते. नुसते जगणे व सदगुरूंच्या साह्याने जगणे यात फरक असतो. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे आचरण केले तर नुकसान काही होत नाही होते. कल्याणच होते. आणि जरी झाले तरी पुढील घडणार्या मोठ्या घटनेपासून ते आपल्याला सुरक्षित ठेवतात. त्यासाठी नामाचे चिंतन श्वासावाटे होणे आवश्यक आहे. नामाने मनुष्याच्या श्वासाची गती स्थिर होते. एरव्ही श्वासाच्या गती मध्ये शरीराच्या हालचालीप्रमाणे बदल होत असतात. परंतू नामामुळे तोच श्वास एका ठराविक लयामध्ये चालतो. श्वासाचा परिणाम मनुष्याच्या बुध्दी आणि विचारांवर होत असतो. श्वासाची गती अस्थिर असेल तर विचार अशांत राहातात. आणि श्वास स्थिर असेल तर विचार शांत होतात. शांत विचारांचा परिणाम शरीरावर सुध्दा होतो. शरीराची दुर्बलता कमी होवून शरीर सुदृढ व सक्षम होते. आणि शरीर विचार व्यवस्थित चालले तर मनुष्यामधील कल्पकता वाढते. त्याच्याकडून कामातील कौशल्य वाढते. कोणतेही काम तो सहज करू शकतो. मनुष्याला यशस्वी जीवन जगायचे असेल तर सदगुरूच असण आवश्यक आहे.

Om Gopalnathay Namah!!!

Each of us needs some kind of support in life. Sadguru is the only one who can keep us happy and support in the real sense. People search plenty of things in nature with the help of internal energy inside their own body, but never think or try to search for this internal energy. We can see the world with eyes open but never try to close our eyes and concentrate internally. We can imagine about the whole world in a moment with the help of our mind but cannot divert the mind internally. The way to see the internal world inside us can be only taught by Sadguru. If every human being gets connected with Sadguru, his/her life can definitely become happy. Humans cannot totally express their internal thoughts/feelings to anyone because every relation has some limitations. There is a huge stock of thoughts and ideas inside human mind which cannot be shared with everyone, but surely one can easily get open up freely before Sadguru. Sadguru is the Almighty; the creator of this universe thus if we get connected with him, nothing can be impossible for us.

The way of life in Sadguru’s companionship is very peaceful and happy. If a person exactly sits in the vehicle which is going to his required destination, there remains no worry. Similarly when a person receives ‘Naam’ from Sadguru and starts the ‘Naam-Sadhana’, automatically his connection with the Almighty begins. There is no need to search God anywhere outside. To learn this way of living life, one has to take Anugraha from Sadguru.

Nowadays for everything, you need a proof. You need to display some proof of your birth to show or explain that you are the son/daughter of your parents. Without reference or identity, you cannot move forward. Thus in the same way- in the path of Spirituality; to reach up to the God you need a reference of Sadguru and follow the path shown by him. There is a lot of difference between normal life and life according to Sadguru’s way. Living life according to Sadguru’s teaching is very secure and worriless. But for this, you need to remember Naam given by him in every breath. This Naam stabilizes the speed of breathing. Usually, our breathing speed depends on actions of our body but Naam makes the speed constant. Breathing affects our mind and thoughts. Whenever our breathing is unstable, our thoughts also get unstable. Breathing also has its effects on our body. Thus if a speed of breathing is kept constant it keeps mind stable and also helps in building immunity of the body. Stable thoughts and stable body increase creativity, imagination, and workability of a person so that he can perform any kind of work very easily. So to get successful in life every one of us needs Sadguru.

Om Jai Ho!



All Rights Reserved. Om Jai Ho Vishwatmaka Parivar

Sunday, November 12, 2017

Spiritual Thoughts (November 2017)

।। ॐ श्री परब्रह्म गोपालनाथाय नमः ।।

।। सदगुरू चरणी शतश: नमन ।।

मनुष्याच्या सुखी व आनंदी जगण्याचे रहस्य म्हणजे ध्यानधारणा होय. शरीराला एका जागी शांत व स्थिर बसवून गुरूंनी दिलेल्या सतनामाचे चिंतन करीत राहणे म्हणजेच ध्यान होय. शरीर जास्तवेळ एका जागी स्थिर बसू शकत नाही आणि स्थिर बसलेच तर मन स्थिर नसते. बाहेरून दिसायला शरीर शांत दिसते परंतू आत विचारांचे काहूर असते. असे मन व शरीर ध्यानासाठी उपयुक्त नाही मनाच्या शांतीमध्ये अनेक अडचणी येत असतात.

  1. मनुष्याचा स्वभाव
  2. मनुष्याचे आचरण
  3. मनुष्याचे गुण
  4. मनुष्याची असलेली नीती

मनुष्याच्या स्वभावात व आचरणांत चांगल्या व निर्मळ गुणांची गरज असते. समोरून एखादी व्यक्ती रागाने आपल्याशी बोलली तर आपल्याला त्यापेक्षाही अधिक राग येतो. आपल्याला कोणी मारले तर आपण उलट त्यावर आघत करतो. म्हणजेच समोरून होणार्या क्रियेवरती आपण लगेच प्रतिक्रिया देतो. या प्रतिक्रियेमुळे मनाची शांती ढळते. उदा- चेंडू जर भिंतीवर जोरात फेकला तर पुन्हा परतून तो आपल्याकडे तितक्याच जोरात येतो. असेच मनूष्याच्या स्वभावाचे आहे. याउलट जर आपण स्वत: बदलले तर आपल्यालाही तसाच प्रतिसाद मिळतो. म्हणजे कोणी जर रागाने बोलले तर आपण त्याला शांत व गोड उत्तर द्यावे. असे करण्याने आपला कोणताच कमीपणा नसतो; उलट समोरील व्यक्ती आपल्या उत्तराने शांत होते. आणि जरी नाही झाले तरी आपल्या मनाला होणारा त्रास वाचतो. आणि आपली शांती ढळत नाही. मनाच्या शांततेसाठी आपल्या स्वत:च्या मनाच्या थोडासा अभ्यास करणे गरजेचे असते. आपले मन कोणत्या गोष्टीने सर्वात जास्त क्रोधित / दु:खी होते याचा विचार करावा. कोणत्या वातावरणात गेल्याने / कोणत्या व्यक्तींच्या सहवासाने आपला आनंद नाहीसा होतो याचा विचार करावा. आपला आनंद कायम टिकण्यासाठी आपल्या मनावर आपल्याला नियंत्रण ठेवता यायला हवे. म्हणजे ज्या व्यक्ती / वातावरणाचा आपल्याला त्रास होतो त्याविषयी सर्व विचार बंद करावेत आपल्या मनाला ज्या ज्या सूचना आपण देऊ त्या सूचनांचे पालन मन करतेच काही कर्म शरीराने जरी करणे भाग असले तरी मनाने त्याचा विचार सोडून देता येतो. त्यामुळे मनावर त्याचे होणारे परिणाम टळतात आणि मनही निश्चिंत राहते. असे मन शांतपणे ध्यान करून स्वत:च्या स्वरूपापर्यंत पोहचते.

Om Gopalnathay Namah!!!

For all human beings, the only way to live a happy and peaceful life is Dhyaan-dharana (Meditation). Meditation is to make the body sit stable at a place and continuously remember Satnaam received from Gurudev. Our body cannot remain stable at a place for a long time and even if stays, it cannot make our mind stable. Even if our body seems to be stable at a place but lots of thought continuously keep moving in and out of our mind. Such unstable mind and body is not favorable for meditation. Few things which disturb mental peace are behavior, manners, values and traits.

Human behavior must possess purity in manners and behavior. If someone in front of you speaks angrily then you become angrier. If anyone beats you, you will try to beat back more strongly. It means we instantly react to the action taken on us. This reaction disturbs our mental peace. For e.g. a ball thrown on a wall with force will return back with the same force. So if you make a change in yourself, you may get a positive or good response from the other side. For e.g. if anyone speaks with you in anger and if you respond kindly, then surely that person will become quiet. This keeps your mind stable. For achieving mental stability we must study our mind first. What makes me happy /angry? In which environment or in whose company I get disturbed or become happy? Such type of questions must be asked to our own mind. To maintain wellness of mind, we must be able to control it. It means we must stop thinking about the person/ environment where we get disturbed. Our mind follows the instructions which are given to it. We must be able to condition our mind. Some work is physical which doesn’t require involvement of mind. In such case if we concentrate on work and keep mind stable at a side, it will help a lot in maintain peace of mind. In other ways the work which consist of thinking and concentration must be done with peace such that it should not involve any side by physical activity; example of this is- students have habit of playing with some objects while studying which reduces the concentration. This is related to work and stability of mind during work. But during meditation body must be stable and mind should be thought free. This state can be achieved after conditioning of mind.

Om Jai Ho!



All Rights Reserved. Om Jai Ho Vishwatmaka Parivar

Monday, October 9, 2017

Spiritual Thoughts (October 2017)

।। ॐ श्री परब्रह्म गोपालनाथाय नमः ।।

।। सदगुरू चरणी शतश: नमन ।।

सृष्टीमध्ये सजीव आणि निर्जिव अशा दोन्ही घटकांचा समावेश आहे. सजीव घटकांत सतत बदल होत असतात तर निर्जिव घटक जसे आहेत तसेच राहातात. सजीव घटक निर्माण होतो, हळूहळू विस्तार पावते आणि लयाला जातो. हा परमेश्वराने सृष्टीतील केलेला मोठा चमत्कारच आहे. सजीव घटकात मानवी देहाचा समावेश होतो. मानवी देह लहान गोळाच्या रूपात तयार होतो, पुढे पुढे मोठा होतो आणि वार्धक्याला जावून पुन्हा लयास जातो. देह एका उर्जेपासून म्हणजे चेतनेपासून तयार होतो. देहाच्या आत एक विशिष्ट ऊर्जा कार्य करीत असते. ती देहाची हालचाल व देहाचा विकास करीत असते. ही ऊर्जा म्हणजे शरीराला चालविणारा आत्मा होय. ही ऊर्जा देहाच्या आत वास्तव्यास असल्यामुळे ती उघड्या डोळ्यांना दिसत नाही. त्यामुळे तीला बघायचे झाले तर आणखी परिपूर्ण ऊर्जेची आवश्यकता असते ती ऊर्जा म्हणजे परिपूर्ण गुरू होय. अशा गुरूंची ऊर्जा नामाच्या रूपाने दुसर्या देहामध्ये प्रवेश करते आणि दुसर्या देहामधील ऊर्जेला प्रभावित करते. अशाप्रकारे दुसर्या देहाचा मार्ग आत्मस्वरूपाच्या भेटीसाठी तयार होतो. हा आत्मा शरीरात आहे तो निर्गुण, निराकार आहे. त्याला कोणताही रंग, रूप नाही. परंतू देहात तो कार्यरत आहे, हे मनुष्याला माहीती होण्यासाठी त्याचे प्रतिरूप म्हणजे सगुण रूप तयार केले गेले ते म्हणजे मुर्ती स्वरूप होय. जेणेकरून मनुष्याला बाहेरील मुर्तीस्वरूप पाहून स्वत:च्या आतील निर्गुण रूपाची म्हणजे आत्मस्वरूपाची आठवण राहील व त्या स्वरूपाच्या शोधासाठी तो प्रयत्न करेल. मनुष्याचा आत्मस्वरूपाचा शोध सुरू झाल्यावर त्याच्यात अनेक बदल होतात. मनुष्याच्या बुध्दीत अतीतीव्र पणे जो बदल होतो तो म्हणजे गुरूंनी दिलेल्या नामामुळे. जसे भांड्यातील पाण्यात थोडासा रंग कालवला तर ते पाणी रंगीत होते. तसे नाम शरीरातील इंद्रियांना बदलवित जाते. मनुष्यातील क्रोध, हिंसक स्वभावाला मऊ, शांत बनविते. निर्दई मनुष्याला इतरांवर दया करणे शिकविते. जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी घातक असतात, ज्या गोष्टींचा मानवी जीवनावर वाईट परिणाम होतो. त्या गोष्टीमध्ये परिवर्तन घडते. मनुष्याने योग्य त्याच गोष्टी केल्या म्हणजे योग्य अशी कर्म केली तर त्याचे जीवन सोयीचे व आनंदाचे होते याउलट कर्मे वाईट केली तर जीवन दु:खाचे व अडचणींचे बनते. परंतू कधी कधी चांगली व वाईट कर्मे कोणती हेच मनुष्याला समजत नाही आणि तेच नेमके नामसाधनेने समजते. त्यामुळे मनुष्य योग्य कर्मे करून स्वत:चा उध्दार करून घेतो.

Om Gopalnathay Namah!!!

Nature consists of living and non-living things. There is continuous change in living things while non living things remain unchanged. Living things take birth, expand and their death occurs after some time. This is actually a miracle of creator. Human body is also the same example. It develops from a very small baby to a fully developed adult and after some time reaches to death. Our body consists of a kind of energy on the basis of which its every action depends. This energy is the soul residing inside us. It cannot be seen visibly but can be experienced. To experience it, a special divine energy is required- which is Guru. The energy from Gurudeo passes to Shishya’s (disciples) body in the form of Naam. This Naam is the only way for the person/disciple to get divine experience of Atmaswaroop (Soul). The soul is actually formless and arbitrary but to experience it some form is needed and it is Idol. After watching idol, a person automatically focuses his mind towards soul residing inside his body that is why idols of God are created. As a person begins his search of soul, many changes takes place. The focus of his mind changes rapidly. This change is a result of Naam-Sadhana taught by Gurudeo. If some amount of color is added in a bucket full of water, the color of water changes; in the same way Naam brings changes inside human body and makes the person calm minded and strong. Such person can easily differentiate good and bad deeds. This is the result of Naam- Sadhana which brings reformation in life.

Om Jai Ho!



All Rights Reserved. Om Jai Ho Vishwatmaka Parivar

Saturday, September 9, 2017

Spiritual Thoughts (September 2017)

।। ॐ श्री परब्रह्म गोपालनाथाय नमः ।।

।। सदगुरू चरणी शतश: नमन ।।

परमेश्वराने सृष्टीमध्ये अनेक निरनिराळ्या गोष्टी निर्माण केल्या. त्याच्यात अनेक विविधता आहे. पृथ्वीचा एक मोठा गोल आहे. त्यात अनेक देश, डोंगर, नद्या, समुद्र यांचा समावेश आहे. त्यात मानवाचीही निर्मिती आहे. मनुष्याला जगण्यासाठी अनेक प्रकारची विविधता उपलब्ध करून दिली आहे. या विविधतेमुळे मनुष्य आनंदी जीवन जगु शकतो. मनुष्याला अनेक गुण दिले आहेत. मनुष्य सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विविध गोष्टीत जगतो. ही विविधता नसेल तर तो निरउत्साही होवून जातो. एकाच गोष्टीमध्ये सतत राहाणे त्याला जमत नाही. जगण्याच्या अनेक पैलुमध्ये तो रहातो. एखादी व्यक्ती सकाळी उठुन दहा तास काम करून दोन तास ईश्वरासाठी देतो. आणि उरलेल्या वेळ स्वत:च्या कुंटूबाला देत असेल तर रोज तो तीन प्रकारे जीवन जगतो. परंतु या जगण्यात त्याने आनंद निर्माण केला पाहीजे. म्हणजे त्याचा देह ज्या कार्यात असेल त्या कार्यात स्वत:च्या मनाला सुध्दा समाविष्ट केले पाहीजे. म्हणजे ज्यावेळी जे कर्म त्यावेळी फक्त त्याच कर्माचा विचार केला पाहीजे. जर एक कर्म करताना दुसर्या गोष्टींमध्ये मन ठेवले तर चालू कर्मात समाधान मिळत नाही. हे समाधान मिळण्यासाठी अंतरीची साधना त्याला मदत करते. ईश्वराने त्याला विसरणे हा मोठा गुण दिला आहे. परंतु मनुष्य जगणे सोपे व्हावे म्हणून ईश्वराने दिलेल्या गुणांचा विचार न करता. भुतकाळातील गोष्टी स्मरणात ठेवण्याचा प्रयत्न करतो. खरतर मनुष्य पुढे पुढे जगत असतो. पंरतु जाणीवपूर्वक तो मागील स्मरण करून करून दु:खाला आमंत्रण देत असतो. घडून गेलेल्या घडत असणार्या आणि पुढे घडणार्या कोणत्याही घटना त्याच्या हातात नसतात. परंतु कर्तेपण स्वता:कडे घेवुन सतत दु:खाची असमाधानी रहाण्याची सवय मनुष्याला लागलेली असते. जगताना सतत काहीतरी भीती, काळजी त्याला लागलेली असते.

स्वत:चे सुख इतर व्यक्तीमध्ये मनुष्य सतत शोधत असतो. माझ्या जवळील व्यक्ती दुरावतील याची भीती सतत असते. कारण एकटे जगणे मनुष्याला भीतीदायक वाटते. स्वत:चा आधार सतत बाहेर शोधून तो जपण्याकडे त्याचा कल असतो. त्याचा खरा आधार त्याच्या देहाच्या आत असतो. तो आधार गुरूंच्या सानिध्यामुळे मिळतो. गुरूंकडून ती वाटचाल मिळते. ध्यानाने अंतराकडे एकरूप राहील्याने स्थिरता मिळते. मनुष्य कणखर बनतो जगण्याची दिशा कळते. भीती नाहीशी होते. देहाच्या अंतरातील ईश्वर हा खरा साथीदार बनतो. वेळो वेळी तो साथ देतो. जगण्याच्या सर्व गुणांमध्ये त्या ईश्वराचा समावेश केला तर आनंद, समाधान दूर रहात नाही.

Om Gopalnathay Namah!!!

Respectful Pranaam(Bow) on the feet of Shree Sadguru.

Nature is a wonder with tremendous variety of things created by the Almighty. It consists of oceans, mountains, forests and also human beings. So there are lots of sources for living a better human life. Creator has also given various qualities to human beings. There is a variety in lifestyle of people from morning to night. If they don’t get such variety then life will become dull and unpleasant. One cannot follow same routine for much period; everyone needs change and variety in lifestyle. If a person works for ten hours a day, dedicates two hours for God and remaining time for family then his/her life consists of three parts with variation. Work environment, spirituality and family life are totally different and if mind is involved for specific period in the specific part then surely one can live peaceful and contended. It means that if a person is working in office then his mind must be totally involved in work. Thoughts other than work may cause disturbance in work and same thing is with spirituality and family life. Mental involvement for carrying out specific work in specific time and diversion after completion of the same is only way to remain satisfied in life. This is not easy without support of inner spiritual strength. Out of various qualities Creator has given important quality to human, which is ‘forgetting’. This is actually given so that human life will be easier but in fact people think more about past and give invitation to sorrow. Incidences happened in past, happening in present and which are going to happen in future are never in our hands. But the thought that ‘I am the doer/performer/cause of all these incidences,’ always takes the people in trouble and finally in sorrow. A kind of fear and anxiety is always present in human mind while living.

The real contentment lies in self but still we search it in someone other. ‘My closer ones may get away from me if I am unable to give them time’; such kind of fear arises in mind because people get moral support from another close person. Actually the real support lies inside and its awareness is generated only because of Guru. Mind becomes stable as one becomes Antarmukh (concentrating towards inner side- Dhyaan) . Person becomes strong and way of life gets clear due to Gurudev. God dwelling in the form of soul inside our body becomes the real moral support and helps every time in need. If we include god in every situation of life then happiness is always around us.

Om Jai Ho!



All Rights Reserved. Om Jai Ho Vishwatmaka Parivar

Saturday, August 12, 2017

Spiritual Thoughts (August 2017)

।। ॐ श्री परब्रह्म गोपालनाथाय नमः ।।

।। सदगुरू चरणी शतश: नमन ।।

मनुष्याला जीवन यशस्वी जगायचे असल्यास जीवनाला परमार्थाची जोड असावी लागते. परमार्थासाठी गुरूंची आवश्यकता असते. गुरूंनी दिलेल्या नामाची साथ असावी लागते. नामसाधनेने मनुष्याचे बाह्यजीवन आणि अंर्तजीवन बदलते व सुखकर होते.

परमेश्वराने मनुष्याची निर्मिती केली. मनुष्याला असणारी इंद्रिये एक सारखी असतात. परंतु स्वभाव आणि गुण यांमधे भेद असतो. जेवढया व्यक्ती तेवढे स्वभाव आणि गुण असतात. गुणांच्या विरोधाभासामुळे मनुष्यांचे एकमेकांशी पटत नाही, मनुष्य एकमेकांचा तिरस्कार करतात, मनुष्य प्रथम प्रत्येक गोष्टीत स्वत:चाच विचार करतो. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्याचा मी अडवा येत असतो. मी, मला, माझे एवढेच त्याला कळत असते. स्वत:च्या विचारांना मनुष्य प्राधान्य देतो. प्रत्येक वेळी त्याला स्वत:चे म्हणणे हेच श्रेष्ठ वाटत असते. त्याला स्वता:ची बाजू सोडून दुसरी बाजू दिसतच नाही. जी गोष्ट त्याच्या दृष्टीने योग्यच असते; तीच गोष्ट दुस-या मनुष्यांच्या दृष्टीने चुकीचीही असु शकते परंतु मनुष्याचा ‘ मी ’ म्हणजे त्याचा अहंकार इतका बळकट असतो की दुसरी बाजू दिसतच नाही. स्वत:च्या कल्पनेच्या जगात मनुष्य व्यस्त असतो. त्यामुळे त्याच्या जगण्याच्या कल्पनाही सर्वसामान्यच असतात. एक असामान्य विश्वही आहे आणि मी त्यापासून दूर आहे हे त्याला कळत नाही.

पण सुदैवाने नामसाधना मिळाली की, मनुष्याला जणु नवा जन्मच मिळतो. ज्या कल्पना शक्तीने मनुष्य रात्रंदिवस फक्त बाह्य सुख उपभोगत असतो. तिच कल्पनाशक्ती त्याला अंर्तमुख होवून जगण्यास शिकवते व हळूहळू काल्पनीक जीवन संपवून शाश्वत कसे जगायचे हे मनुष्य शिकतो. अंर्तमुखी मनुष्यामधे जेवढा साधनेचा प्रभाव वाढेल तसतसा त्याला अलौकिक आनंद मिळतो. त्या आनंदासाठी तो सतत भटकत असतो; तोच आनंद जर त्याला एका जागी शांत, स्थित बसून ध्यानाने अनुभवता आला तर त्याचे बाहेरील लक्ष कमी होते व बाहेरच्या सुखांची लालसाही कमी होते. आत्तापर्यंत मी व्यर्थच सर्व मिळवण्याची खटपट करत होते हे त्याला कळते. जगण्यासाठी जेवढे आवश्यक आहे तेवढेच तो मिळवतो. इतर वेळ नामसाधनेत घालवतो. हळूहळू त्याला इतरांची मने कळतात. इतरांच्या व्यथा, दु:ख समजु लागतात. सर्व मानवजाती विषयी त्याचे मन करुणेने व्यापते व मानव जातीच्या सेवेसाठी व ऊद्धारासाठी उरलेले आयुष्य तो घालवतो.

ॐ जय हो!


Om Gopalnathay Namah!!!

Respectful Pranaam(Bow) on the feet of Shree Sadguru.

To get successful, life must have spiritual support. This spiritual support/knowledge comes from Guru and Naam given by him. Naam-Sadhana practice changes human life from outer as well as inner side.

Creator has created all human beings similar but behavior and qualities differ from person to person. This difference creates problems in interpersonal relations. Primarily a person always thinks about self in every situation. He gives priorities and preferences to own thoughts. He thinks that his thoughts and ideas are better than others but actually this is not true. This mainly happens due to ego. In this way the person remains engrossed in own thoughts and imaginations. Such habit creates a common mentality which never allows the person to think out of the box or in a different way.

In such condition if the person gets Naam-Sadhana from Gurudev, his life changes fully like a new birth. The previous imaginations and self logics completely change and make the person Antarmukh (towards self realization/ away from material world). He now gets aware of the reality and facts. An Antarmukh person gets divine happiness as his Naam-Sadhana practice increases. In search of this happiness previously he wanders a lot, but in fact- for getting such divine happiness the only act needed is to sit stable at a place and meditate (Naam-Sadhana). This practice makes the person realize that the true happiness lies within himself so there is no need to search it outside. Eventually his focus from outer world shifts towards inner side. Now the person earns to fulfill the essential requirements only. The rest of the time is utilized for Naam-Sadhana. Eventually the person realizes problems and sorrow of people around and becomes compassionate towards entire mankind. The remaining life is now dedicated for service of humanity.

Om Jai Ho!



All Rights Reserved. Om Jai Ho Vishwatmaka Parivar

Wednesday, July 5, 2017

Spiritual Thoughts (July 2017)

।। ॐ श्री परब्रह्म गोपालनाथाय नमः ।।

|| गुरू ब्रम्हा गुरू विष्णू | गुरू देवो महेश्वरा: ||
|| गुरू साक्षात परब्रम्ह | तस्मै श्री गुरूवे नम: ||

गुरू या शब्दाचा अर्थ म्हणजे एखाद्याकडून आपाल्याला माहीत नसलेले ज्ञान अवगत करून घेणे. गुरू म्हणजे आपले अज्ञान नाहीसे करून ज्ञानाकडे वाटचाल करून देणारे आपले प्रेरक होय. जसे दाट अंधारात अचानक छोटा दिवा लागला तर अंधार एकदम नाहीसा होतो. व सर्व दिसू लागते. तसे गुरू जीवनातील अंधार पूर्ण नाहीसा करून प्रकाशाकडे मनुष्याची वाटचाल करून देतात. जगण्यासाठी आवश्यक असणार्या गोष्टी शिकविणारे गुरू अनेक असतात. परंतू जगायचे कसे हे शिकविणारे आध्यात्मिक गुरू असतात. आध्यात्मिक आपल्याला आपली स्वत:ची ओळख करून देतात. प्रत्येक मनुष्याच्या शरीरात ज्ञानाचा व अंनत शक्तीचा समुद्र आहे. त्या ज्ञानापर्यंत व शक्तीपर्यंत गुरू पोहचवितात. गुरू हे सदगुणांचे भांडार असते. गुरू कुणाचाही व्दैष करीत नाही. त्यांच्या ठिकाणी अंनत करूणा असते. गुरू काम, क्रोध, भय,चिंता यापासून मुक्त झालेले असतात. जीवनातील बदलांमुळे ते कधीच उव्दिग्न होत नाही. त्यांचे मन संपूर्णता ईश्वरमय झालेले असते. कुणी निंदा केली तरी त्यांना राग येत नाही. व कुणी स्तुती केली तरी मन विचलित होत नाही. सामान्य मनुष्यांचे ठराविक मनूष्यांशी नाते असते. त्यांच्या मताशी अनुकुल असणार्यांशी त्यांचे नाते जुळते. परंतु गुरूंचे सर्वच विश्वातील मनुष्यांशी नाते असते. मनूष्य कितीही कपटी, दुष्ट, हिंसक, स्वार्थी इतरांवर अत्याचार करणारा असला तरी गुरू त्याला जवळ घेवून पवित्र करवितात. त्याच्या वाईट गुणांचा नाश करतात. त्याची बुध्दी स्थिर करून त्याला त्याच्या शरीरातील आत्म्याचा मार्ग दाखवितात. गुरू हे परिसासारखे असतात. परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला तर लोखंडाचे सोने होते. तसे गुरूंचा संर्पक अज्ञानी मनूष्यांशी झाला तर ते ज्ञानी होतात. पाण्याच्या प्रवाहाबरोबर कचरा वहात येत असतो. पण पाणी हळूहळू कचरा कडेला ठेवून पुढे पुढे पाणी निर्मळ होते. तसे गुरूंच्या सानिध्यात हळूहळू वाईट गुण कमी होवून मनुष्य सदगुणांच्या जवळ जातो. एका गुरूंचा आधार जर मनुष्याला मिळाला तर त्याचे जीवन समुध्द होते. अडचणींना तोंड देण्याचे सामर्थ्य मिळते.

गुरूंच्या आधाराने इतर आधांराची आवश्यकता वाटत नाही. मनूष्याला अनेकदा एकटेपण भासत असते. जर गुरूं मिळाले तर जीवन पूर्ण वाटते. गुरूंचा सहवास म्हणजे गुरूंनी दिलेल्या साधनेचा सहवास होय. जसजसा मनुष्य साधना करेल तसतसा त्याला गुरूंच्या सहवासाचा आनंद मिळतो. गुरूंचा सहवास त्यांच्या देहाने नव्हे तर त्यांच्या साधनेने अनुभवता येतो. गुरूंनी दिलेली साधना हेच गुरूंचे साक्षात रूप होय. जीवन दु:खी नाही अडचणींचे नाही तर आनंदाचे आहे. काहीतरी मिळविण्याचे असते. हेच गुरू शिकवितात. ज्या ज्या मनुष्यांच्या जिवनात गुरू आहेत. त्यांचे जीवन आनंदाने फुलत रहाते.

गुरूपोर्णिमेच्या निमित्ताने अशा परमेश्वर रूपी गुरूंच्या चरणी अनंत नमस्कार.

ॐ जय हो!


Gururbramha Gururvishnu | Gururdevo Maheshwara
Gurursakshat Parabramha | Tasmay Shree Gurave Namah

Guru is the one who teaches us the things which are unknown to us. Guru is the one who clears our ignorance and inspires us to proceed on the path of spirituality. Likewise a small lamp which turns a dark region into visible one, Guru clears the darkness in our life. There are many types of Guru who teach us the things essential in our life but there is only one Guru who teaches us the way to live life. Every human being possesses knowledge and tremendous energy but realization of this energy and knowledge becomes possible only due to Guru. He never possesses any kind of embitterment about anyone but has an infinite source of compassion from within. His mind never gets affected by any changes in life as he is free from bonds of desire, anger, fear or worries. Thus he doesn’t care if anyone speaks improperly with him or praises him. Generally people get attached with each other if their thoughts or ideas match-up. However Gurudev has unconditional relation with everyone in the world. People may be cunning, violent or selfish in kind but Guru brings everyone close and showers holy blessings. Thus bad qualities of such people get cleared and they become mentally stable. In this way Gurudev shows the path to reach up to the God; which is in the form of soul residing within human body. Presence of Gurudev in one’s life can bring lot of changes. Life becomes fulfilled from many aspects; power to withstand difficulties gets increased.

If one gets Gurudev’s support in life then other support is not needed. In his presence a person will never feel lonely. This presence is due to Sadhana (regular spiritual practice taught by Gurudev). So this presence can be experienced not only when Guru is in front of us but also whenever we are doing Sadhana. Life is not full of sorrows or hardships but it is to be enjoyed with happiness, and life of people having Guru is always cheerful.

On the occasion of Gurupournima, I would like to bow down my head on feet of Gurudev with infinite greetings.

Om Jai Ho!



All Rights Reserved. Om Jai Ho Vishwatmaka Parivar

Tuesday, June 13, 2017

Spiritual Thoughts (June 2017)

।। ॐ श्री परब्रह्म गोपालनाथाय नमः ।।

मानवी जीव जन्मत: शुध्द व सात्विक असतो. जन्मल्यानंतर त्याला बाह्य विषयांची काहीच बाधा नसते. जेव्हा तो बाहेरील अन्न खायला सुरवात करतो. तसतसा त्याच्यात बदल होत जातो. आजुबाजुच्या मनुष्यांच्या संगतीचा त्याच्यां मनावर परिणाम होत जातो. जसे आजुबाजुचे वातावरण असते. तसेच ध्येय बनते.

जगात सर्वत्र स्पर्धा असते. चढाओढ असते. सगळेजण त्यात पळत असतात व स्वत:ला अग्रेसर करीत असतात. मला सर्वांच्या पुढे जायचे इकडे लक्ष लागते. मनुष्य बाह्य गोष्टीमध्ये रममाण असतो. अंतरात तो डोकावत नाही. माझे शरीर काही काळापुरतेच आहे हे विसरतो. हळूहळू वय वाढते व शरीराची वाटचाल मृत्यूकडे होत रहाते.

या व्यापात मनुष्याला अनेक संकटे व दु:खाला सामोरे जोवे लागते. मला इतरांमुळेच दु:ख मिळते असे वाटते. स्व:ताच्या मनावर त्याचा ताबा नसतो. मनामुळे इंद्रियांवरही त्याचा ताबा नसतो. अशात गुरंनी नाम दिले तर वृत्ती झटकन बदलते व बाहेरचे लक्ष शरीराच्या आत लागते. नामामुळे मन एकाग्र होत जाते सैरावैरा धावणार्या मनाला नामामुळे लगाम लागतो. मनाप्रमाणे वागणारी इंद्रिये ताब्यात येतात. माझ्या कष्टांचे कारण बाहेरील परिस्थिती नसुन त्याचे कारण मीच आहे हे कळते. इंद्रिय ताब्यात आल्यामुळे सर्व भावना शरीराच्या हलचाली नियंत्रित होतात. नामामुळे श्वास नियमितपणे चालतो व मन आनंदी होते मनाचा परिणाम शरीरावर होऊन शरीर निरोगी होते. मी जन्म:ताच दु:खी नसून सुखाचे भांडर माझ्या आत आहे हे कळते. मनुष्य सुक्ष्म विचार करतो. आत डोकावल्यामुळे जगातील अनेक गोष्टींचे रहस्य कळायला लागते. असा मनुष्य सात्विक होवून आनंदी होतो. त्याच्या सहवासात इतरांनाही आनंद मिळतो. बाहेरून जे मिळवण्यासाठी तो धडपड करतो ते शाश्वत नसुन नाशिवंत आहे याची कल्पना येते. शरीराला आवश्यक असणार्या गोष्टी मिळवून इतर वेळ तो अंतमुख होण्याकडे देतो. मरणाचे भय नाहीसे होते.

मानवी शरीर हे अफाट उर्जेचा स्त्रोत आहे. या ऊर्जेमुळे शरीर बलवान बनते. हे ज्यां नामामुळे घडते त्या नाम देणार्या गुरूंवर श्रध्दा व विश्वास असावा लागतो. कोणताही संशय न ठेवता नामसाधना केली तर जीवन बदलते व जन्मास आल्याचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. जगण्याचे सार्थक होते. इंद्रियांवर विजय मिळवून मनुष्य जितेंद्रिय होतो.

ॐ जय हो!


Human body is pure at the time of birth. It is free from all bindings and problems of this world. When a person starts eating food, his/her body as well as mind begins to change. Surrounding environment also plays important role in behavior and habit development. It also has influence on aim of life.

There is always a competition of life in this world. Everyone wants to lead this competition by bypassing others. While doing this, our mind remains engrossed in the outer world. It doesn’t have time for self. All this gives rise to many problems in life. And people begin to blame others for own problems. It further results in loss of control over own mind and eventually over body. We forget that our body is going to last for limited period only. In a course of time, age increases and approaches towards death.

In such condition if one is blessed with holy Naam given by Gurudev, situation of life changes as his/her behavior changes by influence of Guru. This Naam increases concentration power of mind and makes it stable. After some time the person regains control over own body. The person now realizes that ‘I am the only reason behind my problems’. As Naam regulates breathing, it makes mind peaceful and happy. Also our body remains fit and healthy. Now the person thinks that ‘The real happiness dwells inside me’. The inner strength and vision develops and person starts thinking deeply about various things in the world. Such human becomes happy and makes others also happy. ‘Whatever I am trying to get from outer world is not going to last forever’; such thought comes in the mind and person begins to earn just whatever is essential for the body. The remaining time is then devoted for becoming Antarmukh (towards self realization/away from material world). The fear of death goes away.

There is tremendous amount of energy inside our body. We can experience and increase this energy due to Naam. For this we need to be fully devoted towards Gurudev and our faith must never hamper due to any reason. If we perform regular Naam Sadhana then life changes in real manner as mentioned above and motive behind birth gets fulfilled.

Om Jai Ho!



All Rights Reserved. Om Jai Ho Vishwatmaka Parivar

Saturday, May 6, 2017

Spiritual Thoughts (May 2017)

।। ॐ श्री परब्रह्म गोपालनाथाय नमः ।।

सृष्टी नियमांच्या आधारे चालते. सृष्टीतील सर्व मानवीजीव त्या नियमांचे बांधिल असतात. त्यामुळे सर्व मानवांना कर्म हे करावे लागते. ज्या ज्या प्रकारे त्याच्याकडून कर्म होते त्या त्या प्रकारे तो सु:खी, दु:खी, स्वता:च्या उद्योगात मग्न, दुबळा किंवा असहाय्य असा असतो. ज्या प्रकारे तो कर्म करतो त्या प्रकारे त्याची मानसिक अवस्था बदलत जाते आणि मानसिकतेचा परिणाम संपूर्ण आयुष्यावर होतो. सृष्टी निर्माण करणा-या परमेश्वराने सर्व गोष्टी मानवाच्या हातात दिल्या आहेत. कर्म काय करायचे हे स्वत:चे स्वत: ठरवायचे असते. तशी बुध्दीही परमेश्वराने दिली आहे. भरपूर धनसंपत्ती एखाद्याकडे असली आणि त्याची मानसिकताच निट नसेल तर त्या संपत्तीचा उपभोग तो घेऊ शकत नाही. पण एखाद्याकडे काही नसेल आणि त्याची चित्तवृत्ती जर स्थिर असेल तरीही तो समाधानी राहू शकेल. काही जण समाजहिताचे कार्य करीत असतात. स्वत:च्या कर्मातून इतरांचा काही लाभ होईल असेच कर्म ते करतात. समाजहितासाठी स्वत:चे जीवन अर्पण करतात. अशा मानवाला परमेश्वराचे नामस्मरण करण्यात काही अडचणी येत नाहीत. त्याचे मन व बुध्दी स्थिर राहतात. काहींना जगातील प्रलोभनाचे जास्ती आकर्षण असते. जे जे दुसर्यापाशी आहे ते स्वत:ला मिळवण्यासाठी ते सतत धडपडत असतात. ते सतत स्वत:चा विचार करतत व कुटूंबाचाही विचार करतत. स्वत:ला व कुटूंबाला सर्व प्रकारच्या सूखसोई कशा मिळतील याच चिंत्तनात ते असतो. अशा मानवांना जिवनात भरपूर कष्ट करावे लागतात. आयुष्यभर त्यांचा लोभ कमी न होता. वाढतच राहतो. शांती व समाधान त्यांना मिळत नाही. त्यामुळे ईश्वराचे चिंतन व नामस्मरण करण्याची त्याला आवडच राहात नाही. साधना व ध्यानधारणा याचा त्यांना खूपच कंटाळा येतो. जिवन संपेपर्यंत त्यांना काहीच साध्य होत नाही. काही मानवांच्या जगण्याला काहीच निटनेटकेपणा नसतो. जशी लहर येईल तसे ते कर्म करत असतात. स्वत:मधील गुणांची त्यांना पारख नसते. चित्तवृत्ती कायम अशांतच राहते. उत्तम काम करण्याची क्षमता असूनही ते काहीच काम करु शकत नाही. त्यांच्या कर्मातून स्वत:चेही भले होत नाही व इंतरांचेही नाही.

त्यासाठी मनुष्याने स्वत:ला काय साध्य करायचे याचे एक ध्येय डोळ्यांपुढे ठेवायचे असते. स्वत:चे जिवन उत्कृष्ट जगून ईश्वराचे नामस्मरण करता आले पाहीजे. ध्येय जर निश्चित असेल तर कर्मही त्याप्रमाणे घडत जाते. जिवन हे नुसतेच जगायचे नसते. तर त्या जिवन देणा-या परमेश्वरासाठी सूध्दा जगायचे असते.

ॐ जय हो!


Nature follows some rules thus all the living organisms in nature also follow the same. That is why every human being has to carry out all essential deeds in day today life with certain rules. Human behaviour develops according to the way of working and the work environment. These factors develop behavioral traits like weak mindedness, introversion and also make the person sad or happy according to situations. This work may be personal or work for earning but the effect is same in both cases. This psychological development influences whole life. The creator of this nature; the Almighty God has given all rights in the hands of human beings thus it depends on us how to behave, which type of deeds to perform, in what manner our lifestyle should be. For this, each of us is provided with brain and thinking power. Some people have good financial condition but due to improper mentality cannot take advantage of wealth. Some people have many desires in life and after looking comforts of others they increase. These people always think about progress of self and own family. They work hard for achieving comforts and luxury. In this process they never get time for self and for remembering God. Sadhana and Nama-Smarana is disliked by them. They cannot achieve any spiritual state till end of life. Another example is of people who live according to state of mind- which keeps on changing frequently. Such lifestyle is unbalanced. They never realize own capabilities and qualities. So they can’t make own life better nor they can help others. On other hand some people work throughout the life for betterment of others. They get satisfied by watching others happy. Their mind always remains peaceful and stable. Such people never face problems in Naam-Smarana (Remembering Naam).

To live a better life some aim should be always kept in mind. After performing routine tasks and handling responsibilities properly, we must be able to spare sometime for Naam-Smarana. This will bring work-life balance. If our aim is fix, then our deeds also get in proper direction. Life is not just to live but it is to be lived for the one who has given it.

Om Jai Ho!



All Rights Reserved. Om Jai Ho Vishwatmaka Parivar

Tuesday, April 4, 2017

Spiritual Thoughts (April 2017)

।। ॐ श्री परब्रह्म गोपालनाथाय नमः ।।

मोठा वृक्ष प्रथम अवस्थेत ‘बी’ च्या स्वरूपात असतो. ‘बी’ जमिनीत रूजते त्याला अंकुर फुटतो. रोप तयार होते. व हळू-हळू त्याचे रूपांतर झाडामध्ये होते. त्याला पाने, फळे, व फुले येतात. अनेक वषानंतर त्या वृक्षाची फळे, फुले येणे बंद होते. व तो वृक्ष जुना होतो. तशीच मानवी देहाची रचना आहे. आईच्या पोटात देहाच्या रचनेला. सुरवात होते. त्या देहाला हात, पाय, कान, नाक, व डोळे असे सर्व अवयव तयार होतात. आईच्या पोटातून बाहेर आल्यावर हळू-हळू त्या देहाचा विकास होतो. बालपण, तरुणपण, मध्यम अवस्था व शेवटी वार्धक्य अशा अवस्था होतात. प्रत्येक दिवशी देह मोठा होत जातो. रोज देहात बदल होतो. परंतू त्या देहाच्या आतील चेतना किंवा देह चालविणारा आत्मा आहे . तो तसाच असतो. देहात प्रवेश केल्यापासून देह सोडून जाई पर्यंत तो आहे तसाच राहातो, देहाचे कार्य संपल्यावर-देहाला सोडून जातो. ज्या देहाला आत्मा म्हणजेच चेतना सोडून जाते. तो देह निर्जीव होतो. त्या देहाकडून कोणतेही कार्य होत नाही. मानवी शरीर बालपणापासून काहीतरी शिकत-शिकत मोठे होते. संपूर्ण आयुष्यभर त्याचे शिकणे चालूच असते. लहानपण खेळात, तारूण्य पैसा कमविण्यात खर्च होते व शेवटी उरते ते वार्धक्य. बालपण आणि तरुणपण मनासारखे जगता येते. या काळात प्रत्येक जण आपल्या आवडीप्रमाणे जीवनाची वाटचाल करतो. परंतू वार्धक्य मात्र मानवाच्या हातात नसते. वार्धक्यामधे शरीराचे अवयव शीण होतात . कार्य करण्याची त्यांची गती मंदावत जाते व मागील जगलेले जीवन आठवूनच दिवस काढावे लागतात.

बालपण व तरुणपण या दोन्ही अवस्था जशा काहीतरी करण्यासाठी- मिळविण्यसाठी असतात तशाच त्या देह चालविणार्या आत्माच्या साधनेसाठीही असतात. मानवाला शेवटच्या म्हणजे वार्धक्याच्या काळात काही करता येत नाही म्हणून मानव तो रिकामा काळ भगवंताचे भजन-पूजन करण्याचा काळ असे मानतो. पण ते चुकीचे आहे. ज्या काळात इतर सु्ख उपभोगण्याची शरीराला गरज असते त्याच काळात शरीराला साधनेची सुध्दा गरज असते. ज्याच्या जीवावर संपूर्ण जीवण चालते. त्याच्यासाठी मनुष्य वेळ द्यायला तयार नसतो आणि शेवटच्या काळात वेळ द्यायचा विचार करतो पण शरीराची इंद्रिये त्याला थोडासुध्दा अवसर देत नाही. जेव्हा मनुष्याला सर्व कर्ता असणार्या परमेश्वराची आराधना करण्यासाठी इच्छा निर्माण होते त्यावेळी लगेचच सदगुरुंना शरण जाऊन परमेश्राच्या शोधाचा मार्ग स्विकारून घ्यावा. अशा संधी जीवणात फारच कमी वेळा येतात. मनुष्याने अशावेळी कोणताही विचार मनात आणू नये; कारण ईश्वर प्राप्तीचा मार्ग स्विकारला असता काहीच मिळत नाही असे नाही आणि नुकसानही काही नाही. या मार्गावर वेळ लागेल पण यश नक्की मिळेल.

ॐ जय हो!


However taller and bigger a tree may be, but in primary state it is just a small seed. First a seed is sown down in earth. Eventually it sprouts and slowly takes form of tree. Now this tree bears flowers and fruits. As years get passed, it stops producing flowers & fruits, and becomes older. Same condition is with human life. It begins inside mother’s womb. Organs like eyes, nose, ears and limbs begin to develop in the womb. After coming out of the womb, body begins to grow. Childhood, Adulthood and old age are the three stages of human life. There is a new change in our body every day. But the soul which is responsible for this change and also for every action of our body, remains the same as it was during birth and remains the same till death. After death, the soul leaves human body. From childhood to death, human mentality is to learn and adapt according to surrounding conditions. Childhood passes in playing; adulthood passes in earning and last is the declining or remaining age. One can live according to own way in first two stages of life and make progress as per wish but older age is not in our hands. In older age organs of body become weak and energy in body is not favorable for hard work or travel. One has to pass the remaining period by remembering old memories.

Childhood and adulthood are meant to achieve career and financial goals but at the same time this age is favorable for Sadhana which is worship of soul. Normally people say that in older age one has enough free time which can be dedicated for God but it is totally wrong concept. A fit body is essential for spiritual progress through Sadhana. In older age various problems arise in body which makes a person harder to practice Sadhana. There is enough time and desire of Sadhana but body doesn’t support. On the other hand it is true that in adulthood, one should enjoy every moment of life but at the same time Sadhana is important. In this period people normally give excuses of routine work and fail to spare time for the worship of soul. In fact, human body is nothing without soul. Whatever we do is due to existence of soul in our body. So daily Sadhana practice is must. Thus whenever in life if we wish to experience the divinity of God and feel curious about existence of soul in body then we should bow on the feet of Sadguru (Spiritual master) and follow the path to reach up to the god. Such situations rarely come in life and we should not think much in such situations because it spirituality never makes any loss. This journey takes time but you can surely get successful. So Instead of thinking we should begin our spiritual journey with Sadguru’s guidance.

Om Jai Ho!



All Rights Reserved. Om Jai Ho Vishwatmaka Parivar

Sunday, March 5, 2017

Spiritual Thoughts (March 2017)

।। ॐ श्री परब्रह्म गोपालनाथाय नमः ।।

ईश्वराची अनुभुती घेण्यासाठी शरीराची आवश्यकता असते. शरीर व्यवस्थित नसेल तर ईश्वरप्राप्तीमध्ये अनेक अडथळे येतात. ते अडथळे म्हणजे शरीराच्या व मानसिकतेच्या अडचणी होय. मानसिक अडचणींमध्ये मन, चित्त आणि बुध्दी येतात. त्यामध्ये मन नाना प्रकारच्या विचारात अडकलेले असते. चित्त स्थिर राहात नाही, बुध्दी नीट विचार करू शकत नाही. अशा वेळी शरीराच्या आतील इंद्रियांचा प्रभाव संपूर्ण शरीरावर पडत असतो. त्यामुळे शरीर कमकुवत होते, दुबळे होते व त्याची कार्यक्षमता दिवसेंदिवस कमी होते. मनुष्याच्या जीवनात अनेक अडचणींचे जाळे तयार होते. जगण्यासाठी लागणा-या सर्व गोष्टी उपलब्ध असुनही मनुष्य नीट जगु शकत नाही. अनेक नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव त्याच्यावर पडत असतो. त्यामुळे त्याच्या मानसिक अवस्थेत बदल होत राहतो. शरीराला सुध्दा अनेक व्याधी चालू होतात.

अशा मनुष्याला सद्गुरूंची आवश्यकता असते. त्यांनी दिलेल्या नामसाधनेची गरज असते. नामसाधनेने मनुष्य ईश्वरापर्यंत पोहोचतो व त्याचा जन्म-मरणाचा फेरा संपुन तो मुक्त होतो. त्यासाठी नामसाधनेबरोबर नियमित ॐकार जप करावा लागतो. कारण संपूर्ण ब्रम्हांडात ॐकार नाद भरला आहे. मानवी देह सुध्दा ॐकार रूपी आहे. ब्रम्हांडातील शक्तीचा मानवाच्या देहातील चेतनेशी जवळचा सबंध आहे. आणि नियमित ॐकार म्हणत राहिल्याने देहाच्या चेतनेशी ब्रम्हांडातील शक्तींचा संयोग होतो. या संयोगातुन ज्या लहरी तयार होतात. त्यांचा परिणाम मन, चित्त, बुध्दीवर होतो. मन शांत होते, चित्त स्थिर होते व बुध्दी व्यवस्थित कार्यरत होते. तेव्हा नामसाधना सुरळीत चालू होते. या बरोबरच शरीराच्या सर्व अवयवांवर सुध्दा ॐकार-नादाचा परिणाम होवून शरीर अधिक कार्यशील बनते. मनातील कमकुवतपणाची भावना नाहीशी होते. त्यामुळे शरीराचे कार्य जोमाने चालू होते. बाहेरच्या वातावरणातील बदलांचा परिणाम शरीरावर लवकर होत नाही. मन आनंदी व उत्साही राहाते. त्यामुळे साधनेचा जोर वाढत राहातो. अनेक शारिरीक व मानसिक आजार जे औषधोपचाराने बरे करता येत नाहीत असे आजार ॐकार साधनेने आटोक्यात येतात. ॐकाराने उत्साही झालेले शरीर सतनामाच्या साधनेला पोषक ठरते. आधी ॐकार साधनेने मन सामर्थ्यवान बनते. नंतर शरीराची वाटचाल आत्मउध्दाराकडे चालु होते. अशा साधनेने कुंडलिनी शक्ती लवकर प्रवाहित होवून कार्यरत होते व मनुष्याला मुक्तीचे दरवाजे खुले करते.

ॐ जय हो!


A mentally as well as physically fit human body is the most essential requirement for taking divine experience of God. If body is not fit then many problems occur in the spiritual path. These problems are physical as well as psychological. Psychological problems are related with Mana-Chitta-Buddhi (Mind-Intellect-Memory). Our mind becomes unstable & thinking ability decreases. In such situation inner sensory organs of body take charge over body, thus gradually it becomes weak and its work efficiency gets reduced. In short, a web of problems is created around us. All the required things are around but still we cannot live properly with peace. In this condition all the surrounding negativities easily affect us, that is why mind remains unstable.

Sadguru’s support is the only solution for all these problems and Naam-Sadhana given by him is the medicine. Only Naam-Sadhana can help a person to reach up to the God and attain Mukti (Liberation from birth-death cycle). But along with this Naam-Sadhana, Omkaar Jap (Repeating several times) is also very important. Because, The Naad (sound) of Omkaar is spread all over the universe and human body is also shaped as Omkaar. There is a relationship between energy in the universe and human consciousness, regular Omkaar-Jap connects this spiritual energy in the universe with energy in human body. When these energies combine, certain waves are created which initiate healing of psychological problems. After this, Naam-Sadhana begins to prosper. Now mind remains happy and peaceful. Omkaar-Jap also shows its effect on various organs and regenerates the efficiency of the body which was lost earlier. Thus many types of physical and mental problems/illness which cannot be treated by medicines can be treated by Omkaar-Jap. So we can say that Omkaar-Jap makes human body capable for Naam-Sadhana. Due to regular Sadhana practice Kundalini Shakti (Serpent Power) in the body awakens, which brings spiritual bliss & many divine experiences. Finally doors of Mukti are opened.

Om Jai Ho!



All Rights Reserved. Om Jai Ho Vishwatmaka Parivar

Wednesday, February 8, 2017

Spiritual Thoughts (February 2017)

।। ॐ श्री परब्रह्म गोपालनाथाय नमः ।।

प्रत्येक मानव ईश्वराचा अंश आहे. प्रत्येक मानवी देहात आत्मा एक आहे. देह वेगळे असले तरी आत्मा एकच असुन प्रत्येक शरीरात अंशरूपाने व्यापलेला आहे. म्हणुन सर्व मानवजात एकच आहे. तरीही प्रत्येक देहाचे कार्य वेगळे होते ते त्याच्या कर्मामुळे. जीवनाचे ध्येय निश्चित असले की कर्म ध्येयाप्रमाणे घडत जाते. आपल्याला स्वतःला कसे जगायचे हे निश्चित करण्यासाठी उदार, ऊत्तम व पवित्र जिवन जगलेल्या मानवांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवावा लागतो. आपली आवड कशात आहे याचे आकलन करून घ्यावे लागते. ज्या ज्या थोर व्यक्तींनी ईश्वरी शक्तिचा अनुभव घेतला व समाजासाठी उत्कृष्ठ कार्य केले आहे अशा व्यक्तींचे चरीत्र स्मरणात ठेवून कार्य करावे. जिवनात उत्तम जिवन जगण्यासाठी आपल्या दिवसभरच्या लहान-सहान कर्मांचाही विचार करावा लागतो. आपल्या प्रत्येक कर्मातून इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. समाजात काहीतरी कार्य इतरांसाठी जर केले तर ते ईश्वराला आवडते. ज्या व्यक्ती स्वतःसाठीच कार्य करीत रहातात त्यांना कोणीही स्मरणात ठेवत नाही पण ईतरांसाठी कार्य करणा-यांचा आदर्श अनेक काळापर्यंत होत रहातो.

आपले ध्येय साध्य करायचे असल्यास सद्‍गुरूंनी दिलेल्या सत्‍नामाची साथ असावी लागते. ध्येयावर लक्ष्य व त्याला सतनामाची साथ जोडली तर आपले लक्ष्य कोणीही हिरावून घेणार नाही. नाम घेत राहीले तर ध्येयापुढे येणा-या अडचणी सहज पार पाडता येतात. ध्येयाच्या दिशेने मानव जर चालत राहीला तर जिवनात एक स्थिरपणा येतो.

ॐ जय हो!


We all have different bodies but soul residing in each of us is same. This soul is a part of Supreme soul or the Almighty God. Thus ultimately we all are equal. Differences are created due to past deeds and different aim of life. If aim of our life is fixed then our actions are focused in that way. To decide this way, we must idealize generous and courteous spiritual personalities.  Also we must identify our areas of interest. If we consider biography of famous spiritual personalities who have taken experience of spiritual energy, we come to know that they have outstanding contribution in welfare of society. Their work must be kept always in our mind.  For living better life, we should even take care of small things in day to day life such that our behavior should not hurt someone. It is rightly said; ‘Social service is the service to God’ therefore if we contribute our efforts for society then God also likes it. Those who work for society become ideal whereas who work for themselves remain unknown.

To achieve ultimate aim of life, support of holy Satnaam given by Sadguru is needed. Focused mind and togetherness of Sadguru can only help us to achieve the desired aim. Continuous remembrance of Satnaam helps to clear out the difficulties coming in front. If a person walks towards aim then the life becomes stable and peaceful.

Om Jai Ho!



All Rights Reserved. Om Jai Ho Vishwatmaka Parivar

Wednesday, January 4, 2017

Spiritual Thoughts (January 2017)

।। ॐ श्री परब्रह्म गोपालनाथाय नमः ।।

मनुष्य जन्माला येण्याचे कारणच स्वतःची ओळख करून घेणे होय. म्हणजे माझा जन्म कसा झाला व का झाला? स्वतःची ओळख झाल्यानंतर या सर्व प्रश्नांची उत्तर मनुष्याला मिळतात. पण स्वतःची ओळख कोण करून देणार? तर ती ओळख करून देणारे म्हणजेच आध्यात्मिक गुरू होय. आध्यात्मिक गुरूंची ओळख करण्यासाठी त्या गुरूंची काही लक्षण असतात. ती म्हणजे ज्यांनी स्वतःला ओळखले म्हणजेच ज्यांना स्वतःमधील आत्मस्वरूपाचे दर्शन झाले आहे, ज्यांनी पंचमहाभूतांना जाणले आहे, या सृष्टीत जगण्याचे कारण व कार्य ज्यांनी ओळखले आहे. ज्यांनी स्वतःच्या आत्म्याला जाणले आहे. अशा व्यक्तीला आध्यात्मिक गुरू म्हणतात. स्वतःमधील ऊर्जा ते इतरांना देऊन त्यांना आत्मस्वरूपाकडे पाठवून देतात. ज्या परमात्म्याने सृष्टी निर्माण केली आहे त्या परमात्म्याचे दर्शन आध्यात्मिक गुरूंना झालेले असते. अशा गुरूंना चालु जन्मानंतर जन्म व मरण ही बंधने नसतात. अशा गुरूंकडून अनुग्रहीत होण्यासाठी प्रथम त्यांना शरण जावे लागते. त्यांना शरण गेल्यानंतर ते त्यांच्यातील ऊर्जा शिष्याला नामरूपाने देतात त्याला बीजमंत्र किंवा नाम असे म्हणतात. हि क्रिया शिष्याला देत असताना गुरूंमधील ऊर्जा व शिष्यामधील ऊर्जा यांचा संपर्क होतो व शिष्याचा आत्मउध्दाराचा मार्ग चालु होतो. नियमित नामजप व ध्यान धारणा केली असता शिष्य ज्ञानाकडे वाटचाल करतो.

गुरूंशिवाय ज्ञानाप्राप्ती होणे कठीण आहे. ज्ञानाविषयी कितीही वाचन केले किंवा इतरांकडून श्रवण केले, माहीती मिळवली तरीही समाधान मिळत नाही. कारण ख-या ज्ञानाची वाटचाल सुरू केल्यानंतर शिष्य आंतरीक शांतीचा अनुभव घेऊ लागतो व समाधानी होऊ लागतो. सृष्टीमधील अनेक गोष्टींचे ज्ञान जरी मनुष्याला झाले तरी स्वतःच्या अंतरंगाचे ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला पूर्णत्वाचा आनंद मिळत नाही. जीवनात आध्यात्मिक ज्ञान नसेल तर अपूरेपणा असतो, मन सतत काहीतरी शोध घेण्याच्या मागे असते. पण गुरूंची प्राप्ती झाली कि हे सर्व थांबते व निस्सिम शांतीकडे जीवनाची वाटचाल होते.

ॐ जय हो!


Prime reason behind human birth is to identify ourselves. After self realization, we get answers to questions like what is the reason behind my birth. But who can make this possible? The answer is spiritual master i.e. Guru. Now how to identify real Guru? Guru is the one, who has realized self; who has taken divine experience of Atma-Swaroop Darshan (Soul realization); who has knowledge of five elements (Earth, Fire, Water, Wind & Sky); who knows the reason behind birth and motive of life. These are unique qualities of Guru. Almighty God is the creator of nature and Guru has experienced auspicious sight (Darshan) of Almighty. He is free from bonds of birth & death (Mukti). To take Anugraha (initiation) from such Gurudeo, one needs to surrender completely towards him. After this Guru transfers his energy in the form of Naam or Beej-Mantra to disciple (Shishya). During this process, contact between shishya's & Guru's energy takes place which helps in spiritual awakening of disciple. After that daily Sadhana practice gradually forwards Shishya towards self realization and finally towards the Almighty.

Getting spiritual knowledge without Guru is difficult. If we read spiritual books, listen discourse from someone, that doesn't gives us much satisfaction. When we start following the path of Gurudeo i.e. the path of divine spirituality, we get contentment from inner side. Such experience cannot be taken from anywhere else. Even if we have knowledge of various things and facts in the nature it cannot give us eternal peace. This eternal peace results only from study of self realization (Study of own). Life remains incomplete without this spiritual knowledge because our mind is always engaged in finding something. In such condition if one is blessed with Guru, then all the search and confusion of mind stops and one becomes stable. Life becomes contented and happier.

Om Jai Ho!



All Rights Reserved. Om Jai Ho Vishwatmaka Parivar